आपले आरोग्य हे अनेकदा आपल्या सवयी वर अवलंबून असते. आपल्याला विविध प्रकारच्या सवयी असतात परंतु काही अशा सवयी असतात ज्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक मानल्या जातात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशा पाच सवयी सांगणार आहोत ज्या सवयी तुम्हाला असतील तर आजच्या आज सोडून द्याव्या. यामुळे तुमची किडनी निकामी होऊ शकते. किडनीला विविध प्रकारची हानी पोहोचू शकतात. चला तर मग जाणून घेऊया.
असे काही लोक असतात जे खूपच जास्त पाणी पितात तर काही असे देखील लोक असतात जे पाणी खूपच कमी पीत असतात. जर तुम्ही देखील अशाच प्रकारे करत असाल तर तुम्हाला हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. असे केल्याने किडनी वर दबाव पडण्याची शक्यता असते. कमी पाणी पिल्यामुळे विष युक्त पदार्थ शरीरामध्ये जमा होऊ लागतात. तसेच जास्त पाणी पिल्यामुळे किडनीवर दबाव येण्याची शक्यता असते. त्यामुळे शरीराला हवे तेवढेच पाणी प्यावे.
शरीरामध्ये कोणत्याही भागामध्ये आपल्याला दुखतच असते. अशा वेळी आपण मेडिसिन घेत असतो. ते मेडिसिन आपल्या शरीरावर विविध प्रकारचे घातक अटॅक करू शकते. त्यामुळे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर लवकरात लवकर दवाखान्यात जावे. कोणत्याही प्रकारची पेन किलर गोळी घेण्यापूर्वी डॉक्टरांना नक्की दाखवून घ्यावे. अशा प्रकारे घेतलेली गोळी किडनीसाठी धोका निर्माण करू शकते.
अनेक लोक आठवड्यातून चार ते पाच वेळा नॉनव्हेज जे सेवन करत असतात. परंतु याचा परिणाम देखील शरीरावर दिसून येऊ शकतो. अधिक जास्त प्रमाणात कुठल्याही प्रकारच्या अन्नाचे सेवन केले तर याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत असतो. अशातच जर रेड मीट तुम्ही जास्त प्रमाणात सेवन केले तर यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका असतो.
अनेक लोकांना विविध सवयी असतात. अनेकांना लघवी आली तरी ते लवकर लघवी करण्यासाठी जात नाही. जास्त वेळा पर्यंत लघवी थांबून ठेवणे देखील आरोग्यासाठी घातक मानले गेले आहे. असे केल्याने किडनीतुन येणारे विषारी पदार्थ बाहेर येत नाही. यामुळे तेथे प्रेशर देखील निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे अंतर्गत भागात हानी निर्माण होण्याची शक्यता असते.
अनेकदा ब्लडप्रेशर हाय झाल्यावर रक्त कोशिकावर दबाव वाढला जातो. यामुळे किडनीवर अत्यंत वाईट असा प्रभाव दिसून येत असतो. अशावेळी ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवावे. जर खूपच वाढलेली असेल तर लवकरात लवकर एखाद्या डॉक्टरांना दाखवून घ्यावे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.