डोक्यातले सगळे टेन्शन घालून मस्त झोप लागण्यासाठीचे पाच सोपे मार्ग.! रात्री झोप न येणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी नक्की वाचा.!

आरोग्य

सकाळी लवकर डोळे उघडत नाही. किती ही झोपले तरी झोप पूर्ण होत नाही. वारंवार झोपावे असे वाटते. कोणतेही काम करताना आळसपणा येत आहे, असे जर तुमच्या बाबतीत घडत असेल आणि तुम्हाला कमी तासांमध्ये पूर्ण झोप व्हावी असे वाटत असेल तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे. आजच्या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला झोपेची निगडित असणारी एक माहिती सांगणार आहोत.

या माहितीमुळे तुम्ही कमी वेळेमध्ये देखील अगदी मनसोक्त झोपणार आहात, यामुळे तुमचा दिवस हा पूर्णपणे ताजेतावाने आणि फ्रेश जाणार आहे. मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे झोप ही प्रत्येकाला आवडणारी गोष्ट आहे. जर माणसाची झोप पूर्ण झाली नाही तर माणसाला राग चिडचिडपणा मनस्ता वारंवार येऊ लागतो आणि जर तुमची झोप पूर्ण झाली असेल तर तुम्हाला खूप सारे काम करण्याची शक्ती मिळते. दिवसभर आनंद टिकून राहतो आणि आपला मेंदू देखील शांत राहतो.

दिवसभर खूप मेहनत केल्यानंतर प्रत्येकाला रात्री शांत झोप लागावी असे वाटत असते परंतु अनेकदा रात्री झोप तर लागते परंतु ती पूर्ण होत नाही. अनेकदा अशांततेमुळे झोप लागत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती झोपते तेव्हा ती स्वतःला चार्ज करत असते, ज्या पद्धतीने तुम्ही मोबाईलला चार्ज करता त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः देखील झोपेमुळे चार्ज होत असतात. तुम्ही रात्री कशाप्रकारे झोपतात यावर देखील दुसरा दिवस पूर्णपणे अवलंबून असतो.

जर तुमची झोप चांगली झाली तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी फ्रेश वाटू लागते. जर झोप झाली नाही तर तुम्हाला मरगळ जाणवू लागते. जेव्हा आपण रात्री झोपतो तेव्हा आपल्या त्वचेमध्ये देखील खूप सारे बदल होत असतात. आपल्या शरीरावरील ज्या काही मृतपेशी असतात त्या नष्ट होऊन सक्रिय पेशी यांची निर्मिती होत असते आणि म्हणूनच जर तुम्हाला देखील टवटवीत व ताजेतवाने तसेच तरुण दिसायचे असेल तर तुम्हाला शांत झोप घेणे अत्यंत गरजेचे आहे.

हे वाचा:   अशी वांग्याची भाजी बनवली तर तुमचीच वाहवा होईल.! असा वांग्याचा सुगंध घरभर पसरेल.! चविष्ट वांगी अशी बनवा.!

आपल्यापैकी अनेकांना कोणते ना कोणते आजार असतात. या आजारामध्ये आपल्या शरीराला आराम हवा असतो जर आपण वेळेवर झोपलो आणि भरपूर झोपलो तर आपले आजार कमी होण्यासाठी मदत होत असते तसेच आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी देखील झोप अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असते. जर तुम्ही खूप झोपेमध्ये आहात, गाढ झोपलेला आहात अशावेळी कोणत्याही वायरसचा तुमच्यावर हल्ला होत असेल तर अशावेळी झोपेमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्हायरस पासून लढत असते.

जर आपल्याला शांत व गाढ झोप लागली नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात आणि यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील कमकुवत होऊ शकते म्हणून आज आपण असे काही महत्त्वाचे उपाय जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुम्हाला गाढ झोप लागेल, त्यातील पहिला उपाय म्हणजे अंधारामध्ये झोपणे. तुम्हा सर्वांना माहितीच असेल पूर्वीच्या काळी घरामध्ये लाईट नसायची आणि अशावेळी रात्री झोपताना पूर्णपणे काळोख असायचा.

