खोकल्यामुळे घसा दुखणे, घशाला सूज, चिकट कफ सर्वांवर आहे हे चमत्कारी पाणी औषध.! फक्त हे पाणी सकाळ संध्याकाळ घ्यावे.! सगळे दुखणे ओके.!

आरोग्य

मित्रांनो अनेक वेळा मोठ मोठ्या विकारांपेक्षा सुद्धा बारीक-सारीक विकार आपल्याला जास्त त्रास देतात व हैराण करुन सोडतात. सर्दी- खोकला, अंगदुखी व सांधेदुखी अथवा घश्याचे दुखणे. होय आज आम्ही बोलणार आहोत घश्याला होणार्या इंफेक्शन बाबत. अनेक वेळा आपण आहारात तिखट व तेलकट पदार्थ जास्त प्रमाणात खातो आणि यामुळे आपल्या घश्याला त्रास होवू लागतो. अनेक वेळा घश्यात कफ होतो व पुढे हा सुकून घश्याला त्रास देवू लागतो.

बोलताना त्रास होणे, सारखा खोकला लागणे व मोठ्या स्टेजला तर खोकल्याद्वारे र’क्त देखील पडू शकते. अनेकांना ही समस्या वारंवार होते. मात्र सारख्याच दवाखान्यातील कृत्रिम गोळ्या-औषधे खाणे आपल्या शरीराकरिता अपायकारक ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी या लेखा द्वारे काही अत्यंत नैसर्गिक उपाय घेवून आलो आहोत.

हा उपाय एक घरगुती उपाय आहे त्यामुळे घरातील काही सामग्री वापरुन तुम्ही हे उपाय तयार करु शकता. हे उपाय आयुर्वेदात देखील नमूद केलेले आहेत त्यामूळे आपल्या शरीरासाठी हे निर्धोक आहेत. सोबतच सामान्य माणसाच्या खिशाला परवडेल असे हे उपाय आहेत. यांच्या अगदी दोन ते तीन दिवसाच्या वापराने तुमच्या घश्याच्या आराम मिळू लागेल. चला आता विलंब न करता पाहूया हे उपाय.

हे वाचा:   अंघोळ करताना संपूर्ण चेहऱ्याला आणि अंगाला लावावे शरीरावर कणभर देखील मिळणार नाही.! गोरे होण्याचा याहून सोपा उपाय नाही.!

पहिला उपाय तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे मेथीचे दाणे. मेथी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असते. मेथीच्या भाजीचे सेवन करण्याचा सल्ला डॉक्टर देखील आपल्याला देतात. मेथी मध्ये मुबलक प्रमाणात लोह, आयरन व फोस्फेट असते जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त घटक आहेत. सोबतच मेथी एक नैसर्गिक वेदना शमाक आहे.

याच मेथीच्या दाण्यांना 20 ग्राम एवढ्या मात्रेत घ्या व पाण्यात टाका. आता हे पाणी गरम होण्यासाठी मंद वाफेवर गॅसवर ठेवा. दहा ते पंधरा मिनिटांमध्ये पाण्याला उकळी येवू लागेल. आता गॅस बंद करा व हे पाणी थोडे कोमट होण्याची वाट पहा. या नंतर गाळणीच्या मदतीने मेथीचे दाणे या पाण्यापासून वेगळे करा. या पाण्याचे सेवन तुम्ही सकाळ व संध्याकाळ असे दिवसातून दोन वेळा करा.

याच्या प्रभावने तुमच्या घश्याच्या समस्या दूर होवू लागतील. आता पाहूया घश्याच्या समस्या दूर करण्याचा उपाय क्रमांक दुसरा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त राईच्या तेलाचा वापर करायचा आहे. राईचे तेल हे नैसर्गिक वेदना शमाक आहे. शरीराला कापल्यास अथवा दुखण्यावर त्वरित आरामासाठी हे राईचे तेल खूप उपयुक्त आहे.

राईच्या तेलाचा वापर खाद्य पदार्थांमध्ये देखील केला जातो. याच्या सेवनाने शरीराला मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त होते. यात विविध प्रकारचे मानव शरीर उपयुक्त घटक असतात. याच राईच्या तेलाला तुम्ही मंद आचेवर गरम करा व थोडेसे गरम झाल्यास आपल्या घश्याच्या सभोवताली या तेलाने मालिश करा. याने देखील तुम्हाला असणार्या घश्याच्या समस्या त्वरित गायब होतील.

हे वाचा:   आपले घोरणे जगाला नका दाखवू.! आजच आजमावून बघा हा उपाय.! घोरणे होईल कायमचे बंद.!

चला आता वळूया घश्याच्या समस्या पळवून लावणार्या तीसर्या नैसर्गिक उपायाकडे. हा उपाय करण्यासाठी जेव्हा तुम्ही तुमच्या घश्याला तेलाने मालिश कराल त्या नंतर स्वयंपाक घरातील तवा-पॅन घ्या यावर एक सुती कपडा ठेवा आता गॅसवर हा कपडा गरम करा व याने तुमच्या घश्याला शेक द्या. असे दोन ते तीन दिवस केल्यास तुम्हाला होणार्या घश्याच्या व्याधी गायब होतील.

हे तीन उपाय अगदी नैसर्गिक आहेत याचा आपल्या शरीरावर कोणता ही अपाय होत नाही. म्हणूनच आमचे हे नैसर्गिक रामबाण उपाय नक्कीच करुन पहा. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.