तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा आता विसरावा लागेल, या पाच वस्तू तुमच्या कुठल्याही तांब्याच्या भांड्याला अगदी नव्यासारख्या चमकवू शकतात.!

ट्रेंडिंग

तांब्याची भांडी प्रत्येकाच्या घरात असतातच. या तांब्यांच्या भांड्यांना स्वच्छ कसे करायचे हे प्रत्येकाला माहिती नसते. अनेक वेळा तांब्याची भांडी हे काळे पडतात किंवा त्यावर मळ साचला जातो. तांबे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा असा धातू आहे यामध्ये पाणी पिल्याने किंवा जेवण बनवल्याने किंवा जेवण खाल्ल्याने आरोग्याचे विशेष फायदे सांगितले जातात.

अनेक लोक तांब्याची भांडी त्यांच्या किचनमध्ये वापर असतात. परंतु असे दिसून आले आहे की तांब्याची भांडी साफ करणे आणि स्त्रियांना जड जाते परंतु चिंता करण्याची काही गरज नाही आजच्या या लेखाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला तांब्याची भांडी अगदी काही साधनसामग्रीने तुम्ही घरच्या घरी कशाप्रकारे स्वच्छ करू शकता ते बघणार आहोत.

तर मित्रांनो तांब्याची भांडी साफ करण्यासाठी तुम्हाला काही घरगुती पदार्थ लागणार आहे काही वस्तू लागणार आहेत ज्याद्वारे तुम्ही तुमचे तांब्याची भांडी स्वच्छ करू शकता. तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी लागणाऱ्या पहिला पदार्थ म्हणजे लिंबू लिंबामध्ये असलेले असते चे तांब्यावर असलेला मळ पूर्णपणे नष्ट करत असते आणखी एक गोष्ट लागेल ती म्हणजे मीठ.

हे वाचा:   माठात टाकायची ही एक सिक्रेट गोष्ट.! माठातले पाणी कधीच गरम होणार नाही.! आता फ्रीज पेक्षा जास्त थंड पाणी मिळवा.!

त्याबरोबरच पांढरा विनेगर दुकानातून विकत आणावा आणि बेकिंग सोडा या सोबतच मऊ कापड किंवा तुमच्याकडे स्पंज असेल तर तो देखील उपयोगात येईल आणि भांडे घासण्यासाठी आपल्याला या स्पंचा वापर करता येईल.

आता एक लिंबू अर्धा कापून कापलेल्या पृष्ठभागावर मीठ शिंपडा. तांब्याच्या पृष्ठभागावर लिंबू आणि मीठाचे मिश्रण हलक्या हाताने चोळा. पाण्याने चांगले धुवा आणि मऊ कापडाने वाळवा. पांढरे व्हिनेगर आणि मीठ यांचे समान भाग मिसळून पेस्ट तयार करा. पेस्ट तांब्याला लावा आणि 15-20 मिनिटे बसू द्या. मऊ कापड किंवा स्पंजने पृष्ठभाग घासून घ्या. स्वच्छ धुवा आणि वाळवा. अशाप्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही भांडी धुवू शकता.

आता दुसरी पायरी म्हणजे बेकिंग सोडा आणि पाणी वापरून पेस्ट बनवा. पेस्ट तांब्याला लावा आणि 15-20 मिनिटे बसू द्या. मऊ कापड किंवा स्पंजने पृष्ठभाग हळूवारपणे घासून घ्या. स्वच्छ धुवा आणि वाळवा. बेकिंग सोडा मध्ये असे गुणधर्म असतात ज्याने भांडी लवकरात लवकर स्वच्छ होत असतात त्यामुळे बेकिंग सोडा हा तांब्याची भांडी घासण्यासाठी अतिशय उपयुक्त मानला जातो.

हे वाचा:   महिलांसाठी या बिझनेस आयडिया जबरदस्त आहेत.! महिलांसाठी हे बिजनेस फारच सोप्या पद्धतीने समजून घ्या.!

आता साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. कोणतेही साफसफाईचे उपाय वापरल्यानंतर, कोणतेही अवशेष काढून टाकण्यासाठी नेहमी तांब्याची वस्तू साध्या पाण्याने स्वच्छ धुवा. पाण्याचे डाग टाळण्यासाठी मऊ कापडाने वाळवा. अशा काही घरगुती उपाय आणि तुम्ही तुमचे तांब्याची भांडी स्वच्छ करू शकता शक्यतो तांब्याची भांडी हवा बंद झाली म्हणजे त्या ठिकाणी जास्त दूर बसणार नाही किंवा जास्त हवा लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावी.

तांब्याची भांडी स्वच्छ धुतल्यानंतर लगेच कोरडी करून घ्यावी यामुळे यामुळे कसल्याही प्रकारची आहे नाही राहिल्याने ती काळी पडत नाही अशा काही टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्या तांब्याच्या कुठल्याही वस्तू असतील तर त्या देखील तुम्ही स्वच्छ करू शकता याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये तांब्याच्या अनेक वस्तू असतील त्या देखील स्वच्छ करा.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.