खाज खरुज चा त्रास आता कायमचा संपणार, पुन्हा पुन्हा होणाऱ्या त्वचारोगावर करावा हा शेवटचा इलाज.!

आरोग्य

खाज अनेक कारणांनी सुटते. खरूज, नायटा इतर सूक्ष्मजंतूंमुळे होणारा दाह, घामोळया, ऍलर्जी किंवा वावडे व उवा ही खाज सुटण्याची प्रमुख कारणे आहेत. घाम येणे, त्वचेची योग्य निगा न राखणे, साफसफाईचे कमतरता यामुळे वाढत जाते खाज. यावर उपचार लवकर केला नाही तर या घरांमध्ये इतर सूक्ष्मजंतूंचा शिरकाव होतो. यामुळे पू होतो व ताप येतो.

नायटामध्ये नेहमी दिसणारा प्रकार म्हणजे अंगावर, जांघेत कमरेवर दगडफुलासारखा दिसणारा व पसरणारा नायटा. यांत त्वचा काळवंडते आणि खूप खाज सुटते. हा आजार बुरशीमुळे होतो. याची मुख्य कारणे म्हणजे अस्वच्छता, दमटपणा, पाण्याची टंचाई, एकमेकांचे कपडे वापरणे, इत्यादी होय.अनेक घरांमध्ये आंघोळीसाठी आडोसा पुरेसा नसतो. यामुळे कंबरेच्या कपडयाखाली नीट स्वच्छता राहत नाही.

या ठिकाणी खरूज, नायटा, गजकर्ण असे आजार वाढतात. बाजारात अनेक मलम औषध यावर उपलब्ध आहेत. खरुजच्या काही औषधांमध्ये गॅमा बेंझिन असते. ह्या औषधाने आग होत नाही पण ते त्वचेतून शरीरात शोषले जाते. याचे दुष्परिणाम होऊ शकतात. बऱ्याचदा एक रोग बरा करण्यासाठी आपण औषध घेतो आणि दुसरे दोन नवीन रोग जन्मास येतात.

हे वाचा:   आठवड्यातून केवळ दोनदा उपाय करा, डोक्यावर एकही पांढरा केस दिसणार नाही, केसांना नैसर्गिक रीत्या काळा करण्याचा उपाय.!

यासाठी काही आजारांवर घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. चला तर मग जाणून घेऊयात असाच एक घरगुती उपाय जो आम्ही तुमच्यासाठी आज खास घेऊन आलो आहोत. या उपायात आपल्याला लागणार आहे कच्ची हळकुंड. हळदी पावडर पेक्षा अनेक पटीनी जास्त गुण यात असतात. कच्चे हळकुंड मिळत नसल्यास हळद पावडर वापरली तरीही चालेल.

असे कच्ची हळकुंड स्वच्छ धुऊन कोरडी करा व याची साल काढून किसून घ्या. यामध्ये अँटी बॅक्टरियल आणि anti-inflammatory गुणधर्म असतात. हे मिक्सरवर बारीक वाटून पेस्ट बनवा. असंच बारीक होत नसल्यास ताज्या कोरफडीचा गर यात घाला आणि वाटा. बारीक पेस्ट बनवा. यात पाणी घालू नये कारण पाणी घातल्यास टिकणार नाही.हे वाटीत काढा.(हळद पावडर वापरत असाल तर यात देखील कोरफड जेल घालून पेस्ट बनवा.

हे वाचा:   ऑक्सीजन ची समस्या होईल गायब, फक्त हे एक पान चावून खा, फुप्फुसाची कोणतेही समस्या असू द्या पटकन होईल मोकळी...!

आम्ही कच्ची हळकुंड वापरण्याचा सल्ला देऊ.)यामध्ये कडीनिंबचे तेल दोन ते तीन चमचे घाला. पुढे हे एका साफ कढई मध्ये घालन पाच ते सहा मिनिट मंद आचेवर शिजवून घ्या. आपला मलम तयार. डबीत भरून ठेवा. हा मलम हलक्या हातानी इन्फेकटेड त्वचेवर लावा. मसाज करू नये. सकाळी गरम पाण्यानी साफ करा.

टीप : अंघोळीच्या पाण्यामध्ये कडुनिंबाचे पाने घालून उकळून त्या पाण्याने अंघोळ करावी. त्वचेवरील बॅक्टेरिया लवकर संपण्यात मदत होते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *