जेवणात पडले आहे जास्त तिखट, तिखट भाजी खण्याऐवजी करा हे काही उपाय.!

आरोग्य

अनेकदा जेवण बनवत असताना आपल्याकडून बऱ्याच चुका घडत असतात. अनेक महिलांकडून जेवण बनवत असताना भाजी मध्ये जास्त मीठ पडले जाते. यामुळे पूर्ण भाजीची चव बिघडते असते. यासाठी देखील उपाय आहेत. तुम्ही सहजपणे भाजीत जास्त पडलेले मीठ काढू शकता. परंतु काही वेळा जेवण हे खूपच तिखट होत असते.

भाजी मध्ये जास्त मिरची पावडर किंवा मिरची पडली तर यामुळे संपूर्ण जेवण हे तिखट बनत असते. अशा वेळी नेमकी आपण काय करावे हेच आपल्याला सुचत नसते. कारण अशा प्रकारे बनवलेले हे तिखट जेवण कोणीही खात नाही. मग आपल्याला वाटते की आता पूर्ण जेवण वाया गेले. परंतु असे अजिबात होणार नाही. आम्ही तुम्हाला यासाठी खूपच सोपा असा उपाय घेऊन आलो आहोत.

हे वाचा:   ज्यांच्या घरात असतो हा पदार्थ तिथे एकही मुंगी जाऊ शकत नाही.! मुंग्यांचा वैताग आला असेल तर त्यांच्यापुढे ही एक वस्तू ठेवा.!

तिखट जेवण बनवल्यानंतर लहान मुलांना जेवण खाणे अशक्य असते. अशावेळी आपले डोके बंद पडत असते. हे काही उपाय तुम्ही केले तर तुमच्या भाजी मध्ये पडलेले जास्त चे तिखट निघून जाईल व तुमच्या जेवणाचा स्वाद देखील आणखी वाढला जाईल. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे उपाय. कोण कोणत्या पद्धतीने तुम्ही जीवनातले तिखट कमी करू शकता.

टोमॅटो: टोमॅटोची पेस्ट बनवून भाजीत भर घातल्यास तिचा तिखटपणा कमी होऊ शकतो. भाजीतले मसाले कमी करण्यासाठी आधी वेगळ्या पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून नंतर टोमॅटो प्युरी घालून फ्राय करावे. यानंतर, भाजीमध्ये घालावे आणि चांगले मिसळून घ्यावे. असे केल्याने भाजीतले सर्व तिखट कमी होईल.

बेसन पीठ: जर तुम्ही कोरडी भाजी बनविली असेल, आणि त्यात जर तिखट हे जास्त झाले असेल तर त्याचे तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे बेसनपीठ भाजून घ्यावे आणि त्यात टाकावे असे केल्याने तिखटपणा सर्व नाहीसा होईल.

हे वाचा:   घरी बनवा ही अशी क्रीम, चार चौघात उठून दिसायचे असेल तर आतापासूनच करा तयारी.! या फुलापासून फक्त पंधरा मिनिटात तयार होईल घरगुती क्रीम.!

साखर: जर आपण पनीर ची भाजी किंवा कोफ्ता सबजी बनविली असेल तर आपण त्यात थोडी साखर देखील घालू शकता. हा उपाय केल्याने भाजीतला सर्व तिखटपणा नष्ट होईल व भाजीची चव देखील बिघडली जाणार नाही. अत्यंत सोपे असे हे घरगुती उपाय तुम्ही नक्की करायला हवे.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *