महागतले महाग औषधे सुद्धा यापुढे फेल आहेत, आयुषयभरासाठी खूप उपयोगी पडेल ही वनस्पती.!

आरोग्य

नमस्कार मित्रांनो, आपली ही वनस्पती बद्दल माहिती देण्याची शृंखला पुढे नेत आज आपण जाणून घेणार आहोत एक वेलवर्गीय वनस्पती विषयी ज्याचं नाव आहे तोंडली. याला हिंदीमध्ये कुंदरू असे म्हणतात. चवीला तुरट आणि काहीशी काकडी सारखी असते ही तोंडली. तोंडली चे पिक कमी मेहनतीत, कमी वेळेत खूप मोठ्या प्रमाणावर घेता येते. आपल्यापैकी बर्‍याच जणांनी तोंडलीची भाजी खाल्ली असेलच.

या वनस्पतीचा वेल दाट झाडीप्रमाणे असतो. याला पांढऱ्या रंगाची फुले येतात. सामान्यतः तोंडलीच्या फळाचा वापरच केला जातो. बाकीच्या फायदा बद्दल लोकांना पुरेशी माहिती नसते. तोंडलीची भाजी शरीराला फायदेशीर असतेच सोबतच याची मुळं, पान, फुल देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. या वनस्पतीच्या मदतीने कान दुखी ठीक केली जाऊ शकते.

सततची डोकेदुखी होत असेल तर ती डोकेदुखी थांबवण्यात या वनस्पतीचा उपयोग होतो. ह्यासोबत गुडघेदुखीचे समस्या असेल तर त्यातून आराम मिळू शकतो. कोणत्याही प्रकारचे दुखणे अथवा सूज येणे बिलकुल ठीक केले जाऊ शकते तोंडलीच्या मदतीने. या वनस्पतीच्या मदतीने दाद, खाज, खुजली, गजकर्ण, नायटा, खरुज अगदी तोंड येणे देखील ठीक करू शकतो.

हे वाचा:   तुम्ही तुमच्या फ्रिज मध्ये चिकन किती दिवस साठवून ठेऊ शकता.? काय आहे चिकन साठवून ठेवायचा चांगला मार्ग.!

तोंडली हे नाव म्हणूनच पडले असावे बहुदा. तुम्हाला सतत तोंड येण्याचा त्रास होत असेल तर तोंडली ची हिरवी फळे घेऊन चोखत रहा. असं केल्याने जिभेवर अथवा ओठांच्या आत मध्ये तोंड आले असल्यास एकदम ठीक होईल. कानदुखी होत असल्यास तोंडली मधील गुणधर्मांमुळे कान दुखी थांबते. यासाठी तोंडलीच्या पानांच्या रसामध्ये मोहरीचे तेल एकत्र करून कानामध्ये एक ते दोन थेंब टाकावे.

वारंवार डोकेदुखी होत असल्यास तोंडलीच्या मुळ्या वाटून माथ्यावरती त्याचा लेप लावा. असं केल्याने डोकेदुखी मध्ये त्वरित आराम मिळतो. त्वचे संबंधित कोणते रोग असल्यास या वनस्पतीच्या पानांमध्ये असणारे अँटी बॅक्टेरियल, अँटी फंगल, anti-inflammatory गुणधर्म सर्व प्रकारच्या त्वचा रोगातून आपली सुटका करण्यात मदत करतात.

हे वाचा:   सतत ऍसिडिटी.! सतत गॅस.! कंटाळा आलाय का.? चिंता करू नका फक्त एक ग्लास प्या.! पूर्ण महिनाभर पोटाचा कणभर सुद्धा त्रास होणार नाही.!

याकरता या वनस्पतीची पानं खोबरेल तेलामध्ये शिजवा आणि ते तेल एका बाटलीत भरून ठेवा. व प्रभावित जागेवरती हे तेल लावल्याने तुम्हाला फायदा होईल. गुडघेदुखी, सांधेदुखी, गठिया, सूज येणे या प्रकारची समस्या असल्यास या वनस्पतीची ताजी मुळं वाटून मोहरी तेल मिक्स करून प्रभावित जागी सलग काही दिवस लावा. असं केल्याने दुखणं आणि सूज येणे यामध्ये लाभ होतो.

तोंडली चे हे अनोखे फायदे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल. याचा तुम्ही नक्की फायदा करून घ्या. जर हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तसेच अशाच प्रकारच्या अनेक नवनवीन प्रकारच्या माहितीसाठी आमच्या फेसबुक पेज ला लाईक करायला विसरु नका.

Disclaimer: या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. आमची वेबसाईट या गोष्टींची पुष्टी करत नाही. कृपया हे उपाय करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *