ही एक वस्तू तुळशीच्या कुंडीत टाका आणि बघा जादू, दोनच दिवसात तुळस हिरवीगार होईल.!

आरोग्य

मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये अंगणात असणाऱ्या तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे हे आपण जाणतो. असं म्हणतात अंगणात बहरलेली हिरवीगार तुळस हे तुमच्या घरातील पवित्रता, स्वास्थ्य, धनप्रकृती दर्शवते. बऱ्याच लोकांची तक्रार असते की खुपदा तुळस लावून पाणी घालूनही वाढ होत नाही किंवा ती लवकर सुकून जाते. पानं पिवळी पडतात. थंडीमध्ये किंवा खतांचा अति वापर केल्यामुळे अशी समस्या होणे स्वाभाविक आहे.

आयुर्वेदातही तुळशीचे किती महत्व आहे हे नवीनपणे सांगायला नकोच. जर तुमचं तुळशीच रोपं सुकत असेल तर ही माहिती तुमच्या फायद्याची आहे. आज आपण पाहणार आहोत, वाळणाऱ्या तुळशीच्या रोपाला आपण पुन्हा एकदा कसं हिरवेगार बनवू शकतो? एक असं सेंद्रिय खता बद्दल ही आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे तुळशीचं रोप सुकण्यापासून वाचू शकते. पुन्हा हिरवेगार होईल.

सर्वप्रथम तुम्हाला एक काम करायचे आहे. तुळशीच्या सुकलेल्या फांद्या तुम्हाला कापायच्या आहेत. तुळशीचे रोप वरच्या बाजूने सुकते. ते पाहून वाळलेल्या फ़ांद्या कट करा. हे कट करताना जी कात्री कटर तुम्ही वापरणार आहात ते डेटॉल /सॅव्हलोन निर्जंतुक करून घ्या. असे केल्याने फन्गल /बॅक्टेरिअल इन्फेक्शन होणार नाही. जास्त पाणी दिल्यामुळे तुळशीचे रोप सुकते तर तुळशीच्या रोपाला जास्त मंजिऱ्या उगवल्या तर तरीसुद्धा ते सुकायला लागते.

हे वाचा:   पांढरे केस तोडल्यास संपूर्ण डोके पांढरे होते का.? दिसेल तेव्हा डोक्याचे सफेद केस तोडणारे एकदा नक्की वाचा.!

कारण ते तुळशीचे बी असते आणि बी बनवण्यासाठी त्या रोपाची खूप सारी ऊर्जा जाते. आणि रोप सुकू लागते. त्यासाठी तुम्ही वेळोवेळी तुम्ही तुळशीच्या मंजीरा खुडाव्यात. तुमच्या तुळशीचे रोप हिरवेगार आणि वाढतच राहील. तुळशीचे रोप हे तुम्ही अशा जागी ठेवा की तिथे दिवसभर ऊन येईल. रोपाच्या चांगल्या वाढीसाठी अत्यंत जरुरी आहे. परंतु उन्हाळ्यात मात्र थोड्याशा सावलीतच हे रोप हलवावे.

याउलट थंडीच्या दिवसात मात्र हे रोप उन्हात ठेवावे सायली ठेवला नाही याच्या पानांवर फंगस लागते. अशाप्रकारे तुळशीचे रोप थंडीच्या दिवसात ही सुकण्यापासून तुम्ही वाचवू शकता. तुळशीची माती सतत ओली राहील याची काळजी घ्यावी. पावसाळ्यात पावसाचे पाणी तुळशी साठी अत्यंत लाभदायक आहे या पाण्यात नायट्रेट असते ते जमिनीत जाऊन नायट्रोजन बनते आणि त्यामुळे आपल्या तुळशीचे रोप अत्यंत वेगाने वाढते.

थंडीच्या दिवसात सात दिवसातुन एकदा या झाडांना पाणी द्यावे. थंडीच्या दिवसात या रोपाची फार वाढ नसते त्यामुळे पाणी कमीच लागते. कोणतं खत वापरावे? वाळलेले तुळशीचे रोप पुन्हा एकदा हिरवेगार बनवण्यासाठी आपल्याला सेंद्रिय खत बनवावे लागेल. चुना आणि मस्टर्ड केक (मोहरीच केक ).. पान खायचा चुन्यामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते.

हे वाचा:   या पानाचा एकच खुराक असा घ्या.! कमजोरी कायमची निघुन जाईल.! आता म्हातारा पण दिसू लागेल तरुण.!

तर मस्टर्ड केक मध्ये झिंक नायट्रोजन असे अनेक पोषक तत्व असतात ज्यामुळे तुळशीच्या रोपाची वाढ चांगली होते. १लिटर पाणी, १० ग्रॅम चुना, ३० ग्रॅम मस्टर्ड केक घेऊन एकत्र करा. हे ऊन पडणार नाही अशा जागी साधारण २४ ते ४८ तास ठेवा. आणि तुमचे तुळशीच्या रोपाला देण्यासाठीचे सेंद्रीय खत तयार! प्रत्येक १० दिवसांनी आपण या खताचा वापर तुळशीच्या मातीत करणार आहोत.

यामुळे काही दिवसातच आपल्या तुळशीचे रोप चांगल्या प्रकारे हिरवेगार होऊन वाढीस लागेल आणि सुकण्यापासून वाचेल. साधारण दोन महिन्यातच तुम्हाला अपेक्षित रिझल्ट दिसेल. टीप : सुकलेली पानं फ़ांद्या वेळोवेळी कट करत रहाव्या. मंजिऱ्या लागत नसल्यास त्या खुडाव्यात. तीन महिन्यात तुम्हाला विश्वास बसणार नाही इतकी गजब वाढ होईल.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *