मित्रांनो सकाळी उठल्यावर नियमित पोट साफ होणे किती महत्त्वाचे आहे पोट साफ नसलेली व्यक्ती जास्त चांगल्या प्रकारे समजू शकेल. तुमचं वजन आकारण किलोकिलो ने वाढत जात. तोंडावर सतत पिंपल्स येत असतील आणि वरचेवर ऍसिडिटी त्रास होत असेल तर याचा अर्थ तुमचं पोट स्वच्छ नाही. कारण अनेक आजारपणं आणि आरोग्य समस्यांची सुरुवात पोटाचे विकार आणि पोट स्वच्छ नसल्यामुळे होऊ शकतो.
यासाठीच नेहमी नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करणं गरजेचं आहे. पोट स्वच्छ असेल तर तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते. तुमचं शरीर डिटॉक्स होतं. थोडक्यात शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. ज्यामुळे तुमची पचनसंस्था सुधारते आणि तुम्हाला निरोगी जीवन मिळतं. पचनसंस्था सुधारल्यामुळे पोटात गेलेलं अन्न योग्य पद्धतीने पचत.
जर पोटातील न पचलेलं अन्न तसंच आतड्यांमध्ये पडून राहीलं तर ते सडतं आणि त्याचा परिणाम शरीरावर दिसू लागतो. ज्यामुळे मलावरोध किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. आतड्यांमधील अन्न मळ रूपात शरीराबाहेर पडताना तो कठीण होतो आणि शौचाला त्रास होतो. ज्यामुळे मळ शरीराबाहेर पडत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे खाण्याची इच्छा होत नाही.
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय आणि तरिही तुमचं वजन कमी होत नाही तर हा उपाय जरूर करा. कारण वजन कमी करण्यासाठी तुमची पचनसंस्था सुरळीत असणं खूप गरजेचं आहे. पोट स्वच्छ झाल्यामुळे याचा परिणाम तुमच्या आहार आणि वजनावर दिसून येतो. हा उपाय करतेवेळी खूप पाणी प्या. पुरेशी वेळेत झोप घ्या.
आहारात ताकाचे सॅलेड चे प्रमाण वाढवा. नैसर्गिक पद्धतीने पोट स्वच्छ करण्याची अथवा शरीरा डिटॉक्स करण्याची क्रिया महिन्यातून कमीत कमी एक वेळा तरी करायला हवी. या उपायात आपण हिरडा(हरड ) वापरणार आहोत. हिरड्यातील औषधी गुणधर्मांमुळे अनेक आरोग्य समस्या दूर ठेवता येतात. मुळव्याध ही अशी एक समस्या आहे.
ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनात अनेक अडचणी येऊ शकतात. मुळव्याधीमुळे पोट स्वच्छ होत नाही. ही समस्या देखील आता होईल नाहीशी. यासाठी तुम्हाला लागणार आहे हरड. ही खूप स्वस्त मिळते. चार हरडचे वाटून सात दिवसाचे उपायात वापरता येते. पुढे आपल्याला लागणार आहे ओवा आणि बडीशेप, जिरा आणि काळ मीठ.
चूर्ण बनवण्यासाठी चार हरड, एक चमचा जिरं, एक चमचा ओवा पॅन वर मंद आचेवर हलके भाजून घ्या. हे पूर्ण थंड झाल्यावर दोन चमचे बडीशेप, एक चमचा काळ मीठयात घालून मिक्सरवर वाटून पावडर बनवा. ही पावडर एका बाटलीत बनवून ठेवा. याच सेवन करण्यासाठी जितकं गरम पाणी पिऊ शकता तितके गरम पाणी घ्या. यात एक सपाट चमचा पाण्यात घालून ते सकाळी रिकाम्या पोटी घ्या.
यानंतर एक तास काहीही खाऊ नये. सलग सात दिवस उपाय नक्की करा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.