नमस्कार मित्रांनो, उपवास वैगरे असेल आणि जर तुम्हाला उपवासासाठी साबुदाणा वडे खायची इच्छा असेल तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दलची रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही वडे बनवण्यासाठी साबुदाणा भिजवायचा राहून गेलाय का? तर आज आम्ही तुम्हाला अजिबात साबुदाणा न भिजवता एक 20 मिनिटात तयार होणारे मस्त कुरकुरीत साबुदाणे वडे कसे बनवायचे त्याची रेसिपी दाखवणार आहे. हे वडे अगदी झटपट होतात, कुरकुरीत आणि खूप छान चवीचे तुम्हाला हे वडे तयार करता येतील. चला तर मग वेळ न घालवता या रेसिपीला सुरुवात करूया.
सर्वप्रथम गॅसवर आपण एक कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणता 200 g प्रमाणात कच्चा साबुदाणा घेतलेला आहे. तुम्ही लहान साईजचा मिळतो तो घेतला तरी सुद्धा चालू शकेल. आता हा साबुदाणा आपल्याला मस्त खरपूस भाजून घ्यायचा आहे. सुरुवातीची दोन मिनिट मोठ्या आचेवर भाजायचंय नंतर दोन ते तीन मिनिट कमी आचेवर आपल्याला साधारण पाच सहा मिनिट मस्त भाजायचा आहे. मिक्सरला छान याची बारीक पावडर होते आणि वडे सुद्धा छान खमंग तयार होतात. सहा मिनिट आपण छान भाजून घेतलाय. आणि संपूर्ण थंड झाल्यानंतर स्वच्छ आणि कोरड्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अशी छान पावडर करून घ्यायची आहे.
गरम गरम जर बारीक केलं तर तुमचा मिक्सर एक तर खराब होऊ शकतो किंवा अशी ही छान बारीक पावडर होत नाही. हातावर घेतली की बारीक रव्याप्रमाने छान रवाळ अशी पावडर तुम्हाला करून घ्यायची खूप जास्त मोठ मोठी ठेवायची नाही. जितकी छान बारीक कराल तितके वडे खाताना छान लागतील कचकच लागणार नाही. आता सारख्याच कपने अर्धा कप भाजून साल काढून शेंगदाणे घेतलेले आहेत, मस्त तव्यावर खरपूस भाजून घ्यायचे. संपूर्ण थंड झाल्यानंतर आपण याची साल काढून घेतलेली आहे. आता याची सुद्धा थोडीशी रवाळ किंवा मोठी मोठी पावडर करून घ्यायची आहे. जर शेंगदाण्याचा कुट तुमच्याकडे ऑलरेडी करून ठेवलेला असेल तर तो सुद्धा अर्धा कप तुम्ही इथे वापरू शकता.
सोबतच इथे आपण तीन मध्यम आकारांचे आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 200 g प्रमाणात उकडून साल काढून घेतलेले बटाटे घेतलेले आहेत, आता सिम्पली आपण बारीक किसणीवर हे बटाटे किसून घेणार आहोत. हाताने न कुसकरता असं हे छान बारीक करून घेतलं की वडे थापताना आपल्याला सोईस्कर पडतात किंवा तेलामध्ये वडा फुटत नाही. म्हणून शक्यतो अस हे किसणीवर आपल्याला किसून घेणच गरजेच आहे. सगळे वडे आपण छान करून घेतलेले आहे. इथे आपण एक हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट मिक्सरच्या भांड्यामधे करून घेतलेली आहे. आता ही पेस्ट बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि अगदी पाव चमचा जिर घेतलेल आहे.
उपवासाला जिर चालत नसेल तर फक्त हिरवी मिरचीची पेस्ट तुम्ही खलबत्त्यामध्ये करून घेतली तरी सुद्धा चालू शकेल. तर अशी ही आपली छान जाडसर मिक्सरला पेस्ट करून झालेली आहे. अगदी मिनिट भरात तुमची ही पेस्ट तयार होते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक मीठ करू शकता. सोबतच अगदी पाव चमचा आपण इथे साखर घातलेली आहे.
उपवासाच्या पदार्थाला थोडीशी साखर घातली की चव अगदी छान येते. आता ही सगळी जिन्नस हाताने छान आपण एकजीव करून घेणार आहोत. तुम्हाला जर उपवासाला बटाटा चालत नसेल तर उकडलेलं रताळ घेतलं तरी सुद्धा चालू शकेल. आवडीनुसार कमी अधिक करू शकता. सगळी जिन्नस सुरुवातीला असा हा छान गोळा होईपर्यंत आपण एकजीव करून घेतलेल आहे.
हा गोळा होत नसेल तर एखाद चमचा पाणी किंवा एखादा चमचा तुम्ही दही वापरलं तरी सुद्धा चालू शकेल. थोडस आपल्याला इथे सैलसर करायचे त्यासाठी ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली होती त्यातच दोन ते तीन चमचे आपण इथे पाणी घातलेल आहे आणि हे पाणी आपण यामध्ये वापरलेल आहे, म्हणजे पीठ थोडसं सैलसर झालेल आहे. आता वडे लगेच केले तरी सुद्धा चालू शकेल, जर वेळ असेल एक पाच-10 मिनिट झाकून याला भिजवू शकता.
वड़े बनवण्यासाठी हाताला थोड्स तेल लावून घेतलेल आहे. आता वडा तुम्हाला लहान मोठा किवा मध्यम आकाराचे लागत असेल त्यानुसार गोळा घेऊन हाताला छान गोल करायचं आहे आणि दोन हाताच्या मध्यभागी असा हा चपटा करून घ्यायचा आहे. वडा जितका तुमचा चपटा असेल एकत्र पटकन छान शिजला जाईल. छान कुरकुरीत होईल आणि आतून तो कच्चा राहणार नाही. म्हणून असा हा छान पातळ आपण थापून घेतलेला आहे आणि असे हे छोटे छोटेच वडे करा म्हणजे एकावेळेस तुम्हाला बरेच वडे छान कुरकुरीत मस्त तळून घेता येईल आणि घेतलेल्या जिन्नसात साधारणत असे हे अगदी छोट्या छोट्या आकाराचे एक 15 वड़े आपले तयार झालेले आहे.
तुम्ही थोडे मोठे करत असाल तर थोडे कमी होतील. अगदी छोटे छोटे करत असाल तर थोडे जास्त होतील असे सगळे वडे आपण छान थापून घेतलेले आहे. वडे तळण्यासाठी छान कडकडीत आपल्याला तेल गरम करून घ्यायच आहे आणि यामध्ये वडे सोडायचे आहे. आता सुरुवातीच्या बॅचमध्ये एक तीन ते चार पाचच सोडा जास्त सोडू नका कारण तेलाचा ताव थोडासा कमी असतो. मोठ्या आचेवर साधारणता बघू शकता वडे घातल्यानंतर असे हे छान बुडबुडे येतात जस जसे वडे आतून छान तळले जातील तस तसे याचे बुडबुड़े कमी होतात.
आता साधारणतः दोन मिनिटानंतर एका बाजूने छान वडे झालेले आहेत. तर असे हे वडे आपले छान तयार झालेले आहे. कमी तेलकट खुसखुशीत आणि कुरकुरीत वडे तुम्ही चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता किंवा दह्यामध्ये थोडीशी साखर घालून असं छान फेटून घ्यायचंय आणि दह्याबरोबर सुद्धा वडे अगदी छान लागतात. साबुदाणा अजिबात न भिजवता कुरकुरी साबुदाणे वडे तुमचे तयार झालेले आहेत. तर नक्की करून पहा. तर ही मस्त कुरकुरीत उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका.