जबरदस्त इम्युनिटी वाढेल, कुठल्याही प्रकारचे व्हायरल इन्फेक्शन नेहमी दूरच राहिल, रोगांशी लढण्याची ताकद प्रचंड वाढेल…!

आरोग्य

आज कालच्या या काळामध्ये अनेक संसर्गजन्य आजार उद्भवत आहे. अशा या आजारांना दूर ठेवण्यासाठी आपल्याकडे भरपूर ताकद असणे गरजेचे आहे. ताकद वाढवण्यासाठी आपण इम्यूनिटी बूस्टर चा वापर करणे खूप गरजेचे आहे. इम्यूनिटी बूस्टर करणे म्हणजे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे होय. ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती भरपूर असते अशा व्यक्तीला कुठल्याही आजारांबरोबर लढण्याची ताकद मिळत असते.

 

आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणे खूप आवश्यक आहे. अनेकदा आपल्याला घशा संबंधीच्या काही समस्या उद्भवत असतात. अशा संबंधीच्या समस्या असो किंवा सर्दी किंवा कफ संबंधीच्या समस्या असो सर्व समस्या दूर करण्यासाठी एक घरगुती पद्धतीचा काढा करून प्यायला हवा. हा काढा इतका रामबाण आहे की यामुळे कुठलीही समस्या अगदी सहजपणे दूर होऊ शकते तसेच यामुळे रोगप्रतिकारकशक्ती देखील भरपूर वाढत असते.

हे वाचा:   इम्युनिटी मजबूत करायची आहे का? मग घरातल्या सगळ्या व्यक्तींना प्यायला सांगा हा काढा, बनवण्यासाठी अत्यंत सोपा कोणीही बनवू शकतो

 

हा काढा बनवण्यासाठी तुम्हाला “तेज पत्ते” याची गरज भासणार आहे. हा काढा कशाप्रकारे बनवायचा आहे व याचे कशाप्रकारे सेवन करायचे आहे हे आपण पाहूया. त्यानंतर आपल्याला लवंग या मसाल्याच्या पदार्थाची आवश्यकता भासेल. लवंगा मुळे इम्युनिटी ही भरपूर प्रमाणात वाढत असते. त्यामुळे या काढ्यामध्ये लवंग खूप महत्त्वाची ठरेल.

 

एका कापा मध्ये थोडेसे गरम पाणी घेऊन त्यामध्ये एक ते दोन लहान तेज पत्ते टाकावे याला चांगल्या प्रकारे हलवून घेऊन त्यानंतर यामध्ये एक ते दोन लवंग टाकाव्यात. लवंगाच्या वरचा भाग काढून टाकावा. जर लवंग खूपच लहान असतील तर दोन लवंग घ्याव्यात नाही तर एक लवंग देखील या उपायासाठी पुरेशी आहे. त्यानंतर या ग्लासाला एखाद्या भांड्याच्या सहाय्याने झाकून ठेवावे.

 

या दोन्ही गोष्टींचा रस चांगल्या प्रकारे या पाण्यामध्ये उतरला जाईल. पाच ते दहा मिनिटे झाल्यानंतर या मिश्रणाला चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यावे. त्यानंतर हा काढा सकाळी किंवा सायंकाळच्या वेळी प्यावा. गाळल्या नंतर उरलेले तेज पत्ते व लवंग हे तसेच ठेवावे. ज्यावेळी तुम्ही पुन्हा काढा बनवणार आहात तेव्हा पुन्हा त्याच पदार्थांमध्ये गरम पाणी टाकून अशा प्रकारचा उपाय पुन्हा करावा. याचे आपल्या शरीरासाठी भरपूर फायदे होतील.

हे वाचा:   तुमचे वय कितीही असू द्या 50 असो किंवा 60.! या एका पदार्थाचा वापर केला तर येईल 25 चा जोश.! वैवाहिक जीवन राहील खूपच आनंदी.!

 

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

 

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *