आजकालच्या या महागाईत लाखो रुपये वाचतील.! या कामाच्या सात ट्रिक्स खूप पैसे वाचवेल.! कठीण वाटणारे कामे चुटकी सरशी पार पडतील.!

आरोग्य

मित्रांनो आपल्या आजू बाजूला अनेक अश्या वस्तू आहेत ज्यांना आपण निरुपयोगी समजून टाकून देतो. मात्र याच वस्तूंचा वापर करुन आपण अनेक फायदे मिळवू शकतो. होय आपल्या स्वयंपाक घरातील अनेक वस्तूंचा आपण परत वापर करुन खूप पैसे वाचवू शकता. आमच्या या लेखात आज आम्ही तुम्हाला अश्याच काही मजेशीर व फायदेशीर ट्रीक्स जाणून घेणार आहोत.

हो अगदी सहज व सोप्या पद्धतीने तुम्ही हे उपाय करुन बर्याच समस्यांना चुटकी सरशी सोडवू शकाल. चला आता वेळ न दवडता पाहूया या ट्रीक्स. दिवसाची सुरवात आपण चहा घेवूनच करतो. चहा बनवताना आपण पाणी, साखर, व चहा पावडर वापरतो. चहा बनवून झाल्यावर उरते ती फक्त चहाची पावडर. अनेक जण या पावडरला काचर्यात टाकून देतात तर काही झाडांच्या कुंडीत टाकतात. परंतू ही चहाची पावडर आपल्यासाठी खूपच उपयोगी आहे.

तुमच्या घरात अनेक छोटी मोठी काचेची भांडी असतीलच व वापर होवून ती जर पिवळी पडू लागली असतील तर अश्या वेळी तुम्ही या वापरलेल्या चहाच्या पावडरला पाण्यात उकळून घ्या. नंतर हे पाणी गाळून घ्या व यात डिश वॉश टाका. या पाण्याने ही काचेची भांडी धुवून पहा सगळे डाग नाहीसे होतील आणि हे भांडी चमकू लागतील. या सोबतच स्वयंपाक घरात अनेक वेळा कळत न कळत आपल्या कडून दुध ओतू जाते.

हे वाचा:   एक मिनिट पुरेसा आहे, ऍसिडिटी कायमची थांबेल, करपट ढेकर येणे होईल बंद, छाती मध्ये होणारी जळजळ होईल शांत, पोटात आग अजिबात होणार नाही...!

मात्र हे होणे टाळण्यासाठी एक सोपी युक्ती तुम्ही करु शकता. सर्व प्रथम ज्या पातेल्यात तुम्ही दुध गरम करता त्यात दुध ओतण्याच्या आधी थोड पाणी टाका याने तुमचे दुध जळणार नाही व दुधाच्या पतेल्याच्या वरच्या बाजूला तेल लावून ठेवा. याने काय होईल जेव्हा ही दुध वरती येवू लागेल तेव्हा आवाज होईल व तुम्ही सतर्क होवून गॅस बंद कराल सोबतच याने जास्त साय देखील तयार होत नाही.

आपल्या पैकी अनेकांना नखे वाढवण्याची आवड असते. मात्र अनेक वेळा ही नखे पिवळी पडू लागतात अश्या वेळी. लिंबाच्या सालीला थोडासा बेकिंग सोडा लावा व आता ही लिंबाची साल तुमच्या पिवळ्या पडलेल्या नखावर घासा याने तुमची पिवळी पडलेली नखे परत चमकू लागतील. या सोबतच अनेक वेळा तुम्ही ज्या भांड्यात बटाटे उकडायला ठेवता ते कालांतराने काळे पडू लागते.

अश्या वेली सर्व प्रथम या भांड्यात पाणी कमी घाला याने तुमचे बटाटे पटकन शिजतील. नंतर यात थोडेसे मीठ घालावे ज्याने बटाट्याच्या साली लगेच निघतील व सोबतच यात एक लिंबाची साल टाका याने तुम्ही बटाटे उकडवत असणारे भांडे कधीच काळे पडणार नाही. जेव्हा तुम्ही मिरच्या मिक्सर मध्ये वाटता तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. तुमचा श्वास कोंडतो शिंका देखील येतात.

हे वाचा:   कधीही नाक वाहू लागले तर पटकन करायचे यातले एक काम.! सर्दी दोन ते मिनिटात पळून जाईल.! आयुष्यात सर्दीचा त्रास कधी होऊ द्यायचा नसेल तर हा सोपा उपाय करायलाच हवा.!

अश्या वेली तुम्ही जेव्हा ही मिरच्या वाटाल तेव्हा यात थोडेसे मीठ घालावे याने तुमची मिरची पावडर कधीच खराब होणार नाही. सोबतच यात थोडेसे तेल घालावे याने तुम्हाला कधीच शिंका येणार नाहीत व नीट पावडर तयार होईल. अनेक वेळा तेल सांडते अश्या वेली आपण ते पुसून काढतो मात्र हे तेल वाया जाते हे टाळण्यासाठी सर्व प्रथम जेवढे होईल तेवढे तेल चमच्याने भरून घ्या.

त्याच बरोबर जे तेल भरू शकत नाहीत त्यात मैद्याचे पीठ अथवा बेसन पीठ घालावे आणि तुम्हाला आवडेल ती रेसिपी बनवावी. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.