सलग पंधरा दिवसांपर्यंत रोज सकाळी खाल्ले, शरीरामध्ये झाले असे जबरदस्त बदल.! आश्चर्यजनक फायदे नक्की वाचा.!

आरोग्य

मित्रांनो, आज आम्ही तुमच्या सोबत थंडीच्या दिवसांमध्ये खजूर खाण्याचे काही चमत्कारिक फायदे शेअर करणार आहोत. दररोज खजुरचे सेवन आपण केले पाहिजे खास करून थंडीच्या दिवसांमध्ये तर नक्कीच. खजूर खाण्याची योग्य वेळ थंडीच असते कारण खजूर उष्णतेने गरम असतात. लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत दररोज तीन ते चार खजुराचे सेवन सगळ्यांनीच केले पाहिजे.

खजूर वाळवून खारीक बनवतात. तुम्ही खारीक देखील खाऊ शकता दोनही समगुण आहेत. चवीला अत्यंत स्वादिष्ट असलेले खजूर खूप पौष्टिक असतात. अगदी दात नसलेले लोक देखील खाऊ शकतात इतकी मऊ असते खजूर. खजुराचे बी उगळून डोळ्यावर येणाऱ्या रांजणवाडी ला लावतात. असं केल्याने रांजणवाडी ठीक होते. कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असल्यामुळे सांधेदुखी हाडदुखी मध्ये आराम मिळतो.

त्यामध्ये असलेले पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. प्रोटीन, मॅग्नेशियम, लोह, फॅटी असिड, विटामिन ए, विटामिन बी 6, फायबर, विटामिन के या सारखे अनेक पोषक घटकांमुळे खास बनतात हे खजूर. गुणांचा भंडार आहेत खजूर. खजूर धुवून रात्री पाण्यात भिजवून सकाळी खा. किंवा बिया काढून मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून उकळत्या दुधात मिक्स करावी.

हे वाचा:   आवडीने तूप खाणारे.! तुपाचे शरीरात काय होते माहिती आहे का.? तूप शरीरात जाऊन नेमके काय करते.? तुपाचे पचन क्रिया समजून घ्या.!

या दुधाचे सेवन रात्री झोपताना करावे. झोप चांगली लागते. चरबी घटविण्यात आपली मदत होते. हृदयरोग असलेल्यांनी याचे सेवन आवर्जून करावे. खजुराचे नियमित सेवन केल्याने हार्ट अटॅकचा धोका टळतो. पचना संबंधीच्या सर्व तक्रारी दूर होतात. गोड असले तरीदेखील तुमचे वजन घटवू होऊ शकते खजुराचे सेवन. जड असल्यामुळे भूक कमी लागते.

हिमोग्लोबिन च्या समस्या असतील तर त्या देखील नियमित खजुराच्या सेवनाने संपतील. खारीक दोन प्रकारची असते काळी खारीक आणि साखरी खारीक जी पांढऱ्या रंगाची असते. खारीक खजुराच्या मानाने कडक असते. दोन्ही मध्ये सारखे गुण असल्यामुळे तुमच्या आवडीनुसार, उपलब्धतेनुसार कोणत्याही एका गोष्टीचे सेवन तुम्ही नक्की करा.

हाड मजबूत होऊन तुम्हाला ताजेतवाने वाटेल. ह्या दोनही गोष्टी उपवासाला चालतात. बऱ्याच घरांमध्ये खजुराच्या बिया काढून काप करून साजूक तुपात तळून खाल्ले जातात. मिठाई वाल्याकडे गोड चटणी मध्ये देखील चिंचेच्या पाण्यासोबत खजूर घातले जातात. आरोग्याला अत्यंत लाभदायक असतात खजूर..!

हे वाचा:   बऱ्याच दिवसाची गुडघेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी, हातपाय दुखी होणार बरी, लाखो रुपये वाचवणारा उपाय.!

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *