पेट्रोल महाग झाले म्हणून या पठ्ठ्याने बनवली चक्क खाऱ्या पाण्यावर चालणारी बाईक

ट्रेंडिंग

फास्ट ही ‘खारट’ ही…! मीठा शिवाय आपले जेवण आणि जीवन कितीही अशक्य असले तरीही आपण मीठ हे सरळ सरळ खात नसतो. आपण हे मीठ नेहमी कुठल्या न कुठल्या तरी पदार्थात मिसळवूनच घेत असतो. समुद्राचे पाणी खारट , डोळ्यातून वाहणारे अश्रू खारट म्हणून निव्वळ मीठ टाकलेले पाणी तुम्ही प्याल का ? तर नाही , अजिबात नाही. जास्तीत जास्त मिठाच्या पाण्याच्या गुळण्या वैगरे करू शकतो पण ते ही पाणी ओठातून पोटात जाणार नाही ह्याची काळजी घेतच.

पण मग ह्याच खाऱ्या पाण्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात करावा लागला तर ? नाही घाबरू नका , हे खारे पाणी काही तुम्हाला प्यायचे वैगेरे नाही आहे , पण ह्या खाऱ्या पाण्याचा वापर केल्या मुळे तुमच्या खिशाला आराम मिळेल हे निश्चित.

डिझेल आणि पेट्रोल च्या वाढत्या भावामुळे भल्या भल्यांच्या डोळ्यात पाणी ( खारट ) आणलं. एकीकडे आपले नैसर्गिक स्रोत कमी होत आहे तर दुसरी कडे ह्यांची मागणी दहा पटीने वाढते आहे. डिझेल आणि पेट्रोल मुखत्वे व्यवसायिक व खाजगी वाहनांच्या चलनासाठी इंधन म्हणून वापरले जाते. नाही म्हणायला सी. एन. जी. , इथेनॉल युक्त पेट्रोल वैगरे असे बरेच विकल्प सुरु आहेत , पण शेवटी ते ही नसर्गिक स्रोतच. म्हणजे भविष्यात त्यांना ही काही मर्यादा ह्या येणारच.

हे वाचा:   अरे बापरे...! हा मुलगा देत आहे दोन वर्षापासून अंडे.! पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

मग ह्या वर उपाय काय ? तर , वैकल्पिक ऊर्जा आणि त्याचा वापर. पण वैकल्पिक ऊर्जा म्हणताच आपल्या समोर प्रामुख्याने सौर ऊर्जा आणि इलेक्ट्रीक ऊर्जा हे असे प्रकार समोर येतात. पण एकतर ही टेकनॉलॉजी महाग आणि किचकट असल्यामुळे सर्वसामान्यात रुळणे जवळपास अशक्य वाटते.

पण समजा उद्या तुम्ही पेट्रोल पम्पा वर पेट्रोल टाकण्या साठी उभे आहात आणि तुम्ही पहिले कि तुमच्या शेजारी एक तरुण आपल्या मोटर सायकल वर येतो आणि पेट्रोल पम्प वाल्याला सांगतो कि ‘शंभर रुपयांचे खारट पाणी द्या हो’ , तर .. चक्रावलात ना ! पण हे भविष्य असू शकते.

इंधनाच्या वाढत्या किमती आणि ह्यांचा कमी होणार नैसर्गिक साठा अशा ह्या गम्भीर समस्येवर ‘खारट पाण्याने चालणारी मोटर सायकल’ असा हा अगदी साधा, सोपा आणि स्वस्त तोडगा काढला आहे आणि तो ही चक्क आपल्या अकोल्यातील चार तरुण मंडळींनी. लॉक डाउन च्या काळात ह्या मंडळींनी घरच्या घरी एक मोटरसायकल तयार केली आहे , जी चक्क खारट पाण्यावर चालते. विश्वास नाही ना बसत ! पण हे खरे आहे .

हे वाचा:   या सोप्या पद्धतीने करा गावरान ठेचा.. चव अशी की पुन्हा पुन्हा मागाल.!

हैड्रोजेन हा एक ज्वलनशील वायू आहे हे आपल्या सर्वानाच माहिती आहे. खारट म्हणजे मीठ टाकलेल्या पाण्याचे इलेक्ट्रिक क्रिये द्वारे विघटन केले कि ह्या विघटन क्रियेतून हैड्रोजेन आणि ऑक्सिजन असे दोन वायू उत्सर्जित होतात. ह्याच हैड्रोजन वायूला इंधन म्हणून वापरायचे ह्या मंडळीनीं ठरवले.

मग फावल्या वेळात घरच्या घरी ह्यांनी ही बाईक तयार केली आणि तिच्या काही सफल ट्रायल ही घेतल्या. आता ही मंडळी ह्या बाईक मध्ये काही ऍडव्हान्स सुधारणा करत आहे. तसेच त्यांनी केलेल्या ह्या शोधाचे पेटंट घेण्याची ही ह्यांची तयारी सुरु आहे. अशा ह्या प्रतिभाशाली मंडळींना पुढील वाटचाली साठी हार्दिक शुभेच्छा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *