ही वनस्पती मूळव्याध चा काळ आहे.! अनेक आजार नष्ट होऊ शकतात.! फक्त अशी घ्यावी लागेल काळजी.!

आरोग्य

आपल्या भारतात औषधी वनस्पतींचे वरदान आहे. अनेक वर्षांपासून अनेक वनस्पतींचा औषध म्हणून वापर केला जातो. पण आजकाल अशा वनस्पती दुर्मिळ होत चालल्या आहेत. जसे की तुळस, अडुळसा, कुडा, कडुलिंब इ. आयुर्वेदात एक महत्त्वाची वनस्पती आहे त्या वनस्पती चे नाव आहे काटे धोत्रा. याला सत्यानाशी, बिलायत, काटेकोरांटी, कोरांटी असे सुद्धा म्हणतात.

ही एक रानटी वनस्पती असून त्याचे उपयोग अनेक आहेत. अनेक आजारांवर या वनस्पतीचा फार पूर्वीपासून वापर केला जातो. ही वनस्पती काटेरी असते. निवडुंगासारखे काटे याला दिसतात. हिरव्या रंगाची ही वनस्पती अतिशय फायदेशीर आहे. याला पिवळ्या रंगाची फुले असतात. तसेच याला एक निवडुंगासारखे छोटे फळ देखील असते. या फळात छोटया काळ्या रंगाच्या बिया असतात.

त्वचा रोगांमुळे अनेक जण खूप त्रस्त असतात. काहींना तर अगदी उठता बसताना सुद्धा खूप त्रास होत असतो. अशा आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम आणि औषधे उपलब्ध आहेत. पण यामुळे तात्पुरता आराम मिळतो आणि काही दिवसांनी पुन्हा त्रास चालू होतो. असे त्वचाविकार झाल्याने आपले लक्ष विचलित होते.

हे वाचा:   ज्वारीचे सेवन करणारे लोक हे एकदा नक्की वाचा, नाहीतर...

कोणत्याही कामात मन लागत नाही. तसेच काही त्वचाविकार असे असतात की ते एकाकडून दुसर्यांना होऊ शकतात, अशावेळी तर आपल्याला त्यांच्यापासून दूर राहावे लागते. खूप काळजी सुद्धा घ्यावी लागते. त्वचविकार घालवण्यासाठी फायदेशिर आहे सत्यानाशी वनस्पती. कधी आपल रक्त खराब झालं तर अंगाला खूप खाज येऊ शकते पण सोबतच काही प्रकारचे चर्मरोग सुद्धा येतात.

म्हणून रक्त साफ करण्यासाठी सत्यनाशीचा उपयोग करू शकता. या वनस्पतीच्या बियांचा उपयोग खोकल्यावर सुद्धा केला जातो. ज्यांना सर्दी खोकला असतो, सतत त्रास होत असतो त्यांनी या बियांचा वापर करावा. विषारी प्राणी चावल्यास त्यावर उपाय म्हणून या वनस्पतीच्या पानांचा उपयोग केला जातो. सत्यानाशी वनस्पतीचे पान आणि तिळाचे तेल एकत्र करून उकळून घ्यावे आणि जिथे दुखत आहे त्या भागावर मालिश करावी.

हे वाचा:   कानाला हातही न लावता कानातला सगळा मळ घाण एका सेकंदात बाहेर काढा.! अगोदर पेक्षा दुप्पट ऐकू येईल.! वृद्ध लोकांसाठी खास माहिती.!

हा उपाय एक आठवडा केल्यास लगेच चांगले परिणाम दिसून येतील. ज्यांना बद्धकोष्ठता होते, पोट वेळोवेळी साफ होत नाही, गॅस ची समस्या त्रास देते त्यांनी या वनस्पतीच्या मुळांचा नक्की वापर करावा. तुमचे सगळे पोटाचे विकार लगेच दूर होतील. तसेच ज्यांना मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी या वनस्पतीच्या मुळांचा वापर केल्याने मूळव्याधीचे कोंब निघून जातील.

आणि मूळव्याधीपासून तुम्हाला लवकर सुटका मिळेल. म्हणूनच ही औषधी वनस्पती अतिशय अनेक आजारांवर उपयुक्त ठरते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *