दररोज फक्त या तीन गोष्टीचे सेवन करा, डोळ्यावर चष्मा राहणारच नाही; आजपर्यंत असा उपाय ऐकला नसेल.!

आरोग्य

आज-काल डोळ्या संबंधीच्या समस्या अगदी लहान मुलांपासून वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्वांना उद्भवू लागले आहेत. डोळा हा आपल्या शरीराचा खूपच महत्त्वाचा अवयव आहे. जर डोळ्या संबंधीच्या कोणत्याही समस्या उद्भवल्या तर आपल्याला कोणतेही काम करता येत नसते. अगदी लहान मुलांना देखील डोळ्याच्या समस्या निर्माण होत असतात त्यामुळे त्यांना देखील चष्म्याचा वापर केला जातो.

लहान मुलांना डोळ्याच्या समस्या उद्भवण्याचे कारण म्हणजे मोबाईल कम्प्युटरवर तासनतास बसणे. आज काल लहान मुले देखील आठ ते दहा तास कंप्युटर किंवा मोबाईल समोर बसत असतात. यामुळे कम्प्युटर मधून व मोबाईल मधून पडणाऱ्या घातक अशा उजेडामुळे डोळ्यांना खूपच नुकसान पोहोचत असते. अशी काही पदार्थ आहेत जे डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जातात.

या पदार्थांच्या सेवनामुळे डोळ्यावरचा चष्मा अगदी काही दिवसातच कमी झालेला तुम्हाला दिसेल. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे पदार्थ ज्यांचे आपण जास्तीत जास्त सेवन करूया. डोळ्या संबंधीच्या कोणत्याही समस्या उद्भवल्या असतील तर त्या यामुळे नक्कीच कमी होतील.

हे वाचा:   कोणताही महाभयंकर मूळव्याध या वनस्पती पुढे टिकू शकणार नाही, अतिशय गुणकारी औषधी वनस्पती.!

आवळा: आवळा हा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असे फळ मानले जाते. कारण आवळ्यामध्ये असलेले तत्त्व हे आपल्या डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या समस्या देखील कमी होत असतात. ज्या लोकांना डोळ्यातून पाणी येते किंवा डोळे लाल होत असतात अशा लोकांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्यावा यामुळे नक्कीच फायदा होईल.

इलायची: इलायची आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर मानली गेली आहे. कारण इलायची आपल्या शरीराचे तापमान संतुलित करण्याचे काम करत असते. इलायचीचे नियमित प्रमाणात सेवन केल्यामुळे डोळ्यांना थंडावा मिळत असतो. यामुळे डोळ्याची रोशनी देखील वाढत असते. तुम्हाला हवे तर तुम्ही इलायची ची पावडर बनवून याला दुधाबरोबर सेवन करू शकता. इलायची डोळ्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते.

हे वाचा:   नोकरीसाठी दिवसभर संगणक वापरणारे.! रात्रंदिवस मोबाइल वापरणारे लोक, दिवसभरातून हे एक काम वीस सेकंद करायचे.! डोळे एकदम मस्त राहतील.!

हिरव्या पालेभाज्या: हिरव्या पालेभाज्या यांना आपल्या जीवनामध्ये खूपच महत्त्व आहे हे सर्वांना माहिती आहे. कारण हिरव्या पालेभाज्यांमध्ये असे अनेक प्रकारचे गुणधर्म असतात जे शारीरिक दृष्टिकोनातून अत्यंत उपयुक्त मानले जातात. हिरव्या पालेभाज्यांमध्ये आयरन भरपूर प्रमाणात असते जे डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. अनेक लोकांना हिरव्या पालेभाज्या आवडत नसतात परंतु याचे सेवन केल्यामुळे अनेक शारीरिक विकार देखील नष्ट होत असतात.

जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *