नमस्कार मित्रांनो, कलोंजी म्हणजेच कांद्याचे बी ज्याला नाइजेला सिड्स देखील म्हंटले जाते त्याचे आज आम्ही तुम्हाला अनेक फायदे सांगणार आहोत. स्वयंपाक घरात अनेक अन्न पदार्थांमध्ये आपण याचा वापर अनेक करतो. मुरंबा लोणचे यामध्ये देखील कांद्याचे बी वापरले जाते. आपण याचा वापर अवश्य केला पाहिजे खास करून थंडीच्या दिवसात.
पराठा बनवताना त्या पिठामध्ये थोडेसे हे बी घाला. पदार्थ रुचकर होईलच शिवाय तुमचे पाचनशक्ती सुधारेल. या बियांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम असते. सोबतच या मध्ये हाय प्रोटीन असते. अँटिऑक्सिडंट भरपूर असतात या बिया. यामध्ये anti-inflammatory गुणधर्म देखील आढळतात.
शरीरावर सूज आली असेल, जखम झाली असेल अथवा खाज येत असेल त्या जागी तुम्ही या बिया वाटून त्याची पेस्ट लावा. असं केल्याने तुमची सूज कमी होईल खाज जाईल आणि जखम भरून निघेल. वजन कमी करायचं असेल तर या बीयांचे सेवन तुम्ही अवश्य केले पाहिजे. यासाठी एका ग्लास कोमट पाण्यात थोडा लिंबाचा रस घाला व या पाण्यासोबत कलौंजी औषधासारखं घ्याव.
भाजीत मसाला या प्रमाणे आपण याचा वापर करतो परंतु आयुर्वेदामध्ये अनेक औषधी बनवण्यात वापरल्या जातात या बिया. तुम्ही कल्पनादेखील करू शकत नाहीत इतके रोग ठीक करतात या बिया. सौंदर्यात अनेक ठिकाणी या बियांचा प्रयोग केला जातो. या बियांचा प्रयोग केसांच्या तक्रारी मध्ये तेल बनवण्यात केला जातो. यासाठी एक चमचा कलौंजीच्या तेलात दोन चमचे कस्टर्ड ऑईल आणि बदामाचे तेल मिसळा.
या मिश्रणाने केसांच्या मुळांशी मसाज करा. काही दिवसांतच तुमची केसगळती थांबेल. या बियांचे चूर्ण नारळ तेलामध्ये मिसळून त्वचेवर मालिश केल्यास त्वचेचे विकार दूर होतात. चहामध्ये या बिया टाकून चहा पिल्यास मधुमेह नियंत्रणात राहतो. ज्या लोकांना पित्ताचा आणि उष्णतेचा त्रास आहे त्या लोकांनी यांचे सेवन टाळावे. तसेच गर्भवती महिला आणि स्तनपान करणाऱ्या महिला यांनीदेखील याचे सेवन वर्ज्य करावे.
या बियांचे सेवन केल्यानंतर काही जणांना अंगावर पुरळ उठणे, उलटी, पोटात बिघाड होणे, बद्धकोष्ठता हे त्रास होऊ शकतात. असे झाल्यास आपल्याला या बियांची एलर्जी आहे असे समजावे. कोणताही त्रास होत आहे असे आढळल्यास याचे सेवन त्वरित थांबवा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.