हिंदू धर्मामध्ये मरताना घरातील लक्ष्मी मानले जाते. ज्या घरामध्ये घरातील महिलांचा आदर मानसन्मान होत असतो अशा घरांमध्ये माता लक्ष्मी अनंत काळापर्यंत निवास करत असते. अशा घरांमध्ये पैशाची धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. अशा घरात कधीही दारिद्र्य येत नसते. अशा लोकांना सदैव माता लक्ष्मी चा आशीर्वाद मिळत असतो. कधीही कुठल्याही गोष्टीची कमतरता अशा लोकांना भासत नाही.
या उलट ज्या ठिकाणी घरातील महिलांचा वेळोवेळी अपमान होत असतो. अशा घरांमध्ये माता लक्ष्मी पाऊल सुद्धा ठेवत नाही. अशा घरात नेहमी दारिद्र्य, अशांती, घरात भांडणे, किरकिर होणे, अशा समस्या निर्माण होत असतात. परंतु घरातील स्त्रियांनी केले गेलेल्या कामावरून देखील घरातील इतर सदस्यांवर याचा प्रभाव पडत असतो. महिलांनी कधीही या गोष्टी केल्या नाही पाहिजेत या गोष्टींविषयी आपण जाणून घेणार आहोत.
आपल्याकडे कधीही एखाद्या गोष्टीची कमतरता भासल्यास आपण आपल्या शेजारी पाजारी काही मागायला जात असतो. परंतु वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की रात्रीच्या वेळी कोणाच्याही घरी दूध मागू नये. असे केल्यामुळे स्त्रीच्या कुंडली मध्ये असलेला चंद्र ग्रह प्रभावित होत असतो. त्यामुळे महिलांनी रात्रीच्या वेळी ही चूक कधीही करू नये.
प्रत्येक घरांमध्ये रात्रीचे जेवण केल्यानंतर जेवणाचे खरकटे भांडे धुत नाही. महिला असे विचार करत असतात की आपण सकाळी उठून के भांडे धुवून काढू. परंतु रात्रीच्या वेळी घरामध्ये खरकटे भांडे ठेवणे अयोग्य मानले जाते. त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता पसरत असते. जर आपण रात्रीच्या वेळी भांडे स्वच्छ धुऊन ठेवले. स्वयंपाक घर पूर्णपणे साफ सूत्रे करून ठेवले. तर यामुळे घर सुख समृद्धीने भरलेले वाटत असते.
अनेक महिला रात्री झोपताना एक चूक खूपदा करत असतात ही चूक म्हणजे झोपतेवेळी आपले केस मोकळे ठेवून झोपत असतात. परंतु असे करणे खूपच अशुभ मानले जाते. रात्रीच्या वेळी कधीही आपल्या केसांना मोकळे सोडून झोपू नये. यामुळे घरामध्ये भांडणे किरकिर निर्माण होत असते. कधीही झोपतेवेळी केस योग्यपणे बांधून झोपावे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.