आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला डोळ्यात संबंधीची खूपच महत्त्वाची अशी माहिती सांगणार आहोत. आपल्याला डोळ्या संबंधीच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. यामध्ये लांबचे न दिसणे, जवळचे न दिसणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळे लाल होणे, डोळ्यांची आग होणे, सतत डोके दुखणे यांसारख्या काय समस्या आहे.
अशा प्रकारच्या समस्या जाणवू लागल्यानंतर आपल्याला वाटत असते की आपल्याला चष्मा लागला आहे. परंतु एकदा आपण काही घरगुती उपाय करून नक्की बघायला हवे. आम्ही तुम्हाला एक असा सोपा उपाय सांगणार आहोत जो तुम्ही डोळ्यांसाठी नक्की करायला हवा. हा उपाय केल्याने तुमच्या डोळ्यांची रोशनी वाढली जाईल, डोळ्या संबंधीच्या सर्व समस्या नष्ट होतील.
जर तुम्हाला अगोदरपासूनच चष्मा असेल तरीदेखील हा उपाय करायला हवा. यामुळे तुम्हाला देखील भरपूर असा लाभ होईल. सर्वप्रथम आपण या समस्या उद्भवण्याची कारणे पाहूयात. अशा प्रकारच्या समस्या का निर्माण होत असतात तर, सध्याच्या काळात हा डिजिटल काळ आहे. लहान मुलांपासून अगदी उतारवयात आलेल्या आजोबांपर्यंत सर्वांच्या हातात सध्या मोबाईल दिसत असतो.
मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्यांवर खूपच जास्त प्रमाणात दबाव पडला जातो. ज्यामुळे डोळ्या संबंधीच्या या सांगितलेल्या समस्या निर्माण होत असतात. अशा प्रकारच्या समस्या होऊ नयेत म्हणून हा उपाय तुमच्यासाठी आहे. आपल्याला या उपायासाठी बडीशेप लागणार आहे. बडीशेप आपल्या डोळ्यांसाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.
याच्या सेवनामुळे डोळ्या संबंधीच्या अनेक समस्या नष्ट होत असतात. ज्या लोकांना दूरचे किंवा जवळचे दिसत नसते अशा लोकांसाठी बडीशेप अतिशय उपयुक्त मानली जाते. आपल्याला यासाठी दोन मोठे चमचे बडीशेप लागणार आहे. या सोबतच आपल्याला आणखी एक पदार्थ लागेल तो म्हणजे बदाम. बदाम जेवढे आपल्या स्मरणशक्तीसाठी उपयुक्त असते तेवढेच आपल्या डोळ्यांसाठी देखील असते.
याबरोबरच आपल्याला यासाठी थोडीशी खडीसाखर लागेल. सर्वप्रथम खडीसाखर, बडीशेप व बदाम एकत्र करून घ्यावे व खलबत्त्या च्या सहाय्याने किंवा मिक्सरच्या साह्याने हे बारीक करून घ्यावेत. यांची बारीक पूड तयार करून ही एका बरणीत साठवून ठेवावे. याचे सेवन तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी दुधाबरोबर करायचे आहे.
याचे काही दिवस तुम्ही सेवन करत राहिलात तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा जाणवेल. तुमच्या डोळ्यांसाठी हे अतिशय उपयुक्त आहे. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.
सूचना- आम्ही आज ज्या टिप्स दिल्या आहेत त्या सामान्य उपयोगाच्या टिप्स आहेत. एखाद्या आजाराने संक्रमित असल्यास कोणत्याही डॉक्टर किंवा मेडिकल प्रोफेशनलच्या सल्ल्याशिवाय हे उपाय करु नका