घरच्या घरी मलाईदार मटका कुल्फी कशी बनवायची.! लहान मुलेच काय मोठी माणसे देखील आवडीने खातील.! अगदी कमी साहित्यात.!

ट्रेंडिंग

उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला काहीतरी थंड खावे वाटत असते. उन्हाळ्यामध्ये जर तुम्हाला काही थंड कुल्फी तसेच इतर पदार्थ बनवायचे असेल तर खूप कंटाळा येत असतो. कारण ही बनवण्याची प्रोसेस खूप लांबी असते. प्रत्येकाला मार्केटमध्ये जाणे आणि कुल्फी विकत आणणे हे जमत नाही अनेक लोकांना वाटत असते की आपण घरगुती पद्धतीने घरीच कुल्फी बनवावी.

परंतु आपण काही youtube वर किंवा इंटरनेटवर क्लिक वाचून कुल्फी बनवण्याचा प्रयत्न करतो परंतु ती तशी बनत नाही कारण ती बनवताना खूप अवघड प्रोसेस सांगितली जाते. कुल्फी ही बनवत असताना कमी साहित्यात चांगली बनवता यायला हवी परंतु हे आपल्याला माहिती नसते. परंतु चिंता करण्याची काही गरज नाही आम्ही तुम्हाला एक साधी सोपी आणि काही वेळातच होणारी कुल्फी ची रेसिपी सांगणार आहोत.

ही कुल्फी तुम्ही देखील खाऊ शकतात तसेच तुमच्या मुलांना देखील खूप आवडेल तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपण या कुल्फीची प्रोसेस बघूया म्हणजे ही कशाप्रकारे बनवावी लागेल. तर मित्रांनो आपण यासाठी लागणारे साहित्य पाहूया, आवश्यक साहित्य: 2 कप दूध, 1कप गोड कंडेन्स्ड दूध, १/२ कप साखर, 1/2 कप मावा (खवा), 1/2 टीस्पून वेलची पावडर, व्यतिरिक्त: सुका मेवा (बदाम, काजू, पिस्ता).

हे वाचा:   महिलांनो स्वयंपाक घरातील या बारीक सारीक गोष्टी माहिती असू द्या.! यामुळे तुमचे कामे होतील झटपट.!

तर अशा प्रकारचे फारच कमी साहित्य या कुल्फीसाठी लागणार आहे हे साहित्यातून मी शेजारच्या दुकानातून किंवा कुठल्याही मॉल मधून देखील आणू शकता. तर मैत्रिणींनो आपण पाहूया की ही कुल्फी कशी बनवायची याची रेसिपी. कसे बनवावे: १. सर्व प्रथम एका पॅनमध्ये दूध उकळवा. 2. उकळल्यानंतर त्यात गोड कंडेन्स्ड दूध घालून मिक्स करा. 3. नंतर साखर, मावा आणि वेलची पूड घालून मिक्स करा. 4. आता हे मिश्रण थंड होईपर्यंत ठेवा.

५. मिश्रण थंड झाल्यावर बरणीत भरा. 6. भांडी नीट झाकून फ्रीजमध्ये ठेवा. ७. ५-६ तासांनी भांडी काढून सुक्या मेव्याने सजवा. 8. आता मटका कुल्फी तयार आहे, सर्व्ह करा आणि थंड झाल्यावर खा. अशा प्रकारची ही मटका कुल्फी तुम्ही तुमच्या मुलांना देखील देऊ शकता ते देखील आनंदी होते आणि अतिशय स्वर्गीय अशी मटका कुल्फी तुमच्यासाठी रेडी आहे.

हे वाचा:   छोट्या सुई मध्ये दोरा कसा ओवायचा.? खूप सोपी ट्रिक आहे.! एका सेकंदात काम होणार.!

ही मटका कुल्फी तुमच्या घरातील मुलांना आणि कुटुंबीयांना खूप आवडेल. हे तयार होण्यासाठी कमी वेळ आणि साहित्य लागते आणि त्याची चवही खूप स्वादिष्ट असते. तर आता विलंब न करता बनवा आणि आनंद घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.