आता कितीही कांदे कापा, डोळ्यातून एक थेंब सुद्धा बाहेर येणार नाही, कांदा कापताना कराव्या या काही टिप्स आणि ट्रिक्स.!

आरोग्य

जेवणामध्ये कांद्याचा वापर केलेला नसेल तर अशा प्रकारचा कोणताही पदार्थ हा स्वादिष्ट बनत नाही. परंतु कांदा टाकून कुठलाही पदार्थ केला की त्याचा स्वाद हा दुप्पट वाढला जातो. अनेक प्रकारच्या सुंदर अशा चवदार मसाल्यामध्ये कांद्याचा वापर केलेला असतोच. कांदा हा आरोग्यासाठी देखील अतिशय उपयुक्त मानला गेला आहे.

अनेक लोक कांद्याला कच्चा स्वरूपात सलाद म्हणून खाण्याचे देखील शौकीन असतात. कांद्याने जेवणाला स्वाद येतो हे मात्र खरे आहे परंतु कांदा कापत असताना देखील खूप हाल सहन करावे लागत असतात. कांदा कापताना डोळ्यातून खूप पाणी येते डोळ्याची भयंकर अशी आग देखील होत असते. यामुळे कांदा कापताना खूपच चिडचिड देखील सहन करावी लागत असते.

घरामध्ये असलेल्या महिलांना हा त्रासदायक अनुभव दररोज अनुभवायला मिळत असतो. परंतु आता चिंता करण्याची काही एक गरज नाही. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही अशा सोप्या टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलो आहोत ज्या तुम्हाला कांदा कापताना येणाऱ्या डोळ्यातून पाण्याला थांबवू शकेल. या टीप्‍स जर तुम्ही आजमावल्या तर तुमच्या डोळ्यातून कांदा कापताना कधीच पाणी येणार नाही.

हे वाचा:   शरीर हत्ती सारखे मजबूत बनेल, फक्त करा अशा प्रकारे सेवन, हे अकरा आजार जवळ सुद्धा येणार नाही.!

यासाठी कांदा कापणार आहात त्यापूर्वी काही वेळ आधी कांद्याच्या दोन्ही बाजू कापून कांदा थंड पाण्यामध्ये ठेवावा. त्यानंतर कांद्यावरील असलेले वरचे आवरण काढून टाकावे व कांदा कापावा. असे केल्याने डोळ्यातून पाणी येणार नाही तसेच डोळ्याची आग देखील होणार नाही. तुम्ही जर खूपच घाईगडबडीत असाल व तुम्हाला या करिता वेळ नसेल तर आणखी एक सोपा उपाय आहे.

जेव्हा पण तुम्ही कांदा कापणार असाल तेव्हा कापलेला कांदा हा समोर असलेल्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये ठेवत असता. त्यावेळी त्या कांद्यामुळे देखील डोळ्यांना खूपच त्रास येत असतो. अशा वेळी ज्या प्लेटमध्ये तुम्ही कापलेला कांदा ठेवत असाल त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून ठेवावे व त्यामध्ये प्रत्येक वेळी चिरलेला कांदा टाकत जावा. असे केल्याने डोळ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही.

हे वाचा:   डोळ्यावरचा चष्मा काढून फेकावा लागेल.! कंबर, गुडघे, पोटरी आता कोणाचीच दुखणार नाही, आयुष्यात एकदा तरी प्यावे हे असे दूध.!

जेव्हा पण तुम्ही कांदा कापणार आहात तेव्हा घरांमध्ये चालू असलेले पंखे बंद करावे. कांदा कापण्या पूर्वी पंधरा मिनिटाकरिता फ्रीजमध्ये ठेवावा. जेव्हापण तुम्ही जास्त प्रमाणात कांदा कापणार असाल व तुम्हाला अशा प्रकारची समस्या निर्माण होणार असेल तर अशावेळी ज्या ठिकाणी तुम्ही कांदा कापणार आहात त्या ठिकाणी एखादी मेणबत्ती लावावी. यामुळे कांद्यातून निघणारा गॅस हा त्या मेणबत्तीच्या प्रकाशाकडे खेचला जाईल.

अशा प्रकारच्या या काही टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *