आयुष्याची माती करणाऱ्या या सवयी आजच सोडा नाहीतर….

ट्रेंडिंग

1. कधीच कोणाला जामिन राहु नका. पोलीस स्टेशनची पायरी आपल्याला चढायला लागू नये याची काळजी घ्या, आणि आपल्या आजूबाजूचे लोक नेहमी सज्जन आणि सद्वर्तन करणारे लोक असावेत याची काळजी घ्या.

2. उधार दिलेले पैसे मागण्यास लाज बाळगू नका. तुम्ही पैसे उधार देऊन ते मागण्यास तुम्हाला संकोच वाटला तर तुमचे पैसे बुडाले म्हणून समजा.

3. तुमच्या पगाराचा आकडा कधीच कोणाला सांगू नका. तुमच्या पगाराच्या आकड्यावरून लोक तुमची किंमत ठरवतात. तुम्हाला मानसन्मान किती द्यायचा ते ठरवतात.

4. नीट पारख केल्याशिवाय कोणालाही जवळ करू नका. आपला कोणावर ठेवलेला आंधळा विश्वास हा आपल्याला अडचणीत आणू शकतो. आपल्या आयुष्यात येणारी लोकं ही नेहमी पारखून घ्या.

5. घरातल्या खाजगी गोष्टी कधीही कोणाला सांगू नका. लोक पाठीमागे मस्करी करतात आणि कधीकधी फायदा देखील घेतात.

6. तुमच्याकडे असणारे स्कील, कौशल्य, ज्ञान हे कधीही फुकट वाटू नका, त्याचा योग्य तो मोबदला घ्या. आज-काल फुकट मिळालेल्या गोष्टींची किंमत ही कोणालाच नसते, म्हणून फुकट देणं टाळा.

7. सोडून गेलेल्या व्यक्ती साठी जास्त काळ शोक करत बसू नका. तुमच्या जवळ जे आहे त्यांची काळजी घ्या. तुमच्या शोक करण्याने तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली व्यक्ती परत येत नाही, म्हणून आपल्या जवळ आहे ते जपायला शिका.

8. तुमच्या भावनांना योग्य वेळी मोकळी वाट करून द्या, नाहीतर भावनांचा विस्फोट होतो किंवा मग मनामध्ये भावना साठवून ठेवल्या की तुमची मानसिक स्थिती बिघडू शकते आणि तुम्हाला अधिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

9. देवावर विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण माणुसकी कधीही सोडू नका. आपण जपलेली माणुसकी यातच आपला देव आहे. माणुसकीने वागलात तर देवाला जाण्याचीही गरज नाही.

10. सोशल मीडिया टीव्ही वरील मालिका चित्रपट यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी खऱ्या नसतात. वास्तवातल्या नसतात, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून त्यांच्या आहारी जाऊ नका.

हे वाचा:   लोकं तुम्हाला चिल्लर समजतात कारण... तुम्ही स्वतःला तसंच दाखवता.!

11. सतत तक्रार करणे, रडणे बंद करा. ते कोणालाही आवडत नाही. तुमच्या मनाने तुम्ही स्वतः नकारात्मक आहात हे दिसतं आणि तुमच्या आजूबाजूचं वातावरण देखील तुम्ही नकारात्मक करता.

12. मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि आपला वेळ वाया घालू नका. आपल्याकडे एक म्हण आहे शहाण्याचा नोकर व्हावं पण मूर्खाचा मालक होऊ नये. गोष्टीचा अतिरेक तसेच मूर्ख लोकांचा मालक होण्यापेक्षा शहाण्या लोकांचा नोकर व्हा ते कधीही चांगल.

13. कोणतही व्यसन करू नका. अति सर्वत्र वर्जयेत, मग ते कुठल्याही बाबतीत असो आपलं खान-पीन असो, आपली वागणूक असो, आपल समाजातील वर्तन असो, नेहमी मर्यादित ठेवा.

14. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, विश्वास घात होऊ शकतो. हे कलियुग आहे, इथे कोणीही स्वार्थाशिवाय तुमच्याजवळ येणार नाही.

15. विनाकारण स्तुती करणारे, जवळीक साधणारे यांचे सुप्त ओळखा, ते वेळेत ओळखले नाही तर तुमचं नुकसान होऊ शकते.

16. तारुण्य परतून येत नाही. तारुण्यात बेछुट वर्तन करू नका. सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या परंतु आपण कुठल्याही चुकीच्या कामात किंवा अडचणीत अडकून आपल आयुष्य बरबाद करू नका.

17. तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यात येणारी माणसं नीट पारखून घ्या. पारखण्यात चूक झाली तर आयुष्य बरबाद झाल म्हणून समजा.

18. स्वतःच्या कंफर्ट झोन बाहेर पडा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. रिस्क घेऊन काम केल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात यश मिळणार नाही.

19. आळसामुळे आपले व्यक्तिमत्व आपलं कर्तृत्व आणि बुद्धी नेहमीच मागे राहते. आळस झटकून कामाला लागा तरच तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकाल.

20. तुमच्या मनात न्यूनगंड बाळगू नका. स्वतःला कमी लेखणे यामुळे स्वतःचा आत्मविश्वास कमी होतो आणि आत्मविश्वास कमी झाला तर तुम्ही समाजात आणि चार लोकांमध्ये वावरू शकत नाही.

हे वाचा:   कुकर लावण्या आगोदर हे काम करा, हे करा कुकर कधीच खराब होणार नाही.!

21. व्यसन माणसाची शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि सामाजिक हानी करते आणि ती कधीही भरून न निघणारी असते, त्यामुळे व्यसन करणे टाळा.

22. चिंता काळजी करू नका. आयुष्य खूप सुंदर आहे ते आनंदाने जगा. सततची काळजी करून तुम्ही टेन्शन मागे लावून घेता. विशेषतः स्त्रियांमध्ये टेन्शन आणि चिंता यामुळे आजार वाढतात.

23. नेहमी कोणाच्यातरी धाकात राहणे, सांगकाम्या सारखे काम करणे सोडून द्या. स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. स्वतःचं अस्तित्व निर्माण करा.

24. स्वतःला गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिल्याने अहंकार निर्माण होतो आणि अहंकाराने दुर्गति सुरू होते म्हणून स्वाभिमान बाळगा पण अहंकार बाळगू नका.

25. रागात उचललेले पाऊल हे नेहमी चुकीच्या दिशेने घेऊन जाते म्हणून नेहमी आपले डोके शांत ठेवा आणि मन स्थिर असू द्या.

26. आर्थिक रित्या साक्षर बना नाही तर कितीही पैसा आला तरी त्याची बचत आणि गुंतवणूक न होता परिस्थिती आहे तशीच राहते.

27. काम क्रोध लोभ मद मत्सर मोह हे माणसाचे शत्रू आहेत, त्यापासून स्वतःला कसे वाचवता येईल ते पहा.

28. पॉर्न व्हिडीओ पाहू नका, पाहात असाल तर ते पाहणे बंद करा. सततचे व्हिडिओ पाहण्याने तुमची मानसिकता बिघडू शकते आणि तुमचे वर्तन चुकीचे असू शकते.

29. विवाहबाह्य संबंध ठेवू नका आणि नको त्या आजारांना ओढवून घेऊ नका आणि महत्वाचं आपलं सांसारिक आयुष्य उधळून लावू नका.

30. वायफळ खर्च करू नका. नको असलेल्या गोष्टी खरेदी करून पैसा वाया घालवू नका.

31. वाईट सवयींच सगळ्यात मोठं कारण आपली वाईट संगत असते म्हणून आपली संगत नेहमी चांगली ठेवा. आपल्या आजूबाजूला चांगले लोक असू द्या. हा लेख आवडला असेल तर आम्हाला नक्की सांगा. तसेच हा लेख तुमच्या मित्रांसोबत अवश्य शेअर करा.