उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग…! असा स्टंट करणं पडलं महागात.!

ट्रेंडिंग

सध्याचा काळ हा खूप बदलला गेला आहे. सर्वांना असे वाटत असते की आपले लग्न हे सर्वांपेक्षा वेगळे खूपच हटके व्हायला हवे. यासाठी प्रत्येक जण आपल्या लग्नामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या हरकती करताना दिसत असतात. काही लोक वेगवेगळ्या प्रकारचे स्टंट करून आपल्या नातेवाईकांमध्ये आपला आदर वाढवण्याचा प्रयत्न करत असतात.

सध्या सोशल मीडियावर स्वतःबद्दलची आगळा वेगळा केलेला स्टंट चा व्हिडिओ पोस्ट करण्यात अनेकांना खूप भारी वाटत असते. लग्न संबंधी चे देखील अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात परंतु कधीकधी अशा प्रकारे केलेला स्टंट हा अंगलट देखील येत असतो.

असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे यामध्ये एक नवरी एक जबरदस्त स्टंट करताना दिसती आहे. अतिउत्साही जोडपे आपल्या लग्नामध्ये विविध प्रकारचे कामे करताना दिसत असतात. हा सर्व उठाठेव आपल्या नातेवाईकांना दिखावा करण्यासाठी केला जात असतो परंतु यामुळे अनेकदा नुकसान देखील सहन करावे लागत असते.

हे वाचा:   अशी मुलगी असेल तुमची गर्लफ्रेंड तर तुमच्या संपूर्ण आयुष्याची होऊ शकते माती, वेळीच सावध व्हावे.!

अशीच एक अतिउत्साही नवरी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ‘उतावळी नवरी गुडघ्याला बाशिंग’ असे म्हणण्यास काही हरकत नाही, कारण या नवरी ने कारच्या बोनेट वर बसून स्वतःचा व्हिडिओ केला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल देखील होत आहे.

नातेवाइकांमध्ये मिरवण्यासाठी या नवरी ने वेगळीच स्टंटबाजी केली आहे. लग्नाच्या मांडवात येण्यासाठी अतिउत्साही नवरानवरी वेगवेगळ्या पद्धती अजमावत असतात कोणी बुलेट वर येते तर कोणी घोड्यावरून येत असते. हे सर्व का केले जाते तर नातेवाईकांना कौतुक वाटावे म्हणून.

असाच काहीसा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. पुण्यातील दिव्य घाट मध्ये एका नवरी ने चक्क कारच्या बोनेटवर बसून पूर्ण घाट सर केला आहे. हा तिचा घाटातील प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा तिचा स्टंट कारमध्ये बसलेल्या तिच्या नातेवाईकांकडून कौतुकाने पाहिला जात होता.

हे वाचा:   तुमच्या टॉयलेट मध्ये किंवा बाथरूम मध्ये चमचाभर ही एक गोष्ट टाका.! हात सुद्धा लावायची गरज नाही एक बादली पाण्यात एकदम चकाचक होऊन जाईल.!

समोर असलेला व्हिडिओ शूटिंग वाला नवरीला वेगवेगळ्या प्रकारच्या पोज देण्यास सांगत होता व तिचा व्हिडिओ शूट करत होता. मात्र नंतर पोलिसांनी या व्हिडिओमध्ये असलेल्या नवरी चा शोध घेण्यास सुरुवात केली. नवरी मुलीला हा रस्त्यावर केला जाणारा जीवघेणा स्टंट रोखण्याचे हे तिच्या नातेवाईकांची काम होते.

परंतु तिचे नातेवाईकच हे कौतुकास्पद पणे पाहात होते. कायदा तोडणाऱ्या या नवरी बरोबरच तिच्या नातेवाईकांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *