मित्रांनो आजकाल अगदी कमी वयामध्ये देखील सांधेदुखी कंबर दुखी हाडांची कमजोरी यांसारख्या समस्या होणे म्हणजे सर्वसामान्य बाब झाली आहे. फार पूर्वी अशी समस्या एका ठराविक वयोगटातील लोकांनाच व्हायचे. परंतु आज कालचे जीवनशैली बदलते खाणेपिणे अशा अनेक गोष्टी या सर्वाला कारणीभूत आहेत. आपल्या शरीरातील कॅल्शियम बऱ्याचदा कमी होते आणि आपल्या हाडांमधून कटकट असा आवाज येऊ लागतो.
आणि अनेक प्रकारचे दुखणे सुरू होऊ लागते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्य पदार्थांविषयी सांगणार आहोत आणि त्याच्या प्रमाणाविषयी देखील ज्यामुळे तुमच्या अशा प्रकारच्या दुखण्याच्या समस्या होतील कमी. याचे सेवन तुम्ही कधी आणि केव्हा करायचं आहे याची देखील सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला शेअर करत आहोत. सगळ्यात आधी आपण जाणून घ्याव्यात असे का होते.
अनेक लोकांना उठणे बसणे चालणे फिरणे या क्रीयांकरता देखील सहजता राहात नाही. यांना महाभयानक दुखण्याचा सामना करावा लागतो. याचे कारण सांध्यांमध्ये वंगण कमी होणे. एखाद्या मशीन मध्ये देखील वंगन कमी झाले असता ती मशीन व्यवस्थित काम करत नाहीत आपण तर हाडामासाची माणसं आहोत. तुमच्या शरीरामध्ये हाडांच्या भोवती हवा जास्त भरली असेल तर देखील असे दुखणे उद्भवू शकते.
यामध्ये सर्वांत पहिला घटक म्हणजे भाजलेले चने म्हणजे फुटाणे आणि गुळाचा पहिला क्रमांक येतो. भाजलेल्या फुटाणे मध्ये कार्बहायड्रेट्स, प्रोटीन्स, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे हाडांचे कमजोर होणे दूर होते. डॉक्टर देखील हाडांचे दुखणे असलेल्याना भाजलेले फुटाणे खाण्याचा सल्ला देतात. रोज दुपारी तुम्ही दोन मूठ भाजलेले फुटाणे खावेत. सोबत दहा ग्रॅम गुळ देखील सेवन करावा.
कुळामध्ये देखील कॅल्शियम फॉस्फरस असते ज्यामुळे आपली हाडे मजबुत तर होतातच परंतु या सोबत आपली पचनक्रिया सुधारते. दुसरा पदार्थ आहे बदाम. बदामामध्ये पोटॅशियम असते जे आपल्या शरीरातील कॅल्शियम लघवीवाटे शरीराबाहेर टाकून देत नाही. बदाम तर पुर्ण शरीरासाठी संपूर्ण हेल्थ साठी खूप फायदेशीर असतात. यामध्ये विटामिन ई भरपूर प्रमाणात असते. जे आपल्या त्वचा आणि केसांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
याकरता रात्री दोन ते तीन बदाम पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी याचे साल काढून तुम्ही हे बदाम सेवन करावेत. आता उन्हाळ्याचे दिवस येत आहेत उन्हाळ्यामध्ये जास्त प्रमाणात बदाम सेवन करू नयेत. नेहमी पाण्यामध्ये भिजवलेले बदाम सेवन करावे यामुळे त्यातील उष्णता जाऊन शरीरात पोषक तत्वांची वाढ होते.
तिसरा पदार्थ आहे मेथीदाणे. मेथीदाणा मध्ये anti-inflammatory आणि अँटी ऑक्सीडेंट गुणधर्म असतात ज्यामुळे हाडांचे दुखणे आणि सूज येणे कमी होते. कोणत्याही प्रकारचे दुखणे असुदे मेथीदाणे म्हणजे यावर रामबाण उपाय होय. जर तुमचं वय पन्नास असेल तर तुम्ही पन्नास मेथीचे दाणे घेऊन पाण्यामध्ये भिजवा. आणि रोज सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही याचे सेवन करा.
तुम्ही चावून हे खा. यानंतर ते भिजवलेले पाणी देखील प्या. असे सलग दोन आठवडे करून बघा. तुमचे गुडघे दुखी कमी होईल. यासोबतच हाडांमधून आवाज येत असेल तर तो देखील बंद होईल. या सगळ्या घटकांचा सोबतच एक ग्लास दररोज दूध पिणे अत्यंत आवश्यक आहे. दूध स्वतः एक पूर्ण अन्न आहे. जे शरीरात असणारी सर्व प्रकारची कमतरता भरून काढण्यासाठी मदत करते.
तुम्ही सकाळी अथवा रात्री झोपताना एक ग्लास दूध अवश्य पिले पाहिजे. आम्ही तुम्हाला गायीचे दूध पिण्याचा सल्ला देऊ. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.