हे तर सर्वांना माहिती आहे की धनाची देवी लक्ष्मीला मानले जाते. माता लक्ष्मीची पूजा प्रत्येक व्यक्ती करत असतो. प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो हा असतोच. देवघरामध्ये असलेल्या या फोटोसमोर दररोज लोक दिवा अगरबत्ती लावून मातालक्ष्मीची मनोभावे पूजा करत असतात. परंतु आपण अशा वेळी काही चुका करत असतो घरांमध्ये असे काही कामे करत असतो ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते.
असे कामे घरात करणे अत्यंत अशुभ मानले जाते. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल तर तुम्ही हा लेख नक्की वाचायला हवा. असे काही कामे आहेत जे आपण घरात चुकूनही केले नाही पाहिजे. यामुळे घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. घरामध्ये गरीबी येत असते. तसेच घरात दारिद्र्य भांडणे सुरु होत असते. त्यामुळे चुकूनही अशा प्रकारचे कामे घरांमध्ये करू नये. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे कामे.
उशिरापर्यंत झोपणे: अनेक लोकांना एक अत्यंत वाईट सवय असते ती म्हणजे उशिरा पर्यंत जागणे व उशिरा उठणे. जे लोक उशिरापर्यंत झोपत असतात अशा लोकांच्या घरी नेहमी दारिद्र्य येत असते. असे करणे मातालक्ष्मीला अजिबात आवडत नाही. त्यामुळे घरामध्ये सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करून देवाची पूजा करावी व भगवंताचे नामस्मरण करून आपले कामे करावीत.
रात्रीच्या वेळी नखे कापणे: अनेक लोक आपल्या व्यस्त दिनचर्येत मुळे रात्रीच्या वेळी नखे काढत असतात. परंतु आपण असा कधी विचारही करत नाही की रात्रीच्या वेळी नखे काढल्याने याचा प्रभाव आपल्या जीवनावर पडू शकतो का, हेच एक काम आहे ते म्हणजे रात्रीच्या वेळी नखे कधीही काढली नाही पाहिजे. रात्रीच्या वेळी नखे काढणे याला खूपच अशुभ मानले जाते. यामुळे माता लक्ष्मी नाराज होत असते व जीवनामध्ये धन संबंधीच्या समस्या निर्माण होत असतात.
जेवण करताना मध्येच उठणे: शास्त्रांमध्ये जेवण करण्याला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. अन्न हे पूर्णब्रम्ह असते त्यामुळे अन्नाचा कधीही अपमान करू नये. जो व्यक्ती अन्नाचा अपमान करत असतो म्हणजेच अन्न वाया घालत असतो अशा लोकांवर अन्न देवता नेहमी नाराज राहात असते. अशा लोकांना कधीनाकधी अन्नाची कमतरता भाचल्याशिवाय राहात नाही.
अशावेळी असे देखील काही लोक असतात जे जेवण करत असताना एक चुकी करत असतात ती म्हणजे जेवताना मध्येच उठणे. जेवण करत असताना मध्येच उठणे याला खूपच अशुभ मानले जाते. कधीही जेवण करत असताना मध्येच उठले नाही पाहिजे.जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.