नमस्कार मित्रांनो, आम्ही दररोज तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती आवडत असतो. हीच प्रथा पुढे चालवत आज आपण जाणून घेणार आहोत एक अशा दिव्य आणि अद्भुत जडीबुटी बद्दल जी रिकामी जागा, रस्त्याच्या कडेला, शेताच्या आसपास सर्वांत जास्त आढळते. तुम्ही या वनस्पतीला नक्की बघितले असणार..!
ही वनस्पती पूर्ण भारतात बऱ्याच ठिकाणी आढळते. या वनस्पतीच्या सर्व हिश्यावर काटेच काटे असतात. या वनस्पतीचे नाव आहे छोटी काटेरी. यात दोन प्रकार असतात. निळ्या आणि पांढऱ्या रंगाची फुले असणारी छोटी काटेरी. या वनस्पतींना लिंबाप्रमाणे फळेसुद्धा येतात. जी पिकल्यावर पिवळी रंगाची होतात. संस्कृत मध्ये या वनस्पतीला कट कारी असे म्हणतात.
आयुर्वेदात सांगितलेल्या माहितीनुसार कटेरी उष्ण, पित्तशामक, कटू, कफ विकार दूर करणारी असते. याचा प्रयोग केल्याने सर्दी, खोकला, डोकेदुखी, दात दुखी, डाग खाज खुजली च्या समस्या ठीक होऊ शकतात. याची वाळलेली 1 ते 2 ग्रॅम फुले मधासोबत सेवन केल्याने कितीही जुना खोकला असू दे तो गायब होईल. अस केल्याने तुमची सर्दी-पडसे ची समस्याही दूर होईल.
तुम्हाला जर सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर वनस्पतीच्या फळांचा रस डोक्यावर लावल्याने डोकेदुखीत आराम मिळतो. ज्या लोकांना दात दुखी चा त्रास आहे, या वनस्पतीची मुळे, पान आणि फुलं एकत्रित घेऊन काढा करून त्याने गुळना केल्या असता तुम्हाला दात दुखी मध्ये एकदम आराम मिळतो. हिरड्यातून रक्त येणे, तोंडातून दुर्गंधी येणे यासारख्या समस्या ही दूर होतात.
जर त्वचेचे कोणतेही विकार असतील खाज खुजली गजकर्ण नायटा यांसारख्या त्रासाने तुम्ही त्रस्त असाल तर या वनस्पतीच्या मुळांना वाटून त्याचा लेप तयार करून घ्या. आणि संबंधित त्वचेवरती लावा. तुमच्या समस्या दूर होतील. तुम्हाला जर टक्कल पडत असेल तर या संबंधी ही वनस्पती फायदेशीर आहे. या वनस्पतींच्या फळाच्या रसामध्ये मध मिक्स करून जिथे केस गेले आहेत तिथे नियमितपणे लावल्यावर केसं पुन्हा उगवू लागतात.
आयुर्वेदानुसार आम्ही सांगितलेली ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल.. त्याचा तुम्ही फायदा करून घ्या..! जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.