बदाम खाणे हे सगळ्यांच्याच आवडीचे असते. बदाम खायला सगळ्यांनाच आवडते मग आपल्याला कधी कधी असे वाटते की आपले स्वतःचे बदामाचे झाड असावे. आज आपण जाणून घेणार आहोत बदामाचे झाड कसे ग्रो केले जाते. त्याची लागवड आपण घरच्या घरी कसे करू शकतो, चला तर मग जाणून घेऊया बदामाचे झाड ग्रो करण्यासाठी ची प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी.
सर्वप्रथम आपल्याला चार बदाम घ्यायचे आहेत आणि एका पात्रांमध्ये पाणी घेऊन त्यात किमान चोवीस तासांसाठी भिजत ठेवायचे आहेत. चोवीस तासानंतर त्यांना बाहेर काढायचे आहे जेव्हा तुम्ही या फुगलेल्या बदाम यांना बाहेर काढाल तेव्हा तुम्हाला दिसून येईल की, तुमचे बदाम पूर्वीपेक्षा जास्त प्रमाणात मोठे झाले आहेत. त्यानंतर या बदमांना आपल्याला एका अशा बंद डब्यामध्ये ठेवायचे आहे.
जेणेकरून या बदामाना हलकेसे कोंब येतील. त्यासाठी आपल्याला एक बंद डबा घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला कोकोपीट टाकायचे आहे. आणि या कोको पिट मध्ये डब्याच्या चार ही कोपऱ्यामध्ये एक बदाम करून चार बदाम या कोकोपिट मध्ये टाकून आपल्याला हा डबा बंद करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. हा डबा दर दहा दिवसांनंतर काढून आपल्याला चेक करत राहायचे आहे.
जेणेकरून आपल्याला कळेल की आपण टाकलेले बदाम हळूहळू मोठे होत आहे आणि त्याला कोंब येत आहे की नाही याची खात्री पटेल. त्यानंतर 35 दिवसांनंतर जेव्हा तुम्ही तो डब्बा उघडाल तेव्हा तुम्हाला त्यावर कोंब आलेला दिसून येईल. कमीत कमी 35 दिवस या बदाम आला कोंब घ्यायला लागणार आहेत. त्यानंतर आपल्याला एक दुसरी प्रक्रिया देखील बघायची आहे.
ही प्रक्रिया तुम्ही हिवाळ्यात करायची आहे जेणेकरून बदामाचे रोप नैसर्गिकरीत्या तुम्ही उगवू शकतात. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला बदाम चोवीस तास पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहे. चोवीस तास पाण्यामध्ये भिजवून घेतल्यानंतर त्यांना सोलून घ्यायचे आहे आणि. आणि आपल्याला एका कुंडीमध्ये 50% कोकोपीट आपल्याला हवे ते दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे खत घ्यायचे आहे आणि तीच माती घ्यायची आहे.
आता हे सर्व मिक्स करून व्यवस्थित रित्या एका कुंडलीमध्ये टाकायचे आहे आणि त्यावर चोवीस तास भिजवून घेतलेले बदाम सोलून त्यामध्ये टाकायचे आहे या रोपाला उगण्यासाठी म्हणजेच त्याचे रोप होण्यासाठी कमीत कमी मी 35 ते 40 दिवस जातील त्यामुळे हा प्रकार फक्त हिवाळ्यामध्ये वापरायचा आहे. त्यानंतर आपण प्रथम ज्या चार बदाम यांना कोंब काढून घेतले होते.
त्यांना आपल्याला फक्त कोकोपीट च्या दोन छोट्या छोट्या कुंड्या बनवून घ्यायचे आहे. आणि त्यामध्ये एक बदाम टाकून त्यावर थोडेसे पाणी टाकून थंडाव्याच्या या ठिकाणी ठेवायचे आहे जिथे जास्त उनाचा प्रभाव होणार नाही आणि बदामाच्या रोपाला थंड वातावरण मिळेल. अवघ्या एका महिन्यात तुम्हाला छोटेसे रोप दिसू लागेल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.