जेवणाच्या ताटात किंवा डब्यामध्ये कधीही देऊ नये तीन पोळ्या; जाणून घ्या काय आहे यामागील कारण.!

अध्यात्म

हिंदू धर्मामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत ज्यांना लोक आजही तितक्याच मनोभावाने मानतात. हिंदू धर्मातील अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचे पालन पोषण हे प्रत्येकाने करायला हवे. हिंदू धर्मामध्ये तीन देवतांना विशेष महत्त्व दिले गेले आहे हे तीन देवता म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश. ज्यांना श्री देव देखील म्हटले जाते तसेच श्री गुरुदत्त देखील म्हटले जाते. जगाचे निर्माते म्हणून या तिघांना ओळखले जाते.

या तीन देवतांमुळे ही संख्या खूपच शुभ असायला हवी. परंतु पूजे मध्ये तीन या संख्येला खूपच अशुभ मानले जाते. तीन संख्येचे कोणतेही कार्य केले जात नाही. धार्मिक कार्य असेल तर कधीही तीन असलेल्या वस्तू ठेवल्या जात नाहीत. एवढेच नाही तर जेवणाच्या ताटामध्ये देखील आपण कधीही तीन पोळ्या ठेवत नाही. त्याऐवजी दोन ठेवल्या जातात किंवा चार ठेवल्या जातात. आपल्याला हे सर्व माहिती आहे परंतु असे का केले जाते हे आपल्याला अजूनही माहिती नसेल.

हे वाचा:   मार्च महिन्याचा पहिला आठवडा असणार आहे, प्रेम करणाऱ्या लोकांसाठी सुखाचा.! प्रेम संबंध होणार आहेत आणखी प्रबळ.!

आजच्या या लेखामध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत की तीन संख्येला एवढे महत्त्व का दिले जात नाही. का तीन या संख्येला अशुभ मानले जाते. चला तर मग आपण हे सविस्तरपणे जाणून घेऊया. जेवणाच्या ताटामध्ये 3 पोळ्या ठेवणे म्हणजे असे जेवण मृतक मानले जाते. म्हणजे हिंदू धर्मामध्ये 3 पोळ्या असलेली एक थाळी तिला मृतक ची थाळी असे मानले जाते. कारण मृत्यूनंतर त्रयोदशीच्या समारोह च्या आधी भोजनाच्या थाळीमध्ये 3 पोळ्या ठेवल्या जातात.

अशी थाळी मूतकाला अर्पण केली जाते. हेच कारण आहे की ज्यामुळे जेवणाअगोदर कधीही ताटामध्ये 3 पोळ्या ठेवल्या जात नाहीत. जर कोणी व्यक्ती अशाप्रकारे जेवणाच्या ताटात 3 पोळ्या ठेवत असेल तर अशा वेळी घरातील मोठे व्यक्ती त्यांना तीन पोळ्या न ठेवण्याचा सल्ला देत असतात. यामुळे असे देखील म्हटले जाते की 3 पोळ्या असलेल्या ताटात खाल्ल्यामुळे शत्रुत्वाची भावना आणखी वाढत असते.

हे वाचा:   हे चार राशीचे लोक पाण्यासारखा पैसा खर्च करत असतात, एकही रुपया यांच्याकडे टिकत नाही.! जगतात मात्र रॉयल आयुष्य.!

असे देखील म्हटले जाते की जर आपल्याला कोठे बाहेरगावी जायचे असेल तर आपण जर आपल्या बरोबर अन्न नेत असेल तर अशावेळी त्यामध्ये केवळ तीन पोळ्या कधीही देऊ नये. असे करणे देखील अशुभ मानले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *