सकाळी घरातून बाहेर निघताना मुंगुस आशा क्रियेत दिसले तर होतो धनलाभ…! गुप्तधनाचे संकेत देते मुंगुस!!

अध्यात्म

ज्योतिष शास्त्रानुसार अनेक प्राण्यांचे व पक्ष्यांचे अचानक दुर्लभ दर्शन होणे म्हणजे भाग्याचे मानले जाते. निसर्गातील अनेक प्राणी पशुपक्षी आणि कीटक सहजासहजी दृष्टिक्षेपात पडत नाहीत. पाल, सरडा, मांजर, नाग, मुंगुस, कोळी इत्यादी प्राण्यांचे अचानक दिसणे म्हणजे आपल्याला आपल्या निकट भविष्याबाबतचे काही दैवी संकेतच ते देत असतात.

या संकेतांनुसार जर आपण आपल्या बाबतीत घडणार्‍या घटनांचे संकेत ओळखून सावध होऊन वर्तन केले तर त्यामुळे आपल्यालाच लाभ होतो! तसेच शुभ संकेतांना अोळखुन योग्य दिशेने प्रयत्न केले तरी त्याचा लाभच होतो! हे सर्व प्राणी ज्या संकेतांना आपल्यापर्यंत पोहचवथा त्यानुसार जर वर्तन केले तर आपल्यावर येणार्‍या संकटांना सामोरे जाण्याची मनाची तयारी होते.

आयुष्यात होणारे भाग्योदय, धनलाभ यांचे पूर्वज्ञान होत असते. आज आम्ही ह्या लेखामध्ये आपल्याला दुर्मिळ व दुर्लभ असलेला मुंगूस अचानक दिसल्यावर काय लाभ होतात किंवा काय नुकसान होते याबद्दल माहिती देणार आहोत! मुंगूस हा असा प्राणी आहे जो शक्यतोवर शेतांमध्ये विहिरीच्या काठांवर दिसतो.

पक्ष्यांची अंडी खाण्याकरता मुंगूस गुपचुप झाडावर चढतो, रानमेवा रान फळे मुंगसाला देखील खूप आवडतात! सापाचे आणि मुंगसाचे कट्टर वैर असते. जिथे साप येतो तिथे मुंगूस येतो आणि सापाला खाऊन टाकतो.  पण हा प्राणी निसर्गात सहजासहजी कोणाला दिसत नाही.  मुंगसाचे दिसणे शास्त्रांत खूपच शुभ मानले जाते.

हे वाचा:   बांदा घरात घेऊन या.. घराची चहूबाजूंनी प्रगती होईल. करा हा उपाय.!

जर सकाळी उठल्या उठल्या आपल्याला समोरच मुंगसाचे दर्शन झाले तर आपला दिवस खूप शुभ जातो व आपल्याला नवे आर्थिक लाभ देखील होतात!  असे म्हणतात की कोर्टकचेरीच्या कामांकरता निघालेले असताना जर आपल्याला मुंगसाचे दर्शन झाले तर आपल्याला कोर्टकचेरीच्या कामांमध्ये आपल्या पक्षाच्या बाजूने यश मिळते.

आपण कोणत्याही कार्या करता घराबाहेर पडताना अचानक मुंगसाचे दर्शन झाले तर ते कार्य सिद्धीस जाते. रस्त्याने जात असताना जर मुंगूस आडवे गेले तर ठरवलेले काम शंभर टक्के होते व त्या कामांमध्ये आपल्याला प्रगती पण करता येते. ज्योतिष शास्त्रानुसार मुंगसाला सूर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे सूर्याचे प्रतीक असलेल्या मुंगसाचे दर्शन होणे अतिशय शुभ मानले जाते.

शास्त्रानुसार म्हटले जाते की मुंगसाचा संबंध जमीनीत गाडलेल्या धनाशी देखील असतो. त्यामुळे मुंगसाच्या फिरण्याच्या परिसरात गुप्तधन असु शकते असे म्हटले जाते. ज्या जमिनीवर मुंगसाचे बीळ असते तिथे घर बांधणार्‍या व्यक्तीला त्याच्या घरात कधीही धनसंपत्ती व लक्ष्मीची कमतरता भासत नाही. त्या जागेवर घर बांधणाऱ्या व्यक्तीची बरकत होते.

हे वाचा:   या राशीच्या लोकांसाठी आहे आनंदाची बातमी, स्वामी समर्थांची कृपा दृष्टीने होणार आहे खूपच मोठा साक्षात्कार, बऱ्याच दिवसानंतर उघडले आहे नशीब

सकाळी उठल्याबरोबर मुंगूसाचे दर्शन झाले तर आपल्याला निकट भविष्यामध्ये मोठी आर्थिक लाभ होणार आहे असे समजावे तसेच आपल्याला काही गुप्तधनाची प्राप्ती देखील होऊ शकते!
तर हे होते काही शास्त्रीय संकेत जे मुंगुसाचे अचानक दर्शन आपल्याला झाल्यावर भविष्यात होतात. जर आपल्याला ही मुंगूसाचे दर्शन झाले तर आपण या संकेतांचा विचार केला पाहिजे!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *