सात दिवसात सात किलो वजन कमी, लोण्यासारखी चरबी वितळेल.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, स्त्री असो किंवा पुरुष वाढलेले वजन हे दिसायला बेढब तर दिसतेच पण अनेक रोगांना निमंत्रण देते. तुमचे पोट सुटलेले असेल, तुम्हाला थायरॉइडचा त्रास असेल, शरीरातील कोणत्याही भागावर चरबी वाढली असेल त्यावर हमखास रामबाण उपाय असं एक ‘वेटलॉस ड्रिंक’ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तेंव्हा लठ्ठपणाला आता करा बाय-बाय आणि तयार व्हा आपले वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी..!

बाजारात असंख्य उपाय उपलब्ध आहेत. पैकी, बरेचसे उपाय हे डायबेटिसच्या आणि थायरॉईडच्या रोग्याला करता येत नाहीत. पण पुढील उपाय हा सर्व लोकांना करता येणार आहे. शिवाय नुकत्याच प्रसूत स्त्रिया यांना पोट सुटणे ही मोठी समस्या असते तर त्या देखील हा उपाय नक्कीच करू शकतात. याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. यासाठी घरातीलच पाच वस्तू लागणार आहेत.

यासाठी एक लिटर पाणी उकळत ठेवावे. पहिला घटक आपल्याला लागणार आहे एक अक्खी दालचिनीची कांडी. शरीरावरील अनावश्यक चरबी झपाट्याने कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. याने बीपीचा त्रास कमी होतो. दालचिनी मुळे इन्स्टंट एनर्जी मिळते.( रेडीमेड दालचिनी पावडर वापरू नये त्यात भेसळ असण्याची शक्यता असते.)

दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे एक चमचा कुस्करून घेतलेले धने. पित्ताचे विकार,उष्णतेचे विकार धन्यामुळे नाहीसे होतात. तसेच पचनासाठी याचा उपयोग होतो. हृदयासाठी फायदेशीर असतात. पोटातील जंत ही धन्यामुळे नष्ट होतात. तिसरा घटक म्हणजे एक चमचा जिरे. जिरे अत्यंत पाचक असतात. यामुळे पोटातील वायू बाहेर पडतो.

हे वाचा:   सकाळी उठल्याबरोबर तोंड न धुता प्या ही एक गोष्ट; पचना संबंधीची कसलीच समस्या उद्भवणार नाही.!

हे परिणामकारकरीत्या फॅट बर्न करतात. ऍसिडिटी, बद्धकोष्ठता यावरही जिरे प्रभावशाली ठरतात. शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यासाठी याची मदत होते. चौथा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दोन सोललेल्या विलायची. विलायची ही अत्यंत प्रभावशाली फॅट बर्न करते. मसाल्यांची राणी असलेली ही विलायची पचनक्रिया सुधारते.

पाचवा घटक आपल्याला लागणार आहे तो म्हणजे दोन तेजपत्ता ( तमालपत्र). मसाल्यातील हा एक पदार्थ वजन कमी करण्यासोबतच केस गळतीवर ही अत्यंत उपयुक्त आहे. ‘अ’ व ‘क ‘ जीवनसत्वाने भरपूर असलेल्या तमालपत्रात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. यामुळे शरीरातील ‘मेटाबॉलिझम’ वाढते. ज्यामुळे शरीरातील अनावश्‍यक चरबी निघून जाते. असे हे पाचही घटक आपल्याला त्या गरम पाण्यामध्ये टाकायचे आहेत.

हे पाणी आपल्याला सुमारे पंधरा मिनिटे उकळत ठेवायचे आहे. पाणी उकळताना यावर झाकण ठेवावे. (उघडे ठेवू नये )पंधरा मिनिटानंतर हा काढा आपण गाळून घ्यायचा आहे. गाळुन घेतल्यानंतर या पाण्याचे तीन भाग करावे. पहिला भाग हा सकाळी काहीही न खाता-पिता घ्यायचा आहे. आणि त्यानंतर एक तास काही खायचे नाही. पुढे तुमचा जो रोजचा आहार आहे तो सुरू ठेवावा.

हे वाचा:   सततच्या पोट दुखीला कंटाळला आहात तर एवढे एक काम करा.! या उपायाने कोणतीही पोट दुखी लगेच थांबते.! महिलांनी नक्की वाचा.!

दुसरा भाग हा तुम्ही दुपारच्या जेवणानंतर एक तासाने प्यायचा आहे. दुसरा भाग पीत असताना तो कोमट करून घ्यावा. तिसरा भाग सुद्धा आपण संध्याकाळी जेवणानंतर एक तासाने घ्यायचा आहे. तेव्हाही तुम्ही तो भाग कोमट करूनच घ्यावा. असं तुम्हाला दिवसातून तीन वेळा हे वेट लॉस ड्रिंक प्यायचे आहे. सकाळी एकदाच हा काढा बनवावा. तिसऱ्या दिवसा पासूनच तुम्हाला तुमच्यात फरक जाणवेल. या काढ्यामुळे फक्त वजनच कमी होत नाहीतर तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

अपचन ऍसिडिटी सर्व त्रास जातील. मेटॅबॉलिझम वाढते ज्यामुळे झपाट्याने वजन कमी होण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तातील युरिक एसिड निघून जाते. ज्यांना गाऊट चा त्रास आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहावा. सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे याने वजन 100% खात्रीशीर कमी होतेच..! याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

टीप : हा काढा सकाळी बनवल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचा नाही. यावर थेट सूर्यप्रकाश पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *