प्रत्येक महिलेचे हे स्वप्न असते की आपली त्वचा ही खूपच मुलायम व सुंदर व्हावी. कुठल्याही प्रकारचे डाग त्वचेवर राहू नये. यासाठी महिला, अनेक तरुण मुले व पुरुष देखील यासाठी चे वेगवेगळे प्रयत्न करून बघत असतात. परंतु अनेक प्रयत्न करूनही कुठलाही फरक चेहऱ्यामध्ये दिसत नसतो. यासाठी बाजारामध्ये अनेक प्रकारचे सौंदर्यप्रसाधने मिळत असतात. यामध्ये भरपूर असे केमिकल असते ज्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होत असते.
परंतु आपण काही घरगुती उपाय केले तर आपला चेहरा नक्कीच सुंदर दिसू शकतो. हे उपाय करण्यासाठी अत्यंत सोपी असून याचा कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट चेहऱ्यावर दिसून येत नाही. बाजारामध्ये मिळणाऱ्या केमिकलयुक्त सौंदर्य प्रसाधनापेक्षा कधीही चांगलाच असेल. सुंदर, नितळ व तेजस्वी त्वचा दिसण्यासाठी महिलांनी बटाट्याचा एक छोटासा उपाय करायला हवा.
बटाट्याचा रस चेहर्यासाठी खूपच उपयुक्त असा मानला जातो. बटाट्याचा रस जरा चांगल्या प्रकारे लावला तर यामुळे चेहऱ्यावर तेज येत असते. तसेच डोळ्यावर असलेले डार्क सर्कल देखील नाहीसे होत असतात. परंतु उकडलेले बटाटे देखील सौंदर्य साठी खूपच महत्त्वाचे मानले जातात. उकडलेल्या बटाट्याचा एक छोटासा पॅक बनवून जर चेहऱ्यावर लावला तरी यामुळे सुंदरता आणखी वाढत असते.
बटाटा जर उकडवून लावला तर यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट चेहऱ्यावर जाणवत नाही. कारण हा एक नैसर्गिक उपाय आहे. त्यामध्ये कुठल्याही केमिकल युक्त पदार्थांचा वापर केला जात नाही. हा उपाय आठवड्यातून दोन ते तीन वेळेस करायला हवा. चला तर मग आजच्या या लेखामध्ये आपण बटाट्याचा हा फेसपॅक कसा प्रकारे बनवावा व कशाप्रकारे लावावा. याबाबत माहिती पाहूया जेणेकरून चेहरा आणखी सुंदर दिसेल.
बटाट्याचा हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला काही साहित्याची आवश्यकता भासेल यासाठी सर्वप्रथम काही बटाटे लागतील, त्यानंतर एक लिंबू, दही आणि मध लागेल. बटाट्याचा हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम बटाटे उकडून घ्यावे. बटाट्याच्या या मिश्रणामध्ये एक लिंबू दही आणि मध टाकावा व याला चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्यावे. चांगल्या प्रकारे याची पेस्ट बनेल. या पेस्टला जवळपास पंधरा मिनिटांपर्यंत चेहऱ्यावर लावून ठेवावे. त्यानंतर आपला चेहरा धुऊन टाकावा.
उकडलेल्या बटाट्याचा फेसपॅक जर वापरला तर यामुळे त्वचेमध्ये खूप फरक दिसून येईल. यामुळे त्वचेमध्ये असलेल्या सर्व समस्या नाहीशा होतात. तसेच डोळ्यावर असलेली डाग सर्कल देखील नष्ट होत असतात. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.