घरात ठेवत असाल गंगाजल तर या चूका अजिबात करू नका, होऊ शकते असे काही.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्मामध्ये गंगाजलाला सर्वांत पवित्र मानले जाते. गंगेचे पाणी अतिशय शुद्ध असते. भारतातील प्रत्येक घरांमध्ये गंगाजल ठेवले जाते. गंगाजल अतिशय पवित्र असते. गंगा जलामध्ये कधीच प्रदूषणामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे किडे पडत नाहीत. आपल्या हिंदु धर्मात असे मानले जाते की मरताना गंगाजल तोंडात टाकले तर मरणार्‍या व्यक्तिला मेल्यानंतर स्वर्गप्राप्ती होत असते.

तसेच आत्म्याला जीवनमरणाच्या फेर्‍यातून मुक्ती मिळत असते. संत एकनाथांनी वाळवंटात तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजुन त्याची तहान भागवली होती ही भागवत कथा आपण ऐकली असेलच. गंगाजलाचे अलौकिक धार्मिक महत्व आहे. गंगेला पापक्षालनाचे वरदान त्रिदेवांनी दिले आहे. गंगेच्या पाण्य‍ात पवित्रता असते. गंगेत अंघोळ करुन पापांपासुन मुक्ती मिळते अशी आपल्या हिंदु धर्मामध्ये मान्यता व धारणा आहे. कुंभमेळ्याचे आयोजन केवळ गंगेच्या संगमांवरच केले जाते त्याचे हेच कारण आहे.

जर आपणही घरामध्ये गंगेचे पवित्र जल ठेवू इच्छित असाल, तर त्याकरता काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते! जर आपण हे नियम पाळले नाही तर आपण पापाचे भागीदार म्हणू शकता. तसेच आपण हे नियम पाळले नाही तर गंगाजलाचा प्रभाव देखील कमी होत असतो.

हे वाचा:   म्हणून गणपती बाप्पा समोर एकही तुळशीचे पान ठेवले जात नाही, यामागे आहे ही कथा.!

आज आम्ही आपल्याला या लेखाद्वारे घरामध्ये गंगाजल ठेवण्याकरता जे काही शास्त्रीय नियम पाळावे लागतात त्याबद्दल माहिती सांगणार आहोत, तसेच घरामध्ये गंगाजल ठेवताना काय सावधानता बाळगली पाहिजे याबद्दल देखील आम्ही माहिती सांगणार आहोत.

गंगाजलास या लोकांनी हात लावू नये – ज्या लोकांनी मांसाहार केला आहे,  मांसाहार केल्यानंतर गंगाजलास कधीही स्पर्श करू नये. तसेच दारू तंबाखू आणि सिगारेट इत्यादी नशा करणाऱ्या लोकांनी दारू तंबाखू सिगरेटला हात लावल्यानंतर गंगाजलास स्पर्श करू नये. त्याकरता ज्या दिवशी आपण मांसाहार किंवा नशेच्या वस्तूंचे सेवन करत असतात, त्यादिवशी चुकूनही गंगाजलाला हात लावू नये. हे नियम पाळले नाही तर आपल्याला मोठे पाप लागू शकते. तसेच असे केल्यामुळे गंगाजलाची शुद्धता देखील नष्ट होत असते.

इथे ठेवा गंगाजल – गंगाजल घरी आणल्यानंतर नेहमी घरातील देवघरात विधिवत पुजा करुनच ठेवले पाहिजे. देवघरात गंगाजल ठेवल्यामुळे सकाळ-संध्याकाळ देवा सोबत गंगाजलाची  देखील पूजा केली जाते. गंगाजल घराच्या मंदिरात ठेवल्यामुळे तिथे सकारात्मक उर्जा निर्माण होत असते. देवघरात गंगाजल ठेवल्यामुळे अनेक वर्षापर्यंत गंगाजलाची पवित्रता कायम राहते.

हे वाचा:   टाळा – चावीचा उपाय तुम्हाला करोडपती बनवेल, जर विश्वास बसत नसेल तर स्वतःच करून पहा.!

यामध्ये ठेवा गंगाजल – गंगाजल नेहमी माती, चांदी किंवा काश्याच्या भांड्यात मध्ये ठेवले पाहिजे. असे करण्याचे कारण म्हणजे या भांड्यांमध्ये गंगाजल ठेवल्यामुळे अधिक काळापर्यंत शुद्ध आणि दैवी गुणांनी युक्त राहते. गंगाजलाला कधीही प्लास्टिक च्या बाटलीमध्ये भरून ठेवू नये.

घाणेरड्या हातांनी गंगाजलास स्पर्श करू नये – जेव्हा आपण गंगाजलाचा वापर करू तेव्हा आपले हात स्वच्छ धुतलेले असायला हवे.  घाणेरड्या आणि अस्वच्छ  हाताने गंगाजलास स्पर्श केल्यामुळे आपल्याला दोष लागत असतो. तर हे होते घरांमध्ये गंगाजल ठेवण्याबद्दल चे काही शास्त्रीय नियम, जर आपल्याला हे नियम यापूर्वी माहित नसतील तर यापुढे कायम गंगाजलाचा वापर करताना या नियमांचे पालन करावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *