केस हा काही नॅनो मीटर एवढ्या आकाराचा असतो परंतू आपल्या शरीराचा एक अविभाज्य घटक आहे. डोक्यावर केस असणे आज कालच्या युगात खूप मोठी गोष्ट मानली जाते. होय याचे कारण म्हणजे परिसरात वाढणारे प्रदूषण. प्रदूषणाच्या आभावाने तुमच्या शरीरावर जसा वाईट परिणाम होतो तसाच परिणाम केसांवर देखील आता होत आहे. केस गळणे, पातळ होणे तसेच वया आधीच सफेद होणे अश्या या व्याधी आता सामान्य बनल्या आहेत.
आज कालचे युवा या समस्यांना रोज तोंड देत आहेत. केसांचे आरोग्य नीट ठेवण्यासाठी आता बाजारात अनेक उत्पादने उपलब्ध आहेत परंतू ही कृत्रिम उत्पादने तुमच्या केसां करिता अत्यंत हानिकारक आहेत. हे घटक आपल्या केसांना निरोगी करण्या ऐवजी अजून जास्त निस्तेज व ड्राय करतात. याचे कारण म्हणजे यात असलेले केमिकल युक्त घटक हेच आपल्या केसांची लेवल कमी करतात व गंजे पण येवू लागते.
या सोबतच चुकीचे खान-पान जास्त बाहेरचे फास्ट फूड व तिखट तेलकट खाद्य पदार्थांचे नियमित सेवन आपल्या केसांच्या आरोग्यासाठी फार वाईट आहे. आपले शरीर एक नाशवंत नैसर्गिक घटक आहे त्यासाठी देखील एक नैसर्गिकच उपाय योग्य ठरेल. होय आज आमच्या या लेखा द्वारे आम्ही तुमच्यासाठी एक नैसर्गिक रामबाण उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी एक संजीवनी आहे.
या उपायाबद्दल आपला महान ग्रंथ आयुर्वेद या मध्ये देखील सारांश रूपाने माहिती नमूद केलेली आहे. हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे हा तयार करताना तुम्हाला घरातील काही सामग्री वापरायाची आहे त्यामुळे हा उपाय जास्त खर्चिक देखील नाही. याच्या अगदी दोन ते तींन वापरात तुमचे केस तेजस्वी, चमकदार व लांब सडक दिसू लागतील. होय ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे म्हणून हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
चला आता विलंब न करता पाहूया हा उपाय. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्व प्रथम आवश्यकता आहे मेथीच्या दाण्यांची. मेथीचे दाणे आपल्या मानवी शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात. त्याच बरोबर आपल्या केसांच्या आरोग्यासाठी देखील ते खूप फायदेशीर आहेत. या गुणकारी मेथीच्या दाण्यांना पाण्यात भिजवून दोन दिवस असेच ठेवून द्या. आता दोन दिवसांनी हे दाणे गाळणीच्या मदतीने गाळून घ्या.
यातून आपल्याला मेथीच्या दाण्यांचे पाणी आवश्यक आहे. मेथीच्या दाण्यांची तुम्ही भाजी अथवा डाळ बनवू शकता. शरीरात ऊर्जा प्रदान करण्याचा एक चांगला उपाय आहे हे मेथीचे दाणे. या नंतरचा दुसरा घटक जो आपल्याला हा उपाय तयार करण्यासाठी आवश्यक आहे तो म्हणजे कोरफडीचे जेल होय यालाच आपण अलोवेरा जेल देखील म्हणतो. या मध्ये अनेक विविध विटामीन व मिनरल असतात. अलोवेरा जेल आपल्या केसांच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे.
या सोबतच आपल्या शरीराच्या व चेहर्याच्या त्वचेसाठी देखील हे फायदेशीर आहे. या उपायासाठी तुम्हाला घरी असणार्या अलोवेराचे ताजे जेल घ्यायचे आहे. याने तुम्हाला जास्त फायदा मिळू शकतो. तीसरा घटक जो आपल्याला लागेल तो म्हणजे कॅस्टर ऑइल. हे ऑइल तुमच्या केसांना मुलायम पणा देते. राठ झालेले केस पुन्हा चमकदार होतील म्हणूनच कॅस्टर ऑइल देखील घ्यायचे आहे.
आता हे तीन्ही घटक एका काचेच्या भांड्यात एकत्र करा. छान मिक्स झाल्यावर हे मिश्रण रात्री झोपताना आपल्या केसांना लावा व सकाळी थंड पाण्याने केस धुवून टाका असे नियमित चार ते पाच दिवस सलग हा उपाय केल्यास तुमचे केस झपाट्याने वाढू लागतील. तुमच्या केसांची गेलेली चमक परत येईल व ते घनडाट व काळेभोर दिसू लागतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.