आज काल आपण बघितले असेल की अनेक लोकांना अगदी कमी वयामध्ये आजारांनी घेरलेले आहे. हृदय विकार, डायबिटी, हाय ब्लडप्रेशर, किडनीचे आजार, डोळ्यांच्या समस्या, हाडांचा कमकुमवतपणा व सांधेदुखी यासारख्या आजारांचे प्रमाण आता वाढत चालले आहे. पस्तिशीमध्ये अनेक लोकांचे गुडघे काम द्यायचे बंद झाले आहेत. गुडघेदुखी, रक्त कमी होणे, अशक्तपणा येणे, हाडे ठिसूळ होणे यासारखे आजार अगदी चाळिशीच्या आत होताना आपण पाहत आहोत.
जसजसे व्यक्तीचे वय वाढते तसतसे व्यक्तीच्या आरोग्याच्या समस्या वाढत जातात. वयोमानाने शरीराच्या हाडांची झीज होते व सांध्यांची हालचाल कमी होते. यामुळे सांधेदुखीचा त्रास सुरू होतो. मात्र काही लोकांना त्यांच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे अगदी कमी वयामध्ये हे आजार ओढवून घेतले आहेत.
आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे या सर्व आजारांवर रामबाण उपाय असा एक घरगुती उपाय सांगणार आहोत. चला तर पाहूया काय आहे तो उपाय? साहित्य- एक चमचा बडीशेप, एक चमचा पांढरे तीळ आणि एक खोबऱ्याचा तुकडा. पांढरे तीळ हे हाडांच्या आजारांवर अतिशय उपयुक्त आहेत. खोबर्यामुळे शरीरातील अशक्तपणा भरून निघतो व रक्तवाढ होते. पोटासंबंधी सर्व विकारांवर बडीशेपेचा उपयोग केला जातो.
कृती -खोबरे, बडीशेप आणि तीळ यांना मिक्सरमधून एकत्र बारीक करून घ्या. रात्री जेवणानंतर व सकाळी जेवणानंतर एक ग्लास गरम दूध यांमध्ये एक चमचा हे मिश्रण टाका. अशा प्रकारचे दुध नियमितपणे सेवन करा. ज्या लोकांना दूध पिण्यास आवडत नाही त्या लोकांनी जेवणानंतर एक चमचा हे मिश्रण चावून-चावून खाऊन त्यानंतर पाणी पिले तरी चालेल.
बडीशेप, पांढरे तीळ आणि खोबरे यांचा हा उपाय अतिशय फायदेशीर व प्रत्येक आजारावर रामबाण उपाय म्हणून सिद्ध झालेला आहे. पांढरे तिळ अशक्तपणा दूर करून हाडांसंबंधी सर्व विकारांवर उपयोगी असतात. तसेच हाडांचे आरोग्य सुधारते व हाडे मजबूत होतात.
खोबऱ्याचा वापर आपण महिलांच्या अशक्तपणामध्ये रक्त वाढीसाठी तसेच बाळंतपणानंतर करतात ज्यात खोबऱ्याचे व खारकेचे लाडू खाऊ घालतात ते याचमुळे खोबर्यामध्ये उष्मांक जास्त असतात तसेच खोबर्यामुळे रक्त वाढ होते.
बडीशेपाचा उपयोग अनेक प्रकारच्या पोटाच्या आजारातील आयुर्वेदिक चुर्ण बनवण्याकरता केला जातो. नुसत्या बडीशेपचे नियमित सेवन केल्यामुळे देखील पोटासंबंधी व पोटाच्या आतड्याची संबंधीचे आजार बरे होतात.
बबडीशेपपांढरे तीळ आणि खोबरे यांचे चूर्ण दुधासोबत घेतल्यामुळे त्यांचा एकत्रित फायदा चौपट होतो. हा उपाय शरीराला ऊर्जा देतो तसेच पोटासंबंधी सर्व विकार बरे करून पोट साफ ठेवण्यास मदत करतो. हा उपाय केल्यामुळे सर्व प्रकारच्या व्याधी व समस्या दूर होतात. तसेच आपला दृष्टीदोष देखील नष्ट होतो व नजर सुधारते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.