सर्दी खोकला झाला तर अजिबात चिंता करु नका हे उपाय एकदा करा; सर्दी एका दिवसात होईल गायब.!

आरोग्य

आपल्याला दातांच्या आणि आरोग्याच्या अनेक समस्या होत असतात, आपल्या किचनमधील काही पदार्थांचा अौषधी उपयोग आपल्याला माहित नसतो, मात्र त्या उपायांनी आपले बरेचसे दुखणे कमी होत असतात. आज आम्ही या लेखाद्वारे आपल्याला घरातील काही पदार्थांबाबत काही महत्त्वाची माहिती सांगणार आहोत.

सर्दी खोकला आणि कफ वर काळीमिरीचा उपयोग- काळीमिरीमध्ये अँटी-अॉक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरस गुणधर्म असतात. काळीमिरीचा चहा किंवा काढा सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला, कफ व छातीची सूज यामध्ये आराम मिळतो. डायबिटीस नियंत्रण करण्यासाठी देखील काळीमिरीचा वापर होतो.

काळीमिरीचा चहा बनवण्याकरता एका भांड्यामध्ये एक कप पाणी घ्यावे. त्यामध्ये दोन चिमूटभर हळदीची पूड व पाच-सहा काळी मिरी टाकून पाच मिनिटांपर्यंत उकळावे. थोडेसे थंड झाल्यानंतर हे मिश्रण चहा सारखे प्यावे. सर्दी, खोकला आणि कफवर हा चहा अतिशय प्रभावी आहे.

औषधी हळद – हळदीचा वापर फार पूर्वीपासून जखमा भरण्याकरता करतात. हळदीमध्ये अँटी-बॅक्टरियल आणि अँटीसेफ्टिक गुणधर्म असतात. आपल्याला हाताला चाकू लागला, काही जखम झाली असेल, तर अर्धा चमचा हळदीमध्ये तेल मिक्स करून जखमेवर लावल्यास, जखमा लवकर भरून निघतात. हळद लावल्यानंतर जखम बांधु नये, उघडीच ठेवावी. त्यामुळे जखमा भरून निघतात.

हे वाचा:   वर्षानवर्षं साठलेला सगळा मळ, घाण, गायब करा.! आता तुम्हाला गोरे होण्यापासून कोणी थांबू शकणार नाही.!

वजन कमी करण्याकरता जिरे- जिर्‍यामध्ये फायबर, विटामिन सी, आयर्न असते. ज्यामुळे आपले पचनतंत्र मजबूत होते व पोटासंबंधीच्या सर्व आजारांवर आराम मिळतो. ज्या लोकांना लठ्ठपणाचा त्रास होत आहे व वजन कमी करायचे असून बॉडी शेपमध्ये आणायची आहे त्यांनी  जिऱ्याचा जास्त वापर करावा. जिर्‍याचे सेवन केल्यामुळे मेटॅबॉलिझम सुधारतो. तसेच कॅलरी कमी करण्यामध्ये जीरा उपयोगी असतो. याकरता एक कप पाण्यामध्ये एक मोठा चमचा जिरे रात्रभर भिजवून ठेवावे. सकाळी हे पाणी गाळून घ्यावे.यामुळे चरबी घटते व वजन नियंत्रणात येते.

श्वासाच्या दुर्गंधीवर उपाय- जेवणाचा स्वाद आणि सुगंध येण्याकरता आपण दालचिनीचा वापर करतो. तोंडाच्या दुर्गंधीवरदेखील दालचिनी उपयोगी येते. दालचिनीमध्ये असलेल्या अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल गुणांमुळे तोंडाचा दुर्गंध आणणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. याकरता एक कप पाण्यामध्ये एक छोटा चमचा मध आणि अर्धा चमचा दालचिनी पावडर मिक्स करून चांगले उकळून घ्यावे या पाण्याने गुळण्या कराव्या.

ाातदुखीवर लवंग-  दात दुखी व त्या संबंधित अन्य समस्यांवर लवंग ही प्रभावी आहे. लवंगामध्ये युजेनॉल नावाचा एक गुणधर्म असतो. ज्यामुळे दातदुखीची समस्या दूर होते. यासोबतच प्लॉक, कॅव्हिटी आणि दाताच्या इतर समस्यामध्ये देखील आराम मिळतो. एक कप पाण्यामध्ये दहा ते बारा लवंग टाकून उकळून घ्यावेत पाण्याचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करावा. या पाण्याने सकाळ-संध्याकाळ माउथवॉश केल्याने दातदुखी थांबते.

हे वाचा:   एक ग्लास असा घ्या, डोळ्यावर चष्मा राहणार पण नाही, डोळ्याची नजर दहापट होईल.!

डोकेदुखीवर उपाय आले-  अँटीऑक्सीडेंट गुणांनी युक्त असलेले आले सर्दी, खोकल्यामध्ये व डोकेदुखी दूर  करण्यामध्ये प्रभावीपणे काम करते. आल्यामध्ये असलेले अँटीबॅक्टेरियल, अँटीइम्फ्लेमेंटेशन, अँटीव्हायरस गुणधर्म  असतात. आले रक्तवहन चांगला करते व डोकेदुखीपासून लगेच आराम मिळतो.

एक कप पाण्यामध्ये एक चमचा किसलेले आले टाकून चांगले उकळून घ्यावे. त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळुन हा तयार केलेला चहा किंवा काढा सेवन केल्याने डोकेदुखी लगेच थांबते. याशिवाय आपण या मिश्रणामध्ये हिमालयातील गुलाबी मीठदेखील टाकू शकता. ज्यामुळे मायग्रेनच्या समस्येमध्ये होणाऱ्या डोकेदुखीपासून आराम मिळतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. 9xMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *