तुम्ही रोज सकाळी शिळी चपाती किंवा भाकरी खाता का.? शिळी झालेली पोळी खाल्ल्याने पोटात नेमके काय होते माहिती आहे का.?

आरोग्य

‘आरोग्य हीच खरी धन संपदा’ ही म्हण आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. एका चांगल्या आरोग्यासाठी आपण व्यायाम करतो सोबतच चांगले अन्न ग्रहण करतो. शरीराच्या अवयवांची निगा राखतो. आपले आरोग्य चांगले राहणे हे आज कालच्या या धावत्या जगात खूप महत्वाचे आहे.जर तुम्ही फिट असाल तरच मेहनत करु शकता.

आपले चांगले आरोग्य हीच आता आपल्या काळाची गरज बनली आहे. आपल्या घरात असा एक पदार्थ आहे जो आपल्या आरोग्यासाठी संजीवनी आहे. आज आम्ही तुम्हाला शिळ्या चपाती बद्दल थोडी माहिती सांगणार आहोत. आपल्या रात्रीच्या जेवणात काही चपात्या उरतातच मात्र आपण त्या कचर्यात टाकून देतो अथवा कोणत्या तरी पशू प्राण्याच्या स्वाधीन करतो. मात्र असे करणे फार अयोग्य आहे. हीच शिळी चपाती आपल्या शरीरासाठी एक उत्तम आहार आहे.

अनेक रोगांना नियंत्रीत करण्यासाठी शिळी चपाती खाणे खूप फायदेशीर मानले जाते. चला आता वेळ न दवडता विस्तारात पाहूया रिकामी पोटी शिळी चपाती खाल्याचे फायदे. मित्रांनो रिकामी पोटी शिळी चपाती दूधासोबत खाल्याने आपल्या त्वचेवर चांगला निखार येण्यास सुरवात होते. कोरड्या त्वचेवर शिळी चपाती दूधासोबत खाणे हा एक रामबाण उपाय आहे. सोबतच चेहर्यावर उठणारे काळे डाग व पूरळे घालवण्यासाठी देखील तुम्ही शिळ्या चपातीचे सेवन करु शकता.

हे वाचा:   त्वचेवर आणि केसांवर दुधाचा वापर करणाऱ्यांनो, ही माहित असू द्या मगच चेहऱ्यावर वापरा दूध.!

डोकेदुखीचा त्रास ज्यांना होतो त्यांनी रोज उठल्यावर अगदी काही न खाता फक्त एक शिळी चपाती खावी काही दिवसातच डोकेदुखी गायब होईल. घरोघरी आता एक सामान्य झालेला विकार म्हणजे मधुमेह. या आजारावर प्रत्येक महिन्याला आपला खूप पैसा खर्च होतो. अनेक महागडी औषधे आपल्याला रोज खावी लागतात. या कृत्रिम औषधांचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो.

मात्र सकाळी रिकामी पोटी शिळी चपाती खाल्यास आपली साखर नियंत्रणात राहते व मधुमेहचा त्रास कमी होवू लागतो. रोज शिळ्या चपातीचे सेवन आपली रोगांशी लढण्याची ताकद म्हणजेच रोग प्रतिकारक शक्ती देखील वाढवण्याचे काम करते. यानेच तुम्हाला होणार्या सर्दी व खोकल्याची समस्या गायब होईल. अनेकांना अन्न योग्य वेळी पचन न होण्याची समस्या असते. त्यांच्या साठी देखील ही शिळी चपाती एक नैसर्गिक पण रामबाण उपाय आहे.

तुमची पचन संस्था मजबूत करण्यासाठी ही शिळी चपाती खूप फायदेशीर आहे. त्याच बरोबर तुम्हाला पित्त अथवा गॅसचा नियमित त्रास असेल तर मधासोबत शिळ्या चपातीचे सेवन करा. याने तुम्हाला दिवसभरात काही ही खाल्ले तरी पित्ताचा त्रास जाणवणार नाही. पोट साफ करण्यासाठी देखील शिळी चपाती उपयुक्त आहे. सांगायाचे उद्देश्य म्हणजे पोटाचे सगळे विकारी हे या शिळ्या चपातीने बरे होतील.

हे वाचा:   शरीरातील हे १८ रोग मुळापासून नष्ट करतात या बिया, फक्त लोक खाताना करतात ही चूक.! खूपच फायदेशीर माहिती.!

मित्रांनो किती ही चांगले अन्न खावून ही ज्यांचे वजन वाढत नाही. जे खूप बारीक आहेत तब्येतीत सुधारणा हवी असेल अश्या लोकांनी देखील सकाळी रिकामी पोटी एक नाही तर दोन शिळ्या चपात्या आवर्जून खाव्यात याने थोड्याच दिवसात तुमचे वजन ही वाढू लागले व चांगली तब्येत ही बनेल. कामाचा थकवा अथवा ताण जाणवत आहे ज्यांना अशक्तपणा व कामात लक्ष्य लागत नाही अश्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे त्यांनी सकाळी-सकाळी एक शिळी चपाती नक्कीच खावी.

याच्या सेवनाने पूर्ण दिवस तुमच्या शरीरात उर्जेची कमी अजिबात जाणवणार नाही. असे अनेक शारीरिक फायदे आपल्याला शिळ्या चापतीतून मिळतात. परंतू आपण याला खराब म्हणून टाकून देतो. असे न करता यांचे सेवन करा व चांगले आरोग्य मिळवा. कारण ‘आरोग्य हीच खरी धन संपदा’. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.