चमचाभर मोहरी अशी वापरा, गजकर्ण बघायला सुध्दा उरणार नाही.!

आरोग्य

पावसाळा सुरू झाला की वेगवेगळे आजार डोके वर काढत असतात. पावसाळ्या मधील उद्भवणारा सर्वात भयंकर व त्रासदायक अनुभव देणारा आजार म्हणजे गजकर्ण, त्वचारोग, खरूज, नायटा. ही समस्या अनेक लोकांमध्ये दिसून आली आहे. खास करून ही समस्या पावसाळ्यात जास्त दिसून येत असते. ही अशा प्रकारची समस्या निर्माण होण्याचे मुख्य कारण आहे ते म्हणजे अस्वच्छता.

जर आपण चांगले स्वच्छ कपडे परिधान केले तसेच, शरीराची चांगली काळजी घेतली तर त्वचा रोग कधी होणार नाहीत. अतिशय त्रासदायक अनुभव देणारा हा आजार अनेक लोकांना आहे या आजाराने अनेक लोकांना ग्रासलेले आहे. गजकर्ण हा कोठेही निर्माण होऊ शकतो शरीराच्या कुठल्याही भागावर हा निर्माण होऊ शकतो.

तर मित्रांनो आजच्या या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला गजकर्ण झाल्यानंतर काय करावे व काय करू नये याबद्दल ची सर्व माहिती सविस्तरपणे सांगणार आहे. ही माहिती तुमच्या साठी अत्यंत उपयुक्त असणार आहे. यामुळे तुमच्या त्वचा संबंधीच्या सर्व समस्या कायमच्या दूर झालेल्या तुम्हाला दिसतील. चला तर मग सुरु करूया.

हे वाचा:   रोज झोपण्याआधी जर पाणी पित असाल तर एकदा हे पण वाचा.! झोपण्याआधी पाणी शरीरात गेल्यास नेमके काय होते.?

हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त दोन चमचे मोहरी लागणार आहे. मोहरी आपण या उपायासाठी का वापरणार आहोत तर मोहरी मध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामुळे त्वचा संबंधीच्या सर्व समस्या दूर करण्याची ताकद असते. मोहरी मुळे याबरोबरच अनेक फायदे देखील शरीराला होत असतात.

याबरोबरच यामध्ये असे अनेक औषधी गुणधर्म असतात ज्यामुळे आपले त्वचा खूपच चांगली बनत असते. हा उपाय करण्यापूर्वी ज्या ठिकाणी आपल्याला गजकर्ण झालेला आहे ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन काढायची आहे. त्यानंतर स्वच्छ कपड्याच्या साहाय्याने ती जागा कोरडी करायची आहे.

दोन चमचे घेतलेली मोहरी मिक्सरच्या साह्याने थोडीशी बारीक करून घ्यायची आहे. याची चांगल्याप्रकारे पूड बनवून घ्यायची आहे व यामध्ये थोडेसे पाणी टाकायचे आहे. याची पेस्ट बनली जाईल याची देखील काळजी घ्यावी. ही पेस्ट ज्या ठिकाणी गजकर्ण झालेला आहे त्या ठिकाणी लावून द्यावी.

हे वाचा:   अंड्याची बिर्याणी बनवताना त्यात ही एक गोष्ट टाकायला विसरु नका.! हॉटेल सारखी बिर्याणी घरीच बनवा.! अतिशय छान चव येईल.!

असे साधारणता एक तासापर्यंत ठेवायचे आहे. त्यानंतर कोमट पाण्याच्या सहाय्याने ही जागा पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून काढायची आहे व पुन्हा कोरडी करायची आहे. जर तुम्ही हा उपाय काही दिवस करत राहिलात तर यामुळे तुम्हाला नक्कीच भरपूर फायदा होईल.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *