आज कालच्या आपल्या धावपळीच्या लाइफस्टाइल मध्ये अनेक भयंकर असे आजार उद्भवू लागली आहेत. त्यातीलच एक आजार म्हणजे उच्च रक्तदाब. म्हणजेच हाय ब्लड प्रेशर ही समस्या आजकाल अनेक लोकांना उद्भवलेली दिसत असते. हाय ब्लड प्रेशर ची समस्या आजकाल प्रत्येक वयाच्या लोकांना दिसून येऊ लागली आहे. भारतामध्ये एका शोधानुसार असे सांगितले गेले आहे की वयाच्या अगोदर होणारा मृ’त्यू हा केवळ ब्लडप्रेशर मुळेच होऊ लागला आहे.
ब्लड प्रेशर ला नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेक जण गोळ्या औषधांचा सहारा घेत असतात. तसेच डॉक्टरांकडे जाऊन याबाबतचा वेगवेगळ्या सल्ला घेत असतात. परंतु हेल्थ एक्सपर्ट यांनी डायट प्लॅन बद्दल माहिती दिली आहे जर तुम्ही हे पदार्थ तुमच्या खाण्या पिण्या मध्ये ऍड केले तर तुमचा रक्तदाबाची समस्या नक्कीच कमी होईल. या समस्येवर हा उपाय अतिशय चांगला आहे. तुम्हाला केवळ चांगले अन्नधान्य याचे सेवन करायचे आहे.
हिरव्या पालेभाज्या ह्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त मानल्या जातात. त्यामध्ये फायबर, मॅग्नेशियम, विटामिन, यांसारखे अनेक पौष्टिक तत्व असतात. दररोजच्या जेवणामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा सेवन केले तर यामुळे शरीराला भरपूर फायदा होत असतो. यामुळे शरीराला भरपूर अशी ऊर्जा प्राप्त होत असते. तसेच हाय ब्लड प्रेशर व अन्य हृदय संबंधीच्या समस्या देखील यामुळे नष्ट होत असतात. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या डायट प्लॅन मध्ये हिरव्या पालेभाज्या नक्की सामाविष्ट करुन घ्याव्यात.
तुरट व आंबट पदार्थ देखील उच्च रक्तदाबासाठी खूपच फायदेशीर मानले जातात. यामुळे ब्लड प्रेशर नक्कीच नियंत्रणात येऊ शकतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये लिंबू, संत्रा, अंगूर अशा पदार्थांचे समाविष्ट करावा. काही अभ्यासाद्वारे असे सांगितले गेले आहे की संत्री आणि अंगूर याचा जर ज्यूस दररोज पीला तर यामुळे उच्च रक्तदाब याचा खतरा कमी होत असतो. त्यामुळे ज्या लोकांना ही समस्या आहे अशा लोकांनी या फळांचे सेवन नक्कीच करायला हवे.
जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका.