काय तुम्हाला पण डासांनी त्रस्त केलंय? चिंता करू नका, डासांचा काळ आहे हा उपाय. आजच जाळा आणि आजच अजमवा. बघा तुमच्या घरादारातून डास असे पळून जातील की कधी नव्हतेच. कोणत्याही ऋतुत खास करून पावसाळ्यात घराच्या कानाकोपऱ्यात डास लपून बसतात. आणि संध्याकाळी सगळ्यांना चावायला लागतात.
डास चावल्यानंतर रक्त येणे, दुखणे हे तर होतेच पण सोबतच मलेरिया, चिकनगुनिया सारखे घातक रोग होतात. म्हणून डासांना आपल्या घरातून पळून लावणे महत्त्वाचे आहे. हजारात गूड नाईट मोस्क्विटो कॉइल सारखे अनेक उपाय उपलब्ध आहेत पण याच्या जळण्याने निघणारा धूर आपल्या फुफुसं आणि बाकी शरीरातील अवयवांना घातक आहे.
म्हणूनच अमेरिका सोबत अनेक शेकडो देशांत हे खरेदी करायला बंदी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत गावाकडील एक अनोखा उपाय.. गावाकडील लोक आजही याला नेहमीच जाळतात. पण हे नेमकं कसं जाळतात याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत. हे जाळण्यामुळे तुमच्या घरातील डास तर जातीलच परंतु घर सुगंधित होईल आणि त्यातून निघणाऱ्या धुरामुळे तुमचं फुफ्फुसांचे कुठलेही नुकसान होणार नाही.
हा उपाय १००% काम करतो. यासाठी तुम्हाला गाय किंवा म्हशीचे वाळलेले शेण घ्यायचे आहे. (उपला ) छोटे छोटे तुकडे करून घ्या. पुढची गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे नीम तेल. हे तेल जाळल्याने असा काही दूर निघतो की जो डासांना सहन होत नाही. आणि डासांना पळून जावेच लागते. एक ते दीड चमचा नीम तेल त्या उपल्यावर शिंपडावे. आता ४-५ कापूर घेऊन त्यावर टाका.
नंतर दिवाळीत वापरलेला असा दिवा घ्या की ज्याला ४-५ छोटी छिद्र असतील.(नसेल तर छिद्र बनवा )आणि एका वाटीत ते वाळलेल्या शेण, निम तेल आणि कापूर यांचे मिश्रण घेऊन, कापूर जाळा. हळू हळू धूर निघणे सुरु होईल. थोडा दूर निघाल्यानंतर तो छिद्र असलेला दिवा त्या वाटीवर उलटा झाकावा. अस केल्याने आतील जळणे बंद होऊन धूर चारही दिशांना पसरायला मदत होईल.
आणि हळूहळू तुमच्या घरातील कानाकोपऱ्यात लपलेल्या डास पळून जातील. तुमचं घर नीम तेलाने सुगंधित होईल. तुम्ही आजचा प्रयोग करून पहा आणि डासांच्या होणार्या त्रासापासून मुक्ती मिळवा. Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.