मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ‘ब्लॅक टी’ पिण्याचे आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात. तर तुम्ही कोरा चहा /काळा चहा पीत असाल तर सर्वप्रथम तुमचे अभिनंदन तुम्ही अगदी योग्य चहा पीत आहात. जे लोक दूध घालून चहा पितात त्यांनी ही माहिती पूर्ण वाचल्यावर आमची खात्री आहे की अगदी आजपासूनच तुम्ही कोरा चहा घेण्यास सुरुवात कराल.
आयुर्वेदाने काळा चहा पिण्याचे अनेक फायदे सांगितलेले आहेत. काळा चहा खरंतर अमृतासमान असतो. जे लोक नियमितपणे काळा चहा पितात त्यांना सर्वप्रथम मोठा फायदा असा होतो की त्यांचा मेंदू कार्यरत, शार्प राहतो. कोरा चहा पिल्याने आपल्या मेंदूला चांगल्याप्रकारे रक्तपुरवठा होतो. रक्त पुरवठा वाढल्याने मेंदूच्या पेशी स्वस्थ राहतात आणि त्यामुळे आपल्या स्मरणशक्ती मध्ये वाढ होते.
जर तुम्हाला बौद्धिक काम खूप मोठ्या प्रमाणावर असेल, तुमचा मेंदू थकून जात असेल तर अशावेळी त्या व्यक्तींनी आवर्जून नियमितपणे कोरा चहा नक्की प्यावा. ज्यांना लहान-सहान गोष्टींवरून ताणतणाव घेण्याचा स्वभाव आहे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरून तणाव येतो, अशा लोकांनी स्ट्रेस दूर करण्यासाठी कोरा चहाचा नियमित पणे सेवन करावे. तुमचे ताणतणाव कमी करण्याचं काम हा काळा चहा करेल.
आज-काल कॅन्सर चे वाढते प्रमाण बघता गोष्टी खूप अवघड झाले आहेत असे वाटते. कॅन्सर कोणालाही होऊ शकतो. कॅन्सर पासून आपला बचाव करायचा असल्यास आपल्याला आपल्या आहारामध्ये काही बदल करावे लागतात. त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे काळा चहा. नियमितपणे कोरा चहा सेवन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या कॅन्सर चा धोका तुलनेने कमी असतो.
तोंडाचा कर्करोग, स्तन कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, फुप्फुसांना होणारा कॅन्सर..इत्यादी अनेक प्रकारच्या कर्करोगानं पासून आपला बचाव होऊ शकतो. मित्रांनो जर तुम्हाला स्वस्थ रुदय हवा असेल, तुमच्या शरीरातील रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले असेल तर आपण आजपासूनच कोरा चहा घ्यायला सुरुवात करा. कोऱ्या चहामध्ये फ्लनोईड चे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
यामुळे आपल्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. परिणाम रक्त गोठण्याची प्रोसेस मंदावते आणि आपल्या धमन्या निरोगी राहतात. याप्रकारे आपले हृदय निरोगी राहून हृदय विकाराचा झटका हृदयासंबंधी कोणताही रोग होत नाही. त्यानंतर पुढील फायदा, जर आपल्याला गॅस ऍसिडिटी पचनास संबंधित तक्रारी असतील तर तुम्ही नियमित काळ्या चहाचे सेवन करा.
पोट दुखी असल्यास हा कोरा चहा थोडा जास्त वेळ उकळावा आणि मग घ्यावा. असं केल्याने पोट दुखी थांबते. त्वचा संबंधित असलेल्या तक्रारींवर ही काळा चहा वरदान आहे. चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे यावर नियमित काळा चहा सेवन करा सोबतच योगा आणि प्राणायामाची जोड द्या सुरकुत्या गायब होतील. काळया चहामध्ये एंटीऑक्सीडेंट चे प्रमाण खूप जास्त असते ज्याचा फायदा त्वचेचा कर्करोगापासून लांब राहण्यासाठी होतो.
हल्ली लठ्ठपणाच्या तक्रारी सगळ्यांनाच भेडसावतात. नियमित कोरा चहा चे सेवन केल्याने आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम( चयापचय ) रेट वाढतो. परिणामी, पचनक्रिया सुधारते. शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी होते. असं केल्याने आपोआपच शरीराचे वजन नियंत्रणात राहते. लठ्ठपणा जाऊन तुम्ही सुडौल व्हाल. सोबत व्यायामाची जोड मात्र हवीच. अशाप्रकारे कोराच आहात हे अनेक फायदे आहेत. प्रेमा दूध घालून चहा पिण्यापेक्षा तुम्ही आजपासूनच कोरा चहा पिण्यास सुरुवात करा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.