तुमच्या पायाच्या अंगठ्यापेक्षा बाजूच बोट मोठ आहे का? लाखात 1 नशीबवान स्त्री पुरुषाचा पाय असा असतो… पायाच्या बोटावरून जाणून घ्या आपलं नशीब कस आहे.!

अध्यात्म

नमस्कार मंडळी तुमचे मनःपूर्वक स्वागत आहे. तर मंडळी आपण आजच्या लेखात समुद्रशास्त्राची माहिती पाहणार. आहोत समुद्र शास्त्र हे असं शास्त्र आहे की ज्याद्वारे आपण मनुष्याच्या अवयवावरून त्याचा स्वभाव समजू शकतो. मनुष्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत सर्व अवयवांचे वेगळे महत्त्व आहे, पण आपण आजच्या लेखात पायाच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव, कार्यक्षेत्र, जीवन कस असेल नशीबाची साथ किती मिळणार आहे या सर्वांची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत.

मंडळी आता समुद्र शास्त्रानुसार पायाच्या अंगठ्याच्या बाजूचे जे बोट असतं त्यामध्ये खूप सारे रहस्य लपलेले असते. पायाच्या पाचही बोटाचे वेगळे महत्त्व असते पण आपण या वेळी अंगठ्याच्या बाजूचे बोट जे आहे त्या विषयीची सर्व माहिती पाहणार आहोत. ज्यांच्या पायाच्या अंगठ्या पेक्षा बाजूच बोट मोठं असतं ते लोक खूप भाग्यवान व धनवान असतात. तर्जनी बोटावर देवगुरु बृहस्पती च अधिपत्य असतं. हे बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर ते लोक खूप बुद्धिमान सुद्धा असतात.

त्याच बरोबर हे लोक जिद्दी सुद्धा असतात, पण ही जिद्द चांगल्या कामासाठी असते, म्हणजे एखादी गोष्ट निश्चित केली की ही गोष्ट मी करणार म्हणजे ती ते करणारच व त्या कामांमध्ये असे लोक यशस्वी सुद्धा होतात. हे लोक खूप परफेक्ट असतात. ज्यांच्या पायाचं हे बोट गोरे असो किंवा सावळे असो पण हे खूप आकर्षक असतात. ज्यांच्या पायाच्या अंगठा पेक्षा बाजूच बोट मोठा असतं अशा लोकांचा भाग्योदय 28 वर्षानंतर होतो. हा जातक खूप धन कमावणारा असतो व धन बचत सुद्धा करणारा असतो.

हीच गोष्ट स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा लागू होते की तिचा पती धनवान व पैसा कमावणारा असतो. हे लोक कोणाच्याही मदतीशिवाय यशस्वी होणारे असतात. त्याच बरोबर हे नाव सुद्धा खूप कमावतात. हे लोक भावूक सुद्धा असतात, कोणाच्याही मदतीला धावून जातात, त्यांना कोणाचही दुःख पहावल जात नाही व सर्वांची मदत करणारे हे लोक असतात. प्रत्येक काम खूप मन लावून करतात.

हे वाचा:   बांदा घरात घेऊन या.. घराची चहूबाजूंनी प्रगती होईल. करा हा उपाय.!

हे लोक जे काम हाती येतील ते काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा यांचा स्वभाव असतो. तर मंडळी जीवनात काही लोक असे असतात की त्यांना जास्त मेहनत करावी लागते त्यांना त्यांच्या भाग्याने सहजासहजी सर्व काही मिळत असत, पण या लोकांचा तसं नाही. यांना सर्व भौतिक सुख हे कष्ट व मेहनती वरच मिळवायचं असतं. आपल्या मेहनतीने सर्व गोष्टी मिळवणारे हे लोक असतात. आपल्या कुटुंबाची जिम्मेदारी घेणारे हे लोक असतात. त्याचबरोबर आपल्या कुटुंबावर खूप प्रेम करणारे असतात. त्यांच्या सुखासाठी हे लोक काहीही करायला तयार असतात.

ज्या स्त्रीच्या पायाच्या अंगठ्या पेक्षा बाजूचा बोट मोठं असतं, अशा प्रकारचा पाय ज्या स्त्रीचा असेल तर तिच्या लग्ना नंतर तिच्या पाया गुनाने पतीचे भाग्य चमकतं. ती त्याच्यासाठी खूप लकी ठरते, आपल्या पतीची खूप मदत करणारी असते व त्याच्या कामात ती साहाय्यता करते. ती स्त्री आपला पती कसा यशस्वी होईल यासाठी देवाकडे प्रार्थना सुद्धा करते. पुढील भविष्याचा विचार करत आपले जीवन जगत असते. स्त्री असो किंवा पुरुष हे लोक परिवर्तनशील असतात. आपल्या जीवनात काळानुसार बदल करणारे असतात. हे लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात.

देवाची सेवा करणारे असतात. यांना प्रवासाचे योग असतात. हे लोक वचन पाळणारी असतात. एखाद्याला शब्द दिला तर तो पडणारच नाही हे लोक असे असतात. हे लोक स्वतःच्या मेहनतीने यशस्वी होऊन सुखी राहतात. त्याचबरोबर कोणाचा वाईट विचार हे लोक करत नाहीत. मनाचे खूप निर्मळ असतात व सतत हसत राहण्याचा प्रयत्न करतात. त्याच बरोबर हे लोक मनातील गोष्ट जास्त कोणाला सांगत नाहीत. यांना फ्रेंड मोजकेच असतात पण हे लोक मैत्री खूप चांगल्या प्रकारे निभावतात. त्याचबरोबर हे लोक कोणाच्या भानगडीत पडत नाहीत व विनाकारण कोणाला सल्लाही देत नाहीत.

हे वाचा:   वास्तूशास्त्रानुसार जेवण करताना ठेवा या दिशांचे भान; नाहीतर आरोग्यावर होईल विपरीत परिणाम! अनेक लोकांना याबद्दल काहीही माहिती नाही.!

आपल्या कामामध्ये मग्न असतात, यांना यांच्या कामांमध्ये लुडबुड केलेली अजिबात आवडत नाही. ज्यांच्या पायाच्या अंगठ्या पेक्षा बाजूचे बोट मोठ असतं हे लोक स्वावलंबी असून स्वतःचे काम स्वतः करणारे असतात. तर तुमच्यासाठी एक सल्ला असा आहे की तुम्ही काम तर खूप मन लावून करता पण एका वेळी अनेक काम करू नका, एका वेळी एकच काम करा. म्हणजे हे आपल्या कलेच्या जोरावर पुढे जाणारे असतात. तर मंडळी मेहनत तर सर्वच लोक करतात, यशस्वी होण्यासाठी सर्वच लोक धडपड करत असतात, पण जेव्हा वेळ नशिबाची येते त्यावेळी ही संधी काही लोकांनाच मिळते.

जर तुमच्या पायाचे बोट अंगठ्या पेक्षा मोठ असेल तर तुमच्या नशिबाच्या साथीमुळे तुम्हाला संधी मिळेल व तुम्ही यशस्वी सुद्धा व्हाल. तर मंडळी आपण या लेखात पाहिलं की पायाच्या अंगठ्या बाजूचे बोट जर मोठ असेल तर त्यांचा स्वभाव कसा असतो आणि इतर माहिती. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या मित्र परिवारासोबत हा लेख शेअर करायला अजिबात विसरू नका.