प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये धनदौलत खूप महत्त्वाची असते. प्रत्येकाला वाटत असते की आपण इतरांपेक्षा भरपूर श्रीमंत व्हावे आपल्याकडे भरपूर पैसा असावा जेणेकरून आपण आपल्या सर्व गरजा पूर्ण करू शकू. अनेक लोक वेगवेगळ्या रूढी-परंपरा वर विश्वास ठेवत असतात. तुम्ही अनेकांच्या घरासमोर काही झाडे लावलेली बघितली असेल त्यापैकीच एक म्हणजे मनी प्लांट.
घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहावी तसेच भरभरून पैसे येत राहावे असे प्रत्येकाला वाटत असते. यासाठी घरासमोर अनेक जण मनीप्लांट लावत असतात. तुम्ही देखील मनीप्लांट घरासमोर लावण्याचा विचार करत असाल परंतु लक्षात ठेवा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार मनीप्लांट लावला तर याचा खूपच शुभ परिणाम मानला जातो. यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडत असतो.
परंतु बऱ्याच लोकांना मनी प्लांट कोणत्या दिशेमध्ये लावायला हवा हे माहिती नसते. चुकीच्या दिशेने मध्ये मनी प्लांट चे झाड लावल्या मुळे याचा नकारात्मक प्रभाव देखील पडत असतो. तसेच यामुळे होणारा लाभ हा होत नाही. आजच्या या लेखामध्ये आपण वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट कोणत्या दिशेमध्ये लावायला हवा याबाबत माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग या बाबत सविस्तर पणे माहिती पाहूयात.
चुकीच्या दिशेने मध्ये मनी प्लांट लावण्यामुळे घरांमध्ये सुख-समृद्धी येण्याच्या व्यतिरिक्त याचा उलट परिणाम आपल्याला दिसून येत असतो. यामुळे घरांमध्ये नकारात्मकता निर्माण होत असते. याचा असर हा घरांमध्ये आर्थिक स्थितीवर देखील दिसून येत असतो. म्हणजेच चुकीची दिशा नीवडल्यास याचा खूपच वाईट असा परिणाम आपल्याला दिसून येत असतो. त्यामुळे दिशेचा नेहमी विचार करायला हवा.
वास्तुशास्त्रानुसार आपण मनी प्लांट जर लावला तर यामुळे आपल्याला नक्कीच फायदा होईल. वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हे ईशान्य कोणाला म्हणजेच उत्तर पूर्व या भागात कधीही असू नये. वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की या दिशेला कधीही मनीप्लांट लावू नये. यामुळे घरात आर्थिक तंगी येण्याची शक्यता असते. अनेक लोक घराच्या बाहेर मनीप्लांट लावत असतात परंतु जर आपण मनीप्लांट हा घराच्या आत मध्ये लावला तर याचा प्रभाव चांगला पडत असतो.
वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट हे दक्षिण पूर्व दिशे मध्ये लावायला हवे. असे करणे खूपच उत्तम मानले जाते. कारण या दिशेमध्ये ग्रह शुक्र असतात आणि या प्लांटचे वेल या दिशेला असेल तर अतिशय उत्तम मानले जाते. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.