उन्हाळ्याचा ऋतु सुरू झाला आहे आणि अशा काळातच वातावरण देखील खूपच बदललेले आहे. अनेक घातक असे आजार निर्माण होत आहेत. यामुळे आपल्याला भयंकर असा त्रास जाणवू लागला आहे. अनेक संसर्गजन्य रोग निर्माण होत असतात. अशा वेळी आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची खूप गरज असते. उन्हाळ्यामध्ये तर आपण आपल्या शरीराची काळजी जेवढी जास्त घ्यावी तेवढी उत्तम आहे.
कारण उन्हाळ्यामध्ये शरीराला जास्त उष्णतेचा सामना करावा लागत असतो. या उष्णतेमुळे अनेक आजार निर्माण होत असतात. या सर्व आजारांना लढण्याची ताकद तुमच्या शरिरामध्ये निर्माण करावी. म्हणजेच इम्युनिटी वाढेल अशा प्रकारचे अन्नपदार्थांचे सेवन करावे. आपल्याला उन्हाळ्यामध्ये कधी नॉर्मल ताप आल्यासारखे वाटत असते. थोडेसे डोळे गरम झाल्यासारखे वाटत असते. अशावेळी पुदिन्याचा एक छोटासा उपाय केला तर हे सर्व काही नाहीसे होईलच.
पुदिना ही वनस्पती खूपच उपयुक्त मानली जाते. आयुर्वेदामध्ये याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. यामध्ये विटामिन सी भरभरून असते जे आरोग्यासाठी खूपच उपयुक्त मानले जाते. केवळ शारीरिक समस्याच नाही तर चेहर्यासाठी देखील पुदिना खूपच उपयुक्त मानला जातो. आपण पुदिन्याची वनस्पती आपल्या घराच्या परसबागेमध्ये देखील लावू शकतो.
जर कधी आपल्याला नॉर्मल ताप आली तर अशावेळी तुळस व पुदिन्याचे काही पाने घेऊन याचा काढा बनवून हा काढा पिला तर नॉर्मल ताप बरी होत असते. यामुळे भरपूर आराम मिळत असतो. याबरोबरच पुदिन्याचे असे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात. उन्हाळ्याच्या काळामध्ये घामामुळे त्वचेचे अनेक भयंकर असे विकार होत असतात.
काखेमध्ये किंवा अंतर भागांमध्ये ज्या ठिकाणी खूपच घाम येत असतो अशा ठिकाणी गजकर्ण, नायटा, खरुज निर्माण होत असते. अशा प्रकारचे हे विकार निर्माण झाल्यानंतर व्यक्तीचे खूपच भयंकर असे हाल होत असतात. अशावेळी जर पुदिन्याचा पानांचा लेप बनवून तो या जागेवर लावला तर काही काळातच सर्व विकार नाहीसे होत असतात.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.