सोने खरे आहे की खोटे कसे ओळखावे.? फक्त दोनच मिनिटात तुम्हीच तुमचे सोने असे चेक करा.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. असं म्हणतात प्रत्येक चमकणारी वस्तू सोनं असते. आपल्या भारतामध्ये लाखो करोडो कमावणारा श्रीमंत व्यक्ती असू देत किंवा अगदी कमी पैसे कमावणारा मजूर अथवा मध्यमवर्गीय असू दे एक वस्तू खरेदी करायला लोक कधीही मागेपुढे पाहत नाहीत. ती वस्तू म्हणजे सोनं. भारतीय महिलांमध्ये असणारी सोन्याची आवड तर जगजाहीर आहेच.

परंतु प्रत्येक चमकणारी गोष्टी लकाकणारे गोष्टी हे असली सोने नसते आणि यामुळेच अनेक लोक आपल्याला फसवू शकतात. बाजारामध्ये नकली सोन्याची कमतरता नाही. ज्याला बघून हे असली का नकली हे समजणे अत्यंत कठीण जाते. परंतु तुम्ही चिंता करू नका आज आम्ही तुमच्यासाठी खास ही माहिती घेऊन आलो आहोत त्यामुळे आता तुम्ही शुद्ध सोन्याची पारख करू शकता. सोन खरेदी करतेवेळी तुम्हाला दोन गोष्टींचे अवश्य ध्यान ठेवायचे आहे.

एक म्हणजे सोन किती शुद्ध आहे आणि दुसरे म्हणजे तुम्ही ज्या कॅरेटचे सोने खरेदी करत आहात त्याचा कॅरेटचे भाव आहे की नाही. म्हणजे ज्या कॅरेटचे सोने तुम्ही खरेदी कराल कॅरेटचे तुम्ही पैसे द्याल. याकडे भान असू द्या. सोन्याच्या शुद्धतेच्या बद्दल बोलायचे झाले तर त्याच्या शुद्धतेचा पहिला निशाण म्हणजे हॉलमार्क होय. जेव्हा कधीही तुम्ही कोणते सोने खरेदी कराल तर त्यावर असलेले हॉलमार्क हे अवश्य बघा.

हे वाचा:   दहा दिवसात कसे झाले केस दुप्पट.! केसांना कंटाळा येईपर्यंत वाढवा.! आता केस कमरेच्या खाली जातील.!

हॉलमार्क म्हणजे ही एका सरकारी गॅरंटी आहे. हॉलमार्क हे भारताची एक मात्र कंपनी ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्डस करते. याचे निशाण त्रिकोणी असते यावर सोन्याची शुद्धता देखील नमूद केलेली असते. हॉल मार्कच्या नंबरा सोबत 999 ज्वेलरी 24 कॅरेट असते. म्हणजे यामध्ये 99.9% शुद्ध सोने असते. 23 कॅरेट सोन्या वरती 958 लिहिलेले असते.

म्हणजे यात 95.8% शुद्ध सोने असते तसेच 22 कॅरेट सोन्यामध्ये 916 लिहिलेले असते म्हणजे यात 91.6% शुद्ध सोने असते. आता पाहुयात असे कोणत्या पद्धती आहे त्याच्यामुळे आपण शुद्ध होणे ओळखू शकू. नकली सोन्याचे दागिने तुम्ही परिधान केले असता शरीराच्या त्या भागावर तुम्हाला घाम येऊन तो भाग काळा अथवा हिरवा पडतो.

जर याच जागी असली सोने असेल तर ते तुमच्या त्वचे सोबत कोणतीही रियाक्शन करणार नाही व तुमच्या त्वचेचा रंग बदलणार नाही. दुसरी ओळख म्हणजे असले सोने कितीही स्ट्रॉंग मॅग्नेट असले तरी देखील त्याकडे आकर्षिले जात नाही. मोठा लोहचुंबक घेऊन त्याला सोन्याचा दागिना शेजारी ठेवा. नकली सोने असेल तर ते दागिने लोह चुंबकाकडे आकर्षिले जातील.

असं तर तुम्ही तुमच्या दाताने देखील असली सोन्याचे पारख करू शकता. सोनं दातामध्ये दाबले असता ते जर असली असेल तर त्यावर दातांचे निशाण उठतात. नकली असल्यास ते कडक असते आणि त्यावर कोणत्याही प्रकारचे दाताचे निशान उठणार नाहीत. याव्यतिरिक्त सोन्याची परखही नायट्रिक ऍसिड च्या मदतीने देखील होऊ शकते. परंतु हा प्रयोग थोडा सांभाळूनच करावा. याकरता सोन्याला एका स्टीलच्या भांड्यामध्ये ठेवा.

हे वाचा:   डास चावल्यानंतर शरीरावर उठतात का असे निशान? झटकन करा हे काही उपाय.! काही सेकंदाच्या आत सर्व निशान होतील गायब.!

यामध्ये एक थेंब नायट्रिक ॲसिड घाला. कोणताही रंग बदल झाला नाही तर सोन असली आहे. हिरवा वा पिवळा रंग आल्यास सोनं नकली आहे. शुद्ध 24 कॅरेट सोन्याचे घनत्व जवळ-जवळ 19.3gm ml असते. जे अन्य धातूंच्या तुलनेमध्ये खूप जास्त आहे. सोन्याचे घनत्व मोजमा देखील आपण असली अथवा नकली सोन्याची पारख करू शकतो. या पद्धतीमध्ये आपण सोन्यामध्ये किती भेसळ आहे हे देखील काढू शकतो. आजची ही अनोखी माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल.

आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत शेयर करायला विसरु नका. त्यांनादेखील सोने खरेदीत होणाऱ्या फसवणुकीपासून आपण वाचवू शकता. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *