गायीचे दूध एक मानवी शरीरासाठी एक पूर्ण अन्न आहे. गायीचे दूध आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असते. गायीच्या दुधामुळे आपल्या केसांचे चांगले पोषण होत असते. कारण ज्या लोकांना केस मोठ्या प्रमाणावर गळण्याचा त्रास होत असतो. त्यांच्यासाठी गायीचे दूध हे खूपच उत्तम आहे. तसेच गाईच्या दुधामध्ये विटामिन हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
सोबतच झिंक हे केसांच्या पोषण करण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. मित्रांनो गायीचे दूध नेहमी हाडांसाठी चांगले असते. या दुधात सर्वात जास्त कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असतात. आपल्या हाडांची मजबूती वाढवण्यासाठी गीर गायीचे दूध हे खूपच महत्वपूर्ण असते. तसेच आपल्या हाडांचा विकास होण्यासाठी गीर गायीच्या दुधाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत असतो.
मित्रांनो लहान मुलांना जर गायीचे दूध दिले तर त्यांच्या हाडांची वाढ हे खूपच चांगल्या प्रकारे होत असते. आजारी लोकांनी गीर गायीचे दूध नियमितपणे घेतल्यास त्यांच्या हाडांची झालेली झीज लवकर भरून निघते. गायीच्या दुधामध्ये जीवनसत्व ब खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते आणि यामुळे दूध पचण्यास हलके जात असते. तसेच तुमच्या शरीरामधील विटामिन ची गरज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गायीचे दूधा यामुळे भागवली जाते.
गायीचे दूध आपण पिल्यामुळे पचनशक्ती नेहमी सुधारत असते. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये कर्करोग हा एक अतिशय गंभीर विकार असून आजकालच्या बदललेल्या वातावरणामुळे तसेच जीवनशैलीमुळे अनेकांना कर्करोगाचा धोका असू शकतो. मात्र काही संशोधनामध्ये असे देखील आढळून आले आहे की गायीच्या गाईच्या कर्करोगापासून आपले संरक्षण हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकते.
कारण दुधामध्ये विटामीन डी भरपूर प्रमाणामध्ये असते ज्यामुळे कर्क रोग होण्यापासून आपले संरक्षण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. मित्रांनो आपण आज या लेखात हे गायीचे दूध फैक्ट्री मध्ये कसे तयार केले जाते या बद्दल थोडी माहित घेणार आहोत. या सदर लेखात तुम्ही दूधाला रोज तुमच्या पर्यंत पोहचवण्याच्या आधी कोण-कोणत्या प्रोसेस मधून जावे लागते हे आपण पाहणार आहोत.
ही माहित तुमच्यासाठी फारच महत्वाची आहे. त्यामुळे आमचा हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा. सर्व प्रथम ज्यांच्या गायी आहेत जे दूध विक्रेते आहेत त्यांच्या कडून दूध विकत घेतले जाते. पुढे दुधा मध्ये पाणी मिसळलेले आहे का हे पाहण्यासाठी या दूधाला एका मोठ्या यंत्रात टाकले जाते. काही वेळा जास्त पैसे कमवण्याच्या मोहात अनेक लोक दूधात पाणी टाकतात. हे रोखण्यासाठी सर्वात आधी दूध नीट तपासले जाते.
या नंतर दूधाची गुणवत्ता म्हणजेच दूधात किती प्रमाणात प्रथिने आहेत किती फॅट्स आहेत या सर्व बाबी चेक केल्या जातात. आता हे कच्चे दूध एका स्टीलच्या पाइपमधून मोठ्या टाक्यांमध्ये सोडले जाते. या टाक्यांमध्ये दूधाला थंड केले जाते. या नंतर दूधाला क्रीम व टोनर या दोन गटात विभाजले जाते. क्रीम दूध यात फॅट्स जास्त असतात म्हणून हे महाग असते तर टोनर दूधात फॅट्सची मात्रा कमी असते त्यामूळे हे स्वस्त असते.
आता पुढे एका काचेच्या पाइपद्वारे या दूधात विटमीन ए आणि डी सोडले जातात. या नंतर या मोठ्या टाकींवर पाण्याचा वर्षाव करुन यांना परत एकदा थंड केले जाते. या नंतर या दूधाला बाटली अथवा पिशव्यांमध्ये पॅक करुन शिपिंगसाठी मोठ्या कंटेनर मध्ये ठेवले जाते. जेव्हा ही तुम्ही दूध खरेदी कराल तेव्हा त्यात काही केमिकल आहे का हे नक्की तपासून पहा.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.