जेव्हा आपण अंधार करून झोपतो तेव्हा आपला मेंदूला मानसिक दृष्ट्या समजते की आता आपल्याला आराम करायचा आहे परंतु आता हल्ली परिस्थिती बदललेली आहे. उंच इमारतीमध्ये राहत असताना अनेकदा घरामध्ये आपण मंद पेटत असणारा दिवा चालू ठेवतो आणि या दिव्यांमुळे जरी आपल्याला झोप लागलेली असेल तरी अचानकपणे आपल्या मेंदूला जाग येते आणि त्याला असे वाटते की बाहेर प्रकाश आहे.

आता आपल्याला सक्रिय राहायचं आहे आणि अशावेळी आपली झोप मोडते आणि आपल्याला जाग येते म्हणून शक्यतो अंधारामध्ये झोपण्याचा प्रयत्न करा. जर तुमच्या घरामध्ये पडदे असतील तर ते पडदे पूर्णपणे झाकून ठेवा जेणेकरून बाहेरचा प्रकाश तुमच्या घरामध्ये पडणार नाहीत व तुमची झोप व्यवस्थित होईल. शांत झोपेसाठी आपल्याला झोपण्यापूर्वी कोणत्याही तंत्राचा यंत्राचा वापर एक तास करायचा नाही.

असे करणे हल्लीच्या काळामध्ये अशक्य आहे परंतु जर तुम्हाला शांत व गाढ झोप हवी असेल तर झोपण्यापूर्वी कोणत्याही मोबाईलचा लॅपटॉपचा किंवा टीव्हीचा वापर शक्यता करू नका. आपल्यापैकी अनेक जण झोपायच्या वेळी व्हाट्सअप, मोबाईल, चॅटिंग करत तासंतास जागे असतात आणि यामुळे आपल्याला शांत झोप लागत नाही. जेव्हा एखादी व्यक्ती झोपण्यापूर्वी जे काही कार्य करते तेव्हा सारे विचार आपल्या मेंदूच्या मेमरीमध्ये स्टोअर केले जातात.

हे वाचा:   तोंडातली चव चार दिवस जाणार नाही.! मासे खाणारे या जातीचा मासा तुम्ही खायलाच पाहिजे.! इतके फायदे आहेत याचे.!

म्हणूनच रात्री झोपताना देखील असेच अनेक विचार आपल्या मनामध्ये फिरत असतात आणि या सर्व गोष्टींमुळे तुमचा मेंदू हा शांत झोपत नाही. झोपेमध्ये देखील तुमचा मेंदू सक्रिय राहतो, यामुळे शांत झोप लागत नाही म्हणूनच झोपेच्या एक तास पूर्वी शक्यतो कोणत्याही यंत्राचा वापर करणे टाळा. रात्री झोपण्यापूर्वी आपले पाय कोमट पाण्यामध्ये बुडवून थोड्यावेळ शांत बसा, असे केल्याने तुमच्या शरीराला खूप फरक जाणव लागेल.

आपल्या सर्वांना माहिती आहे की, आपला मेंदू हा आपल्या संपूर्ण शरीराचे नियंत्रण करत असतो आणि मेंदूमध्ये अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या नसा असतात ज्या दिवसभर खूप सारे कार्य करत असतात म्हणून जर आपण रात्री झोपताना आपले पाय गरम पाण्यामध्ये किंवा कोमट पाण्यामध्ये बुडवून थोडा वेळ शांत बसल्याने तुमच्या शरीराला पूर्णपणे आराम मिळतात, जेव्हा आपण पाय पाण्यामध्ये बुडवतो व पायाच्या नसा व मेंदूच्या नसा या सर्वांना एक शांतता मिळत असते.

म्हणूनच तुमचा मेंदू देखील दिवसभराच्या धावपळीमध्ये थकलेला असतो, त्या मेंदूला देखील आराम मिळतो असे करून जर आपण रात्री झोपलो तरी तुम्हाला छान झोप लागेल. लवकर सकाळी जाग येईल आणि संपूर्ण दिवस तुम्हाला ताजेतवाने वाटू लागेल. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.