स्टील च्या भांड्याद्वारे देवपूजा करताय का.? बापरे मग सर्व देव होतील तुमच्यावर नाराज; जाणून घ्या असे करणे का असते अशुभ.!

अध्यात्म

हिंदू धर्मामध्ये पूजेला खूपच महत्त्व दिले आहे. हिंदू धर्मातील अनेक लोक सकाळी उठल्यानंतर देवासमोर नतमस्तक होतात. तसेच नियमित स्वरूपात देवाची पूजा करत असतात. अनेक लोक तर नियमित स्वरूपात देवाला स्नान घालत असतात. तसेच देवासमोर दिवा लावून अगरबत्ती लावून काही देवांची आरती देखील केली जाते. यामुळे घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. तसेच घरात सर्वत्र आनंदी व सकारात्मक विचार निर्माण होत असतात.

यामुळे घरा मध्ये नेहमी देव पूजा केली जाते. परंतु अनेक लोक देवपूजा दरम्यान काही चुका करत असतात. देव पूजेसाठी आपण घरातल्या स्टिलच्या भांड्यांचा उपयोग करत असतो. परंतु देवपुजे दरम्यान स्टीलचा भांड्याचा उपयोग करावा कि नाही? असे करणे शुभ असते की अशुभ असते, हे अनेकांना माहिती नसते. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकी काय आहे हे.

िंंदु धर्माच्या शास्त्रानुसार पूजे दरम्यान कोणत्या प्रकारच्या भांड्यांचा उपयोग करायला हवा याचे देखील काही नियम बनवले गेले आहेत. अनेक लोक पूजे दरम्यान स्टिलच्या भांड्यांचा उपयोग करत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की पूजा दरम्यान स्टिलच्या भांड्यांचा उपयोग करणे खूपच अशुभ मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया पूजे दरम्यान कोणत्या भांड्यांचा उपयोग आपण करायला हवा.

हे वाचा:   ज्या घराच्या पूजाघरात ही एक वस्तू असते तेथून गरीबी कायमची निघुन जात असते.!

शास्त्रानुसार असे सांगितले जाते की पूजे दरम्यान वेगवेगळ्या धातूच्या भांड्याचा उपयोग केल्यास वेगवेगळे फळ प्राप्त होत असत. प्रत्येक धातूच्या भांड्यांना वेगवेगळे महत्त्व दिले गेले आहे. सोने, चांदी, पितळ, तांबे यासारख्या भांड्यांचा उपयोग जर पूजे दरम्यान केला तर असे करणे खूपच शुभ मानले जाते. तर स्टील, लोखंड, ॲल्युमिनियम यांसारख्या धातूंचा उपयोग जर पूजे दरम्यान केला तर असे करणे खूपच अशुभ मानले जाते.

या धातूच्या मुर्त्या देखील पूजेसाठी खूपच अशुभ मानल्या जातात. यामागील सर्वात महत्वाचे कारण हे आहे की पूजे दरम्यान प्राकृतिक धातू शुभ मानले जातात. याच कारणामुळे स्टीलच्या किंवा लोखंडाच्या भांड्यांमध्ये पूजापाठ करणे अशुभ मानले जाते. तसेच या भांड्यांमध्ये पूजा करण्यास मनाई केली जाते.

हे वाचा:   जर आपला जन्म देखील रात्री झाला असेल तर हा लेख जरूर वाचा.!

यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण हे देखील आहे की हे सर्व मानवनिर्मित धातू आहे. तसेच लोखंडाला गंज लागत असतो आणि ॲल्युमिनियम मधून कालिख बाहेर पडत असते. या भांड्यांच्या उपयोगामुळे आपल्या त्वचेला देखील नुकसान पोहोचत असते आणि यामुळे मुर्त्या देखील खराब होत असतात. त्यामुळे कधीही या प्रकारच्या धातूंचा उपयोग आपल्या पूजे दरम्यान करू नये. धार्मिक शास्त्रानुसार सांगितलेल्या धातूंच्या भांड्यांचा उपयोग नेहमी आपल्या पुजेमध्ये करावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *