देवांची मांडणी कशी करावी… या 5 मुर्त्या जोडीने ठेवल्यामुळे धनसंपत्तीत वाढ होते.!

ट्रेंडिंग

नमस्कार मंडळी, तर मंडळी आपण देव्हाऱ्यात आपल्या इष्ट देवांच्या मूर्ती का ठेवतो तर घरामध्ये बनवलेला देवारा हाय ईश्वराशी संपर्क करण्याचे एक उत्तम माध्यम आहे. तर मंडळी आपण या लेखात देव्हाऱ्यात देवी-देवतांच्या मूर्ती ठेवण्याचे नियम काय व त्यांचे पालन का केले पाहिजे याबद्दल जाणून घेणार आहोत. तर मंडळी काही देवाच्या मुर्त्या अशा असतात की त्यांना जवळ जवळ ठेवायचे नसते आणि काही देवाच्या मुर्त्या जवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच अशा काही देवांच्या मूर्ती असतात की त्यांना देव्हाऱ्यात ठेवणे योग्य मानले जात नाही. त्यामुळे त्या आपण देव्हाऱ्यात ठेऊ शकत नाही.

मग देव्हाऱ्यात कोणत्या देवाच्या मुर्त्या असाव्यात ज्यामुळे आपलं जीवन सुखी व समाधानी राहील? तर मंडळी या काही नियमांचं पालन केलं नाही तर घरात दुःख वाढेल, घरात सकारात्मक ऊर्जेच्या जागी नकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढेल, त्यामुळे घरातले लोक रागीट क्रोधी निराश होतात, पैशांची अडचण अशा अनेक गोष्टी घडू लागतात, कारण काही गोष्टींची माहिती आपल्याला नसते. नकळत आपल्या कडून झालेली चूक आपल्यावरच भारी पडू शकते. त्यामुळे देवपूजा योग्य व शास्त्रशुद्ध पद्धतीने केली पाहिजे. कारण ही केलेली एक चूक घरामध्ये वास्तुदोष निर्माण करू शकते.

चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या देव्हाऱ्यामध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते. मंडळी पहिले तर पूजा करताना आपल्याला काही बदल करायचे आहेत व योग्य पद्धतीने देवांना देव्हाऱ्यामध्ये स्थापन करायचे आहे, असे केल्यामुळे आपल्याला खूप लाभ मिळू शकतो. तर मंडळी देव्हाऱ्यात गणपतीची मूर्ती किंवा फोटो ठेवला पाहिजे कारण गणपती यांना सर्व देवी देवता मध्ये प्रथम पूजेचा मान आहे. गणपतीच्या शिवाय कुठल्याही पूजेची सुरवात करता येत नाही आणि तसेच शिवपुत्र गणेश हे विघ्नहर्ता आहेत, ते आपल्या वरील विघ्न दूर करते. पण मंडळी गणपतीची देव्हाऱ्यामध्ये एकच मूर्ती असावी त्यामुळे आपल्याला त्याचे सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतील.

हे वाचा:   महिलांनो स्वयंपाक घरातील या बारीक सारीक गोष्टी माहिती असू द्या.! यामुळे तुमचे कामे होतील झटपट.!

तर मंडळी माता लक्ष्मी व गणपतीची मूर्ती देव्हाऱ्यात एकत्र ठेवणे खूप शुभ मानलं जातं. अशा प्रकारे या मुर्त्या ठेवल्या मुळे घरातील अनेक समस्या विघ्न व नकारात्मकता नष्ट होते. माता लक्ष्मी साधनसंपत्ती व समृद्धी प्रदान करणाऱ्या देवी आहेत, तसेच गणपती हे साक्षात रिद्धी सिद्धी चा भांडार असून बुद्धीचे दैवत आहेत, त्यामुळे या देवतांच्या मूर्त्या देव्हाऱ्यामध्ये असणे खूप आवश्यक आहे. तर मंडळी शास्त्र असं सांगतं की माता लक्ष्मी सोबत जगाचे पालन हार श्री विष्णूची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणं खूप अनिवार्य आहे, कारण श्रीविष्णू हे माता लक्ष्मी चे पती आहेत व माता लक्ष्मी आपल्या पतीशिवाय कुठल्याही भक्ताच्या घरी जात नाही म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी नित्य भगवान विष्णूची पूजा केलीच पाहिजे, त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते व त्या घरामध्ये वैभव व धनसंपत्ती कायम टिकून राहते.

तर मंडळी माता लक्ष्मीची गणपतीसोबतची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवणे शुभ मानले जाते व माता लक्ष्मीची भगवान विष्णू सोबत मूर्ती ठेवणे विशेष फलदायी मानले मानले जातात. त्यामुळे या देवी देवतांच्या मूर्त्या अशाप्रकारे ठेवल्या पाहिजेत. माता लक्ष्मी च्या उजव्या हाताला भगवान विष्णूची मूर्ती ठेवावी व माता लक्ष्मी च्या डाव्या हाताला गणपतीची मूर्ती स्थापन करावी. अशा प्रकारे मुर्त्या ठेवल्यामुळे घरामध्ये धान्याचे भांडार कधीही रिकामे होणार नाही.

तर मंडळी आपण पूजा तर रोजच करतो पण देवांचा क्रम बदलून देव मागेपुढे ठेवतो. पुढील आहे हनुमानाचा फोटो, हनुमानाचा फोटो घरामध्ये ठेवला पाहिजे. काही लोकांना अशी शंका वाटते की हनुमानाचा फोटो घरात ठेवावा की नाही? तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हनुमान यांचा फोटो ठेवल्यामुळे सर्व प्रकारचे वास्तुदोष व ग्रह दोष नष्ट होतात. केवळ बजरंग बली हनुमानाचा फोटो घरात लावल्यामुळे पण सकारात्मक फरक पडतो. यासाठी घरात एक तर हनुमान पर्वत घेऊन आकाशात उडत आहेत किंवा हनुमानाचा बसलेल्या प्रसन्न अवस्थेतला फोटो अवश्य लावला पाहिजे, त्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदेल.

हे वाचा:   फक्त १ रुपयाचा शाम्पू करेल तुमचे काम अगदी सोप्पे; महिलांनो नक्की बघा.!

तर मंडळी आता आपण देव्हाऱ्यात कोणत्या देवी देवतांच्या मूर्त्या एकत्र ठेवल्या पाहिजेत ते पाहूया. तर मंडळी शिवपार्वतीची मूर्ती एकत्रित ठेवल्यामुळे आपल्या भाग्यात वाढ होते व घरामध्ये प्रेम व एकता वाढते. तसेच श्री विष्णु भगवान व माता लक्ष्मीची मूर्ती एकत्र ठेवली पाहिजे. त्याचबरोबर राधा कृष्णाची मूर्ती देव्हाऱ्यात ठेवल्यामुळे पती-पत्नीमध्ये प्रेम वाढतं व संसार सुखी व्हायला मदत होते. विठ्ठल रखुमाई ची मूर्ती सुद्धा देव्हाऱ्यात ठेवणे खूप शुभ मानलं जातं. तर मंडळी आता आपण कुठल्या देवतांचे फोटो एकत्र ठेवायचे नसतात ते पाहुयात.

तर मंडळी घरामध्ये ब्रम्हा विष्णू व महेश यांची एकत्र असलेली मूर्ती ठेवणे वर्ज्य मानले जाते. ते एकत्र न ठेवण्याचं कारण असं की तिन्ही देवांची पूजा करण्याची पद्धत वेगळी आहे. श्रीविष्णूची तुळशीपत्र शिवाय पुजा अपूर्ण आहे, तेच महादेवाला तुळशीपत्र चालत नाही, त्याचबरोबर घरामध्ये ब्रह्मदेवाची पूजा करणे वर्ज्य मानल जात. ब्रह्मदेवाची घरामध्ये पूजा केली जात नाही. आपल्या घरी ब्रम्हा विष्णू महेश यांचे फोटो असतील तर कृपया याला देव्हाऱ्यात ठेवू नका, यांना भिंतीवर लावू शकता पण देव्हाऱ्यामध्ये ठेवणे टाळल पाहिजे.

मंडळी अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छिते की कृपया आपल्या घरामधील मृत लोकांचे फोटो देव्हाऱ्यात किंवा त्या फोटोच्या बाजूला कधीच लावायचे नाही, कारण हा खूप मोठा दोष लागतो. त्याचबरोबर शनीदेवाचा फोटो घरामध्ये लावणे वर्ज्य मानल जात. घरात शनी देवाच्या फोटोची पूजा केली जात नाही, कारण शनी देवाच्या पूजेचे नियम वेगळे आहेत. तर मंडळी वरील सर्व नियमांचे पालन करून जर तुम्ही रोजची देवपूजा केलीत तर घरामध्ये कशाची कमी पडणार नाही म्हणून योग्य पद्धतीनेच रोजची देवपूजा केली पाहिजे. तर मंडळी आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा लेख तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा.