कंटाळा येईपर्यंत केस वाढत राहतील.! केस वाढत नाही असे बोलणारे जरा हेही वाचा.! केसांची होईल जबरदस्त वाढ.!

आरोग्य

केस हा महिलांचा खूप मोलाचा दागिना असतो. प्रत्येक व्यक्तीला वाटत असते की आपण इतरांपेक्षा आणखी सुंदर दिसायला हवे. सुंदर दिसण्यासाठी केसांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. जितके केस लांबसडक काळेभोर असतात तितकेच आपली सुंदरता दिसत असते. परंतु अनेकदा केसांच्या विविध समस्या निर्माण होत असतात. अशा प्रकारच्या समस्या असतात ज्यामुळे केस गळू लागतात अवकाळी पांढरे होऊ लागतात अशावेळी आपण अत्यंत निराश होत असतो.

परंतु निराश होण्याची काही गरज नाही आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक छोटासा घरगुती असा उपाय सांगणार आहोत हा उपाय केल्याने तुम्हाला खूप फायदा होणार आहे. केस गळती लगेच थांबणार आहे. सोबतच काळे केस पांढरे होत असेल म्हणजे अगदी तरुणपणीच तुमचे केस पांढरे होत असेल तर यावर देखील हा उपाय अतिशय उपयुक्त मानला गेला आहे. हा उपाय कशा प्रकारे करावा याबाबतची सर्व माहिती आपण या लेखात पहाणार आहोत.

हे वाचा:   नाभी सरकने खूपच उपयुक्त असे उपाय.! नाभीचे आरोग्य चांगले बनवण्यासाठी नक्की वाचा.!

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला एक असे पाणी सांगणार आहोत. या पाण्याने जर तुम्ही तुमचे केस धुतले तर तुम्हाला विविध प्रकारचे फायदे होतील. तसे पाहायला गेले तर केस गळतीचे विविध कारणे असू शकतात. अनेक लोक रात्री बऱ्याच वेळा पर्यंत जागरण करत असतात. त्यामुळे देखील केस गळती होऊ शकते. त्याच बरोबर जास्त मसाल्याच्या पदार्थांचे सेवन करणे, ताण तणाव घेणे यामुळे देखील केस गळती होत असते.

अनेक लोकांना ही सवय असते की सकाळी अंघोळीला खूपच खडक पाणी घेणे. हे पाणी लोक अंगावर सहन करतात परंतु हेच पाणी डोक्यावर सुद्धा टाकत असतात. केसांना मात्र अशाप्रकारे गरम पाणी सहन होत नसते. त्यामुळे केस गळती आणखी वाढवली जाऊ शकते. त्यामुळे शक्‍यतो कोमट पाण्याने आंघोळ करावी. अशा प्रकारे केलेली आंघोळ ही त्वचेसाठी देखील चांगली असते.

तर रात्रीच्या वेळी एका वाटीमध्ये ग्लासभर पाणी घ्यावे. यामध्ये मूठभर तांदूळ टाकून ठेवावीत. सकाळच्या वेळी यातील तांदूळ काढून टाकावे. म्हणजे याला गाळून घ्यावे व उरलेले जे पाणी आहे ते आपण अंघोळीपूर्वी केसांना लावायला हवे. ज्या प्रकारे आपण तेलाने मालिश करत असतो त्याच प्रकारे या पाण्याने डोक्याची मालिश करायची आहे. त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळी दरम्यान धुऊन टाकावे.

हे वाचा:   खूपच कणकण भासते आहे का.? हात पाय दुखत आहेत का.? करा अशक्तपणावर हा रामबाण उपाय, दोन मिनिटात गायब होईल आजारपण.!

आंघोळी दरम्यान कुठल्याही प्रकारचा शाम्पू, साबण वापरू नका. असे तुम्ही तीन ते चार दिवस करत राहिलात तर तुम्हाला केसा संबंधीच्या सर्व समस्या नष्ट झालेल्या दिसतील. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.