अशाप्रकारचे पायाचे बोटे असेल तर, आशा महिला असतात खूपच रागीट

ट्रेंडिंग

व्यक्तिच्या शरीराची व अवयवांची ठेवण व्यक्तिचे भाग्य व व्यक्तीचा स्वभाव सांगते. हस्तसामुद्रिक शास्त्रानुसार तळहाताच्या रेषांनी ज्याप्रमाणे भविष्य व व्यक्तीचा व्यक्तिमत्त्वाविषयी व स्वभावाविषयी भविष्य वर्तन केले जाते, त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या हातांची व पायांची रचनादेखील व्यक्तीचा स्वभाव व त्याच्या भाग्याबद्दल माहिती देत असते.

आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला आपल्या पायांच्या बोटांचा आकार व ठेवण यावरून व्यक्तिमत्व व स्वभावाबद्दल माहिती सांगणार आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या पायाचा आकार व ठेवण ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक व्यक्तीच्या पायाच्या बोटांची ठेवण देखील वेगवेगळी असते.

ज्यामध्ये काही लोकांचा अंगठा खूप मोठा असतो तर बोटे छोटी-छोटी असतात,  तर काही लोकांची बोटे लांबसडक असतात व अंगठा देखील खूप लांब व मोठा असतो तर काही लोकांची सगळी बोटे एकसारखी असतात! अशा अनेक प्रकारच्या बोटांच्या रचना व ठेवण आपल्याला पाहायला मिळतात.

ज्या व्यक्तीच्या पायाच्या सर्व बोटांची लांबी सारखीच असते फक्त अंगठाच सगळ्यात लांब असतो, अशा व्यक्ती कलाप्रेमी असतात. सतत काहीतरी नवीन गोष्टीचा शोध लावण्याची या लोकांना आवड असतात. या लोकांना एका जागी शांत बसणे आवडत नाही.

ज्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठा व शेजारील बोट यांची लांबी सारखी असते या लोकांमध्ये खूप रुबाब असतो. हे दुसऱ्या व्यक्तीवर आपली छाप सोडत असतात. अशा लोकांमध्ये नेतृत्वगुण पाहायला मिळतात. आपले विचार पटवून देण्यामध्ये हे लोक सक्षम असतात. आपली जिद्द पूर्ण करण्यासाठी हे लोक स्वतःला दुखापत देखील करून घेऊ शकतात.

हे वाचा:   अरे बापरे...! हा मुलगा देत आहे दोन वर्षापासून अंडे.! पाहून डॉक्टर देखील हैराण आहेत.!

ज्या व्यक्तींचा अंगठा व इतर बोटांमध्ये जास्त अंतर असते असे लोक नेहमी आपल्या परीवारा पासून दूर-दूर राहतात. मोठा परिवार असला तरी हे लोक जास्त परिवारामध्ये मिसळत नाहीत. या लोकांसोबत जोडलेले लोक देखील जास्त काळ यांच्यासोबत राहत नाहीत. या लोकांना एकांतात राहणे जास्त आवडते.

ज्या पुरुषांचा अंगठा वरच्या बाजूला गोल असतो ते व्यक्ती जास्त धनवान होतात. वय वर्ष 36 ते 42 दरम्यान या लोकांकडे धनसंपत्तीचा अोघ वाढतो. पायाच्या टाचा नेहमीच फाटलेल्या असणार्‍या लोकांचे नशिब ही फाटकेच असते. असे लोक भूतकाळात जगणे पसंत करतात व जुन्या गोष्टींना पकडून राहतात. यामुळे  त्यांच्या यशामध्ये अडसर निर्माण होतात.

कोमल पाय असलेल्या व्यक्तींचे 23 ते 28 या वयामध्ये भाग्योदय होतो. अशा व्यक्तींना मानसन्मान व चांगले पद देखील मिळते. पतप्रतिष्ठा वाढते. जर आपले तळपाय नेहमी गरम राहतात व त्यांना नेहमी घाम येतो तर आपण समजावे की आपल्याला प्रत्येक गोष्ट जीवनामध्ये खूप प्रयत्न केल्यानंतरच मिळेल. खूप मेहनत व संघर्षानंतरच आपल्याला यशप्राप्ती होईल.

हे वाचा:   ना लागणार खूप महागडे सामान नाही येणार खूप जास्त खर्च.! घरच्या घरीच बनवा हे चविष्ट पेढे.! पेढे बनवणे आहे इतके सोपे.!

पायाच्या अंगठ्यापासून उतरत्या क्रमाने बाकीच्या बोटांची उंची असेल तर हे लोक खूपच प्रभावशाली प्रकृतीचे असतात. हे लोक आपली आपली मतेच खरी मानतात. या कारणामुळे यांचे गृहस्थ-जीवन कमी सुखी असते.

पायाचा अंगठा आणि शेजारची दोन बोटे जर एक सारख्या लांबीच्या असतील तर असा व्यक्ती मेहनती, नम्र आणि जबाबदार प्रवृत्तीचा असतो. असे लोक कोणत्याही वादांमध्ये पडत नाही। तसेच हे चांगले जीवन साथी बनता.

जर एखाद्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्या शेजारचे बोट हे सर्व बोटं पेक्षा लांब असेल तेव्हा हे व्यक्ती खूपच एनर्जेटिक असतात. हे कोणत्याही कामाला पटकन पूर्ण करतात. जर या लोकांनी आपल्या मनाशी काही ठरवले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *