बारीक असलेले केस केव्हा वाढतील तुम्हाला पण समजणार नाही.! इतके जबरदस्त केस वाढतील की स्वतःच्या डोळ्यावर सुद्धा विश्वास बसणार नाही.!

आरोग्य

महिलांसाठी त्यांचे केस हेच खूप मोठे धन असते.! आपल्या आजी-आई यांच्या जुन्या फोटोत अल्बम बघितले तर आपल्याला दिसून येईल की त्यांचे केस देखील तेव्हा कळेभोर, लांबसडक व निरोगी होते. आपल्या कुटुंबातील व ओळखीच्या मंडळीतील सर्वांच्या आई व आजींचे केस देखील खूपच निरोगी व लांब सडक असलेले आपण फोटोमध्ये पाहिले असेल. आजकाल आपल्या आजूबाजूला फार कमी स्त्रियांचे लांब केसं दिसतात.

या लांबसडक केसांचा रहस्य काय आहे? हे जाणण्याची प्रत्येकाला उत्सुकता असतेच नाही का? आपल्यालाही तसेच लांब सडक केस हवेहवे असे वाटते नं? यासाठी आपण अनेक उपाय करतो. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे तेल वापरतो. शांपू कंडीशनर बदलतो. ब्युटी पार्लर मधल्या महागड्या ट्रीटमेंट देखील ट्राय करतो.

आजकाल बाजारात हेअर मास्क /हरबल पॅक देखील उपलब्ध आहेत. हेअर सप्लिमेंट्स होमिओपॅथिक गोळ्या आणि केस वर्धक उपाय सुद्धा करून झालेले असतात. हेअर कलरिंग /हेअर डाय व स्पा ट्रीटमेंटचा अतिवापर करतो. आणि परिणामी केस अजूनच गळतात. हे सर्व करून बघण्या पूर्वी काय तुम्ही तपासून बघितले आहे का तुमचा केस व त्याचे मुख्य कारण काय आहे?

हे वाचा:   अनेक लोकांना माहिती नसेल हा वजन कमी करण्याचा फॉर्म्युला.! अनेक मंडळी आपली वजन कमी करण्यात झाले आहे यशस्वी.! तुमचं काय.?

तुमचा दैनंदिन आहार तुम्ही बघितला आहे का? आम्ही तुम्हाला घरगुती उपाय सुचवत आहोत त्यासोबतच पोट साफ ठेवणे, मुबलक प्रमाणात पाणी पिणे, आहारात पूर्ण जीवनसत्व पौष्टिक घटक मिळतील याकडे लक्ष देणे. आवळा शिकेकाई रिठा यांसारखा आयुर्वेदिक घटकांचा वापर करणे. कटाक्षाने लवकर झोपणे.

अशा सगळ्या सवयी अंगवळणी पाडाव्यात. केसांच्या मुळाशी व्यवस्थित रक्तप्रवाह व्हावा म्हणून नियमित हेड मसाज केला पाहिजे. यामुळे केस निरोगी राहण्यात आणि वाढण्यात मदत होते. पाहुयात आपला आजचा उपाय: एक वाटी स्वच्छ धुवून ताजे कडीपत्ता पानं घ्या. एका भांड्यात एक ग्लास पाण्यात ही पानं घाला व यामध्ये दोन चमचे कांद्याचे बी व एक चमचा मेथी दाणे घाला.

हे भांडे गॅस वर मंद आचेवर १५-२० मिनिटासाठी उकळण्यास ठेवा. आपण एक टॉनिक बनवत आहोत. यामुळे केसं पांढरी होणार नाहीत. हे मिश्रण गाळून घ्यावे. यात कोणतेही रसायन नाही. मिश्रण स्प्रे बाटलीत भरून आठवड्यातून तीन वेळेस याचा वापर करा. तेल लावता तसेच हे लावून मसाज करा. हे केसांना तेलकट बनवत नाही त्यामुळे लगेच केस नाही धुतले तरी चालतील.

हे वाचा:   डोक्यातून उवा पटापट खाली पडतील.! डोक्यामध्ये जास्त उवा झाल्या असतील तर झटपट करा हा उपाय.! एकदा करा आयुष्यभर चिंता राहणार नाही.!

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